testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

श्रीत्र्यंबकेश्वराची आरती

shivshankar
वेबदुनिया|
WD
जय जय त्र्यंबकराज गिरिजानाथा गंगाधरा हो । त्रिशूलपाणी शंभो नीलग्रीवा शशीशेखरा हो ।
वृषभारूढ फणिभूषण दशभुज पंचानना हो। विभूति माळा जटा सुंदर गजचर्मांबरधरा हो ॥धृ.॥
पडलें गोहत्येचें पातक गौतमॠषिच्या शिरींहो । त्यानें तप मांडिलें ध्याना आणुनि तुज अंतरी हो ।
प्रसन्न हौनि त्यातें स्नाना दिधली गोदावरी हो । औदुंबरमुळिं प्रगटे पावन त्रैलोक्यातें करी हो ॥ जय.॥१॥
धन्य कुशावर्ताचा महिमा वाचे वर्णूं कितीहो। आणिकही बहु तीर्थें गंगाव्दारादिक पर्वती हो ।वंदन मार्जन करिती त्यांचे महादोष नासती हो । तुझिया दर्शनमात्रें प्राणी मुक्तीतें पावती हो ॥जय.॥२॥
ब्रह्मगिरीची भावें ज्याला प्रदक्षिणा जरी घडे हो । तैं तैं काया कष्टे जंव जंव चरणी रुपती खडे हो ।
तंव तंव पुण्यविशेषें किल्मिष अवघें त्यांचे झडे हो । केवळ तो शिवरूपी काळ त्याच्या पायां पडे हो ॥ जय.॥३॥
लावुनियां निजभजनीं सकळहि पुरविसि मनकामना हो । संतति संपति देसी अंतीं चुकविसि यमयातना हो ।शिवशिव नाम जपतां वाटे आनंद माझ्या मना हो । गोसावीनंदन विसरे संसारयातना हो ॥जय.॥४॥


यावर अधिक वाचा :

जेव्हा राम आणि लक्ष्मणाचे अपहरण झाले होते..

national news
रावणाच्या सांगण्यावर अहिरावणाने युद्धाआधी युद्ध शिबिरात जाऊन राम आणि लक्ष्मणाचे अपहरण ...

श्री गजानन महाराजांचे शेगाव

national news
जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती असे म्हटलेच जाते. शेगावचे श्री गजानन महाराजही त्यातलेच ...

असा झाला होता श्रीकृष्णाचा मृत्यू...

national news
'जर' नावाच्या पारध्याचा बाण लागल्याने श्रीकृष्णाचा मृत्यु झाला. जाणून घ्या काय झाले ...

राम, लक्ष्मण आणि सीतेच्या देह त्यागाची कथा

national news
रामायणात राम राज्य स्थापित झाल्यानंतरची कथा फारच कमी लोकांना माहीत आहे, तुम्हाला माहीत ...

गंगादशहरा: काय करावे ?

national news
गंगादशहराच्या १० दिवसांच्या पर्वकाळात हे करावे:

राशिभविष्य