शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. महाशिवरात्री
Written By वेबदुनिया|

भगवान शंकराच्या हातातील त्रिशूळ का?

ND
त्रिशूळ हे भगवान शिवाचे प्रमुख अस्त्र आहे. त्रिशूळाकडे पाहा... तीन तीक्ष्ण टोक दिसतात. तसे पाहिले तर हे अस्त्र संहाराचे प्रतीक आहे. परंतु वास्तवात त्रिशूलामागे फार मोठा गूढ अर्थ दडला आहे.

या जगात तीन प्रकारच्या प्रवृत्ती आहेत... सत, रज आणि तम. सत म्हणजे सत्यगुण, रज म्हणजे सांसारिक आणि तम म्हणजे तामसी अर्थात निशचरी प्रवृत्ती. प्रत्येक माणसात या तीन्ही प्रवृत्ती आढळून येतात. फक्त या प्रवृत्तींचे प्रमाण प्रत्येकात वेगवेगळे असते.

त्रिशुळातील तीन टोक या तीन प्रवृत्तींचे प्रतिनिधीत्व करतात. भगवान शिव आपल्याला संदेश देतात की या तीन्ही गुणांवर आपले नियंत्रण आहे. हा त्रिशूळ तेव्हाच उचला जेव्हा कठीण परिस्थिती असेल. तेव्हा या तीन्ही गुणांचा आवश्यकतेनुसार वापर करा.