गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. झळा दुष्काळाचा
Written By वेबदुनिया|

पाणी वाचवाल तर वाचाल...!

WD
संपूर्ण महाराष्ट्र कमी अधिक प्रमाणात पाणीटंचाईने होरपळत आहे. एकेकाळी बारामाही पाण्याची सुबत्ता असणार्‍या ठिकाणीही आज पाणीटंचाई जाणवत आहे. म्हणूनच शहरासह ग्रामीण भागात राहणार्‍या सर्वांनीच 'जलसाक्षर' होण्याची गरज आहे. आज घरबसल्या नळाला सहजपणे पाणी उपलब्ध होत असले तरीही पाणी हे बाजारात तयार करता येत नाही, हे विसरून चालणार नाही. पाण्याचा प्रत्येक थेंब हा मौल्यवान आहेत. त्याचा अपव्यय होणार नाही याची आवर्जून काळजी घेतली तरी पाणीटंचाईची दाहकता कमी करता येईल. म्हणूनच घर, शाळा, कार्यालय, रुग्णालय, हॉटेल, खासगी व सार्वजनिक ठिकाणी जाणीवपूर्वक पाण्याचा काटकसरीने वापर केला पाहिजे. यासाठी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रत्येकाने अंमलात आणण्याची 'जलसंहिता' पुढीलप्रमाणे-

WD
पाण्यासाठी वापरत असलेल्यनळातून अथवा कपडे धुण्याच्या यंत्रातून एक-एक थेंब पाणी ठिबकत असेल तर ते तत्काळ थांबवा. नळातून प्रत्येक सेकंदाला जर एक थेंब पाणी ठिबकले तर एक वर्षात 12 हजार 500 लिटर पाणी वाया जाते.

अर्थात हे पाणी वाचवले तर 4 माणसांच्या कुटुंबाला वर्षभराचे पिण्याचे पाणी मिळू शकते.

शहरातील अपार्टमेंट: उच्चभ्रू वस्तीत शॉवरने आंघोळ करुन 10 ‍मिनिटात 135 लि. पाणी वापरले जाते. त्याऐवजी बादलीने आंघोळ केल्यास 40150 लि. पाणी वाचेल. हे वाचलेले पाणी वर्षभर 4 जनावरांना पुरेल.

WD

गरज नसताना वारंवार शौचालयामध्ये फ्लशिंग करू नये, एकदा फ्लशिंग केले की एकावेळी किमान 8 लिटर पाणी वाया जाते. दिवसामध्ये जितक्यावेळा फ्लशिंग केले जाईल तितक्यावेळा पाणी वाया जाईल.

WD

बागेमध्ये जर अर्धवट कुजलेला पालापाचोळा टाकला तर पाण्याचे बाष्पीभवनाद्वारे होणारे 73 टक्के नुकसान टळते. शेतीमध्ये रासायनिक खतांचा वापर झाल्यास पाण्याची गरज वाढते. म्हणून कमीत कमी रासा‍यनिक खतांचा वापर करावा. पारंपरिक पद्धतीने पाणी न देता स्प्रिंकलर, ड्रीप पद्धतीचा वापर करावा. यामुळे 35 ते 40 टक्के पाण्याची बचत होते. या पद्धतीमुळे पिकाला थेट पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे तणांची वाढ कमी होते. पीक जोमदार वाढते.

WD

वाहनांती स्वच्छता करण्यासाठी नळाला पाईप जोडून वारेमाप पाण्याची नासाडी करू नये. नळाच्या थेट पाण्याने कार धुतल्यास किमान 400 लिटर पाणी वाया जाते. बादलीत पाणी घेऊन वाहनांची स्वच्छता करण्यासाठी स्पंजचा वापर केल्यास 300 लिटर पाण्याची बचत होते.

PR

पावसाळ्यात छतावर पडणारे पाणी वाया जात असते. त्यामुळे हे पाणी किमान जमिनीत मुरविण्यासाठी उपाययोजना करावी. तसेच खर्चासाठी लागणारे पाणी टाकीत साठविण्याची व्यवस्था करावी.

WD

दात घासताना, दाढी करताना तसेच चेहरा धुताना पाण्याचा नळ योग्य वेळी बंद करण्याची खबरदारी घ्यावी. तरं चला, आपणही पाणी वाचवण्याच्या या मोहिमेत सहभागी होऊन राष्ट्रासाठी पाण्याची बचत करूया.

PR