गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात
Written By वेबदुनिया|

ते विधानसभेत आणि मी रस्‍त्यावरः राज

''साडेतीन वर्षांत राज्‍यात १३ जागांवर मिळालेले यश निश्चितच आनंददायी असे आहे. मात्र या यशामुळे आता माझ्यावरची जबाबदारीही
PR
तेवढी वाढली आहे. याची मला जाणीव आहे. आजवर रस्‍त्‍यावरून मांडलेले मुद्दे आता माझ्या आमदारांकरवी विधानसभेवर मांडले जातील आणि बाकीचं बघायला मी रस्‍त्यावर आहेच'', हे बोल आहेत महाराष्‍ट्र नवनिर्माण सेनेचे अध्‍यक्ष राज ठाकरे यांचे.


पहिल्‍याच विधानसभा निवडणुकीत १३ जागांवर विजय मिळविल्‍यानंतर आणि नाशिक, पुण्‍यासह मुंबईवरही आपले वर्चस्‍व सिध्‍द केल्यानंतर राज ठाकरे हे प्रथमच पत्रकार परिषदेला सामोरे गेले. यावेळी ते म्हणाले, की माझ्या पक्षाचे यश हे मी मांडलेला मुद्दा आणि मराठीसाठी दिलेल्‍या लढ्याला आलेले यश आहे. राज्‍यातील राजकीय समीकरणे बदलण्‍यास सुरूवात झाली असून आगामी पाच-सहा वर्षांत त्‍यात मोठा बदल झालेला दिसेल हे निश्चित.

शिवसेनेसंदर्भात कुठल्‍याही प्रश्‍नाचे उत्तर देणार नाही असे म्हणतानाच रामदास कदम यांना खरेतर गुहागरमधून उमेदवारी देण्‍याची गरज नव्‍हती असे मत मांडून त्‍यांनी नवी 'खेळी' खेळली आहे.

निकाल जाहीर झाल्‍यानंतर बाळासाहेबांशी कुठल्‍याही प्रकारचे बोलणे झालेले नसून त्‍यांचा आशिर्वाद घेण्‍यासाठी मातोश्रीवर जाणार नसल्‍याचेही त्यांनी एका प्रश्‍नाला उत्तर देताना सांगितले.