शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. खाद्य संस्कृती
  3. उपवासाचे पदार्थ
Written By वेबदुनिया|

झांझरी लाडू

साहित्य : 250 ग्रॅम सिंघाड्याचे पीठ, 250 ग्रॅम साखर, वेलचीचे दाणे, मगजच्या बिया, तळण्यासाठी साजुक तूप.

कृती : सर्वप्रथम पिठाला बुंदीसाठी जसा घोळ तयार करतो तो करावा. साखरेचा 2 तारी पाक तयार करावा. तूप गरम करून झाऱ्याने बुंदी पाडून तळून पाकात घालावी. नंतर बुंदी पाकातून काढून घ्यावी. त्यात वेलचीचे दाणे व मगज बिया घालून आवडीप्रमाणे आकाराचे लाडू तयार करावे.