testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

कथा गांधींच्या हत्येच्या आणखी एका कटाची

gandhi ji
वेबदुनिया|

ND
सत्य आणि अहिंसेचा संदेश देणार्‍या महात्मा गांधींची हत्या ३० जानेवारी १९४८ रोजी झाली. पण त्या आधीही म्हणजे २० जानेवारीलाही दिल्लीतच प्रार्थना सभेतच त्यांच्या हत्येचा प्रयत्न झाला होता. पण सुदैवाने तो अयशस्वी ठरला होता. हल्लेखोराने त्यावेळी हातगोळाही फेकला होता. त्याचा स्फोट होऊन त्यात गांधीजी मारले जावेत अशी त्याची योजना होती.
गांधीजी त्या दिवशी नेहमीप्रमाणे प्रार्थना सभेत लोकांशी बोलत होते. पण नीट काम करत नव्हता. त्यामुळे गांधीजींचा आवाज नीट ऐकू येत नव्हता. सुशीला नायर त्यांचे म्हणणे पुन्हा एकदा मोठ्या आवाजात लोकांपर्यंत पोहचवित होत्या. त्याचवेळी स्फोटाचा जोरदार आवाज झाला.

या स्फोटानंतरही गांधीजी अविचल होते. घाबरलेल्या मनू गांधींना त्यांनी विचारलेही 'तुम्ही एवढे घाबरताय का? इथल्या सुरक्षा कर्मचार्‍यांना बंदुक चालवायचे प्रशिक्षण दिले जात असावे. खरोखरच तुम्हाला गोळी घालायला कुणी आलात तर मग काय कराल? अधिक चौकशीनंतर कळले, गांधीजींच्या जवळ म्हणजे ७५ फूटावर गन कॉटनचा स्फोट घडविण्यात आला होता.

या स्फोटाचा उद्देश लोकांचे लक्ष विचलीत व्हावे हा होता. या स्फोटानंतर त्यांची हत्या करू इच्छिणार्‍यांना गांधीजींच्या मागे असलेल्या कर्मचार्‍यांच्या निवासस्थानी हातगोळा फेकायचा होता. पण तो सिद्धीस जाऊ शकला नाही. पहिल्या स्फोटानंतर दिगंबर बाजे यास गांधीजींवर हातगोळा फेकायचा होता. पण आयत्या वेळी त्याने कच खाल्ली.

या हत्या कटात नथूराम गोडसे, नारायण आपटे, विष्णू करकरे, गोपाळ गोडसे, दिगंबर बाजे व शंकर किस्तायत यांचा समावेश होता. अयशस्वी ठरल्यानंतर ही मंडळी टॅक्सीत बसून फरारी झाली. पण त्यांच्यातला एक मदनलाल पाहवा यास पकडण्यात आले.

या प्रार्थनासभेत गांधीजी स्वातंत्र्य व विभाजनानंतर आलेल्या निर्वासितांची स्थिती तसेच पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व सरदार वल्लभभाई पटेल यांच्यातील मतभेदाविषयी चर्चा करत होते.


यावर अधिक वाचा :

गोलंदाजाच्या डोक्यावर चेंडू आदळून गेला षटकार

national news
क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे असे म्हटले जाते, मैदानावर काहीही होऊ शकते ज्यावर अनेकदा ...

हरमनप्रित कौर 1 मार्चपासून पंजाब पोलिसात रुजू होणार

national news
भारतीय महिला टी-20 क्रिकेट संघाची कर्णधार हरनप्रित कौर ही येत्या 1 मार्च रोजी पंजाब पोलीस ...

एक लग्नसोहळा दोन जुळ्यांचा

national news
अमेरिकेतील एक असे जोडपे समोर आले आहे जर ते एकत्र उभे राहिले तर समोरच्या व्यक्तीला ...

अवनी भारताची पहिली महिला फायटर पायलट

national news
भारतीय वायुसेनेतील फ्लाइंग ऑफिसर अवनी चतुर्वेदी हिने मिग-21 बायसन हे लढाऊ विमान एकटीने ...

नितीश कुमारांनी लालूच्या बंगल्यात सोडले भूत

national news
राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांचे मोठ पुत्र आणि बिहारचे माजी आरोग्यमंत्री ...

'आयडिया' देणार ४जी स्मार्टफोनवर २ हजार रूपयांचे कॅशबॅक

national news
आयडिया सेल्यूलर कंपनीने गुरूवारी एका नव्या ऑफरची घोषणा केलीये. ही ऑफर २३ फेब्रुवारीपासून ...

भारतीय भाषेत इमेल आयडी बनवण्याची सोय

national news
आंतरराष्ट्रीय मातृभाषा दिनाच्या निमित्ताने मायक्रोसॉफ्टने भारतीयांना खूषखबर दिली आहे. ...

सर्वसामान्य ग्राहकांचे मोबाईल नंबर हे १० आकडीच राहणार

national news
दूरसंचार विभागाने बीएसएनएल आणि इतर कंपन्यांना त्यांचे मशीन-टू-मशीन म्हणजेच एम-टू-एम ...

नोकिया 6चं 4GB रॅम व्हेरिएंट लॉन्च

national news
एचएमडी ग्लोबलने नोकिया 6 या फोनचं 4GB रॅम व्हेरिएंट लॉन्च केलं आहे. हा स्मार्टफोन ...

‘अॅपल’ च्या जाहिरातीमध्ये संगीतकार ए.आर.रहमान झळकला

national news
‘अॅपल’ च्या एका जाहिरातीमध्ये संगीतकार ए.आर.रहमान झळकला आहे. खुद्द रहमाननेच ट्विट करत ...