शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. आज-काल
  3. महात्मा गांधी
Written By वेबदुनिया|

कथा गांधींच्या हत्येच्या आणखी एका कटाची

ND
सत्य आणि अहिंसेचा संदेश देणार्‍या महात्मा गांधींची हत्या ३० जानेवारी १९४८ रोजी झाली. पण त्या आधीही म्हणजे २० जानेवारीलाही दिल्लीतच प्रार्थना सभेतच त्यांच्या हत्येचा प्रयत्न झाला होता. पण सुदैवाने तो अयशस्वी ठरला होता. हल्लेखोराने त्यावेळी हातगोळाही फेकला होता. त्याचा स्फोट होऊन त्यात गांधीजी मारले जावेत अशी त्याची योजना होती.

गांधीजी त्या दिवशी नेहमीप्रमाणे प्रार्थना सभेत लोकांशी बोलत होते. पण मायक्रोफोन नीट काम करत नव्हता. त्यामुळे गांधीजींचा आवाज नीट ऐकू येत नव्हता. सुशीला नायर त्यांचे म्हणणे पुन्हा एकदा मोठ्या आवाजात लोकांपर्यंत पोहचवित होत्या. त्याचवेळी स्फोटाचा जोरदार आवाज झाला.

या स्फोटानंतरही गांधीजी अविचल होते. घाबरलेल्या मनू गांधींना त्यांनी विचारलेही 'तुम्ही एवढे घाबरताय का? इथल्या सुरक्षा कर्मचार्‍यांना बंदुक चालवायचे प्रशिक्षण दिले जात असावे. खरोखरच तुम्हाला गोळी घालायला कुणी आलात तर मग काय कराल? अधिक चौकशीनंतर कळले, गांधीजींच्या जवळ म्हणजे ७५ फूटावर गन कॉटनचा स्फोट घडविण्यात आला होता.

या स्फोटाचा उद्देश लोकांचे लक्ष विचलीत व्हावे हा होता. या स्फोटानंतर त्यांची हत्या करू इच्छिणार्‍यांना गांधीजींच्या मागे असलेल्या कर्मचार्‍यांच्या निवासस्थानी हातगोळा फेकायचा होता. पण तो सिद्धीस जाऊ शकला नाही. पहिल्या स्फोटानंतर दिगंबर बाजे यास गांधीजींवर हातगोळा फेकायचा होता. पण आयत्या वेळी त्याने कच खाल्ली.

या हत्या कटात नथूराम गोडसे, नारायण आपटे, विष्णू करकरे, गोपाळ गोडसे, दिगंबर बाजे व शंकर किस्तायत यांचा समावेश होता. कट अयशस्वी ठरल्यानंतर ही मंडळी टॅक्सीत बसून फरारी झाली. पण त्यांच्यातला एक मदनलाल पाहवा यास पकडण्यात आले.

या प्रार्थनासभेत गांधीजी स्वातंत्र्य व विभाजनानंतर आलेल्या निर्वासितांची स्थिती तसेच पंतप्रधान जवाहरलाल नेहरू व सरदार वल्लभभाई पटेल यांच्यातील मतभेदाविषयी चर्चा करत होते.