गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. महाशिवरात्री
Written By

महाशिवरात्रीला कसे करायचे पंच महापूजन

शिवरात्रीला उपास करणार्‍यांनी पांढर्‍या वाळूने शिवलिंग स्थापित करून फळ, पुष्प, चंदन, बेलपत्र, धतुरा, धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून षोडश उपचाराने महारात्रीची पाच वेळा पूजा करावी.
दूध, दही, तूप, मध आणि साखरेचा वेगवेगळा नंतर एकत्र करून पंचामृताने ‍महादेवाला अभिषेक करावे. चारी प्रहर पूजेत शिव पंचाक्षर ऊँ नम: शिवाय मंत्राचा जप करावा.
 
भव, शर्व, रुद्र, पशुपती, उग्र, महान, भीम आणि ईशान, या आठ नावांनी बेलपत्र, पांढरं फूल, राख, अत्तर, रुद्राक्ष, आणि नीलकमल अर्पित करून देवाची आरती करून प्रदक्षिणा घालावी.