गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. महाशिवरात्री
Written By वेबदुनिया|

महादेवाचा अभिषेक तुमच्या रास प्रमाणे

शिवरात्रीच्या पूजेसाठी लागणारे साहित्य
अगरबत्ती, अत्तराची बाटली, चौरंग, बेलपत्र, शमीपत्र, शिवलिंग, शुद्ध माती, गणेशाची मूर्ती, शंकराला, गणेशाला, देवीला अर्पण करण्यासाठी वस्त्र, कलश (तांब्याचे किंवा मातीचे), पांढरे कापड (अर्धा मीटर), लाल कापड (अर्धा मीटर), पंचरत्न, आरती, मोठ्या आरतीसाठी तेल, तांबूल, श्रीफल (नारळ), धान्य (तांदूळ, गहू), पुष्प (गुलाब किंवा लाल कमळ), एका नव्या थैलीत हळकुंड, कापूर, केशर, चंदन, यज्ञोपवित ५, कुंकू, तांदूळ (अक्षता), अबीर, गुलाल, अभ्रक, हळद, दागिने, कापूस, शेंदूर, सुपारी, विड्याची पाने, फुलमाळा, कमलगट्टे, धने, सप्तमृत्तिका, सप्तधान्य, दूर्वा, पंच मेवा, गंगाजल, मध, साखर, शुद्ध तूप, दही, दूध, ऋतुफल, नैवेद्य किंवा मिठाई, वेलची (छोटी), लवंग, मोली, अत्तराची बाटली.

WD

पुढील पानावर पाहा पूजन विधी....


महाशिवरात्रीची पूजन विध
महाशिवरात्रीला शंकराची पूजा करण्यात येते. त्यासाठी प्रथम पूजा करणार्‍याने स्नान करून कोरे किंवा धुतलेले शुद्ध वस्त्र घालून मस्तकावर टिळा लावावा आणि शुभ मुहूर्तावर पूजा सुरू करावी. आसनावर बसून पूर्व किंवा उत्तर दिशेकडे तोंड करून पूजा करावी. येथे आम्ही या पूजेच्या विधीची माहिती देत आहोत.

WD

पुढील पानावर पाहा पंचदेव पूजन....


WD


पंचदेव पूजन
पंचदेव पूजनासाठी प्रथम देवतांचे ध्यान करून त्यांची पूजा करा...

विष्णूचे ध्यान
उद्यत्कोटिदिवाकराभमनिशं शंख गदां पंकजं
चक्रं बिभ्रतमिन्दिरावसुमतीसंशोभिपार्श्वद्वयम्‌।

कोटीरांगदहारकुण्डलधरं पीताम्बरं कौस्तुभै-
र्दीप्तं श्विधरं स्ववक्षसि लसच्छीवत्सचिह्रं भजे॥

ॐ श्री विष्णवे नमः,ध्यानार्थे अक्षतपुष्पाणि समर्पयामि ।
ॐ विष्णवे नमः, पाद्यं, अर्घ्यं, आचमन्यं, स्नानं समर्पयामि।

शिवाचे ध्यान
ध्यायेन्नित्यं महेशं रजतगिरिनिभं चारूचंद्रावतंसं
रत्नाकल्पोज्ज्वलांग परशुमृगवराभीतिहस्तं प्रसन्नम्‌ ।

पद्मासीनं समन्तात्‌ स्तुतममरगणैर्व्याघ्रकृत्तिं वसानं
विश्वाद्यं विश्वबीजं निखिलभय हरं पंचवक्त्रं त्रिनेत्रम्‌ ।

ॐ नमः शिवाय,ध्यानार्थे अक्षतपुष्पाणि समर्पयामि ।
ॐ नमः शिवाय, पाद्यं, अर्घ्यं, आचमन्यं स्नानं समर्पयामि।

गणेशाचे ध्यान
खर्वं स्थूलतनुं गजेन्द्रवदनं लम्बोदरं सुन्दरं
प्रस्यन्दन्मदगन्धलुब्धमधुपव्यालोलगण्डस्थलम्‌ ।

दन्ताघातविदारितारिरुधिरैः सिन्दूरशोभाकरं
वन्दे शैलसुतासुतं गणपतिं सिद्धिप्रदं कामदम्‌ ॥

ॐ श्री गणेशाय नमः,ध्यानार्थे अक्षतपुष्पाणि समर्पयामि ।
ॐ श्री गणेशाय नमः, पाद्यं, अर्घ्यं, आचमन्यं, स्नानं समर्पयामि।

सूर्याचे ध्यान
रक्ताम्बुजासनमशेषगुणैकसिन्धुं
भानुं समस्तजगतामधिपं भजामि।

पद्मद्वयाभयवरान्‌ दधतं कराब्जै-
र्माणिक्यमौलिमरुणांगरुचिं त्रिनेत्रम्‌॥

ॐ श्री सूर्याय नमः, ध्यानार्थे अक्षतपुष्पाणि समपर्यामि ।
ॐ श्री सूर्याय नमः, पाद्यं, अर्घ्यं, आचमन्यं, स्नानं समर्पयामि।

दुर्गा देवीचे ध्यान
सिंहस्था शशिशेखरा मरकतप्रख्यैश्चतुर्भिर्भुजैः
शंख चक्रधनुः शरांश्च दधती नेत्रैस्त्रिभिः शोभिता।

आमुक्तांगदहारकंकणरणत्काञ्चीरणन्नूपुरा
दुर्गा दुर्गतिहारिणी भवतु नो रत्नोल्लसत्कुण्डला॥

ॐ श्री दुर्गायै नमः, ध्यानार्थे अक्षतपुष्पाणि समपर्यामि ।
ॐ श्री दुर्गायै नमः, पाद्यं, अर्घ्यं, आचमन्यं, स्नानं समर्पयामि।

पुढील पानावर पाहा 12 रास आणि महाशिवरात्री अभिषेक....

WD


12 रास आणि महाशिवरात्री अभिषे

या दिवशी केलेल्या अभिषेकामुळे जातकांच्या पत्रिकेत कष्ट देणारे ग्रह देखील शुभ फल प्रदान करतात. महादेवाला प्रसन्न करण्यासाठी प्रत्येक राशीच्या जातकांसाठी उपाय सांगितले आहे.

मेष- मध, गूळ, उसाचा रस, लाल फूल वाहावे.

वृषभ- कच्चे दूध, दही, पांढरे फूल.

मिथुन- हिरव्या रंगांच्या फुलांचा रस, मूग, बिल्वपत्र.

कर्क- कच्चे दूध, लोणी, मूग, बिल्वपत्र.

सिंह- मध, गूळ, साजुक तूप, लाल फूल.

कन्या- हिरव्या रंगांच्या फुलांचा रस, मूग, बिल्वपत्र, हिरवे व निळे फूल.

तूळ - दूध, दही, तूप, लोणी, खडीसाखर.

वृश्चिक- मध, साजुक तूप, गूळ, बिल्वपत्र, लाल पुष्प.

धनू- साजुक तूप, मध, खडीसाखर, बदाम, पिवळे फूल, पिळवे फळ.

मकर- सरसोचे तेल, तिळाच तेल, कच्चे दूध, निळे फूल.

कुंभ- कच्चे दूध, सरसोचे तेल, तिळाचं तेल, निळे फूल.

मीन- ऊसाचा रस, मध, बादाम, बिल्वपत्र, पिवळे फूल, पिळवे फळ.