शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. महाशिवरात्री
Written By वेबदुनिया|

महाकालेश्वराच्या भात पूजनावर बंदी

ND
उज्जैन येथील श्री महाकालेश्वर मंदिरात भात पूजन केले जाते. या विधीत शिवलिंगावर मोठ्या संख्येने भाविक भात चढवतात. त्यामुळे शिवलिंगावर भात घट्ट बसतो. भात काढण्यासाठी ही शिवलिंगाला घासवे लागत असल्याने ही झीज होत असते. त्यामुळे यंदापासून भात पूजनही बंद करण्यात आली आहे

तसेच श्री महाकालेश्वर मंदिर संस्थान समितीने शिवलिंगाच्या अभिषेकासाठी पाच वेगवेगळी द्रव्ये एकत्र करून एक तंत्र पंचामृत पूजन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सर्वानुमते यंदा भात पूजनावर बंदी घालण्यात आली आहे. महाशिवरात्रीच्या दिवशी मंदिरात पूजा करताना दूध, तूप, दही, मध, साखर मोठ्या प्रमाणात शिवलिंगावर अर्पण करून ते जोरात घासले जाते.

या पूजेने शिवलिंगाची झीज होण्याची शक्यता लक्षात घेता समिती एक तंत्र पंचामृत पूजन करण्याचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे. शास्त्रोक्त व विद्‍वान परिषदेच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.