बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. महाशिवरात्री
Written By
Last Modified: शुक्रवार, 4 मार्च 2016 (11:41 IST)

35 वर्षांनंतर चांडाल योगात महाशिवरात्री, जाणून घ्या किती शुभ असेल...

चांडाल योगात महाशिवरात्रीचा संयोग 
 
या वर्षी सोमवारी महाशिवरात्रीचा संयोग बनत आहे. तसेच या दिवशी धनिष्ठा नक्षत्राचा योग असल्याने शिवरात्रीला खास मानले जात आहे.  सोमवारच्या दिवशी धनिष्ठा नक्षत्र असल्याने 'शुभ' नावाचा योग देखील बनत आहे, त्याशिवाय सिंहस्थ गुरु आणि राहूची युती चांडाल योग बनवत आहे.  
 
फाल्गुन कृष्ण पक्षाची चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री व्रत साजरे करण्यात येते. तसे तर महाशिवरात्री तेव्हा साजरी केली जाते जेव्हा शुक्र आपल्या उच्च मीन राशीत विद्यमान असतो आणि त्रिस्पर्शा युती अर्थात त्रयोदशी, चतुर्दशी व अमावास्यांची युती अर्ध्या रात्री निशिथ कालमध्ये महादेवाच्या पूजेला महत्त्व दिले जाते.   
 
या वर्षी शुक्र मीन राशीच्या जागेवर मकर राशीत विद्यमान राहील. या संवत वर्षात सिंहस्थ काल सुरू आहे अर्थात सिंह राशीत गुरु स्थित आहे आणि राहूच्या युतीसोबत चांडाल योगाची स्थिती बनत आहे. ही स्थिती किमान 35 वर्षांनंतर महाशिवरात्रीच्या दिवशी बनत आहे.  
 
म्हणून या वर्षी सोमवार, 7 मार्च 2016ला शुभ योग, चांडाल योगाची महाशिवरात्री साजरी करण्यात येईल.