testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2
Widgets Magazine
Widgets Magazine

बोरन्हाण अर्थात बोरलुट!

til gud
वेबदुनिया|
संक्रांत येणे हा वाक्प्रचार आपण वाईट गोष्टींसाठी वापरत असलो तरी सुर्यमालेतील पृथ्वी व सुर्याच्या परस्परसंबंधांतून निर्माण होणार्‍या ह्या 'मकरायणा'चा संबंध मराठी महिन्याबरोबरच 14 जानेवारी ह्या इंग्रजी तारखेशी आहे. त्यामुळेच इतर कोणतेही मागेपुढे होत असले तरी 'संक्रांत' बरोबर 14 तारखेसच येते.
संक्रांत सण हा आल्यास (नववधूचा लगेच पहिला सण किंवा अपत्याचा पहिला सण) तो न करता पुढच्या वर्षीची संक्रांत साजरी करण्‍याची प्रथा आहे. पण इतर एखादा तरी सण त्यांच्या आयुष्यात पहिला होऊन गेल्यास नंतर संक्रांत साजरी करण्यास कोणतीही अडकाठी नाही. जावयाला चांदीची वाटी, हलव्याचा नारळ देतात तर मुलीला हलव्याचा पूर्ण साज चढवला जातो. एरवी शुभकार्यात वर्ज्य असणारा काळा रंग व त्याची साडी दिमाखात मिरवायला मिळणारा हा सण आहे. तो प्रकार तान्ह्या बाळाच्या बाबतीतही आहे. त्यात ते बाळ जर बसू लागले असेल तर येणारी मजा काही औरच.

sankrant
त्याला हलव्याचे गळ्यातले हार, बाजुबंद, हातातले तसेच हलव्याचा मुकुट, बासरी आदी पांढर्‍याशुभ्र रंगबिरंगी हलव्यानी बनवून सजवले जाते. अंगात काळा अंगरखा, झबलं अंगावर हलव्याचा साज अशा वेषात सजलेली बाळं खरंच बाळकृष्णच दिसतात. त्या बालकृष्णाला मध्यभागी चौरंगावर बसवले जाते. त्याच्या आजूबाजूला इतर लहान मुलांना बसवले जाते. त्या मुलाच्या डोक्यावरून लाह्या, चुरमुरे, बोरं चॉकलेट, गोळ्या, बिस्किटे इत्यादी पदार्थांची ओंजळ ओतली जाते. 5 जणी, 11 जणी मिळून त्यावर हा वर्षाव करतात. त्यालाच म्हणायची प्रथा आहे. याला काही भागात असेही म्हणतात.

यामध्ये बाळाच्या कौतुकाचा भाग तर आहेच, पालकांची हौसही आहे. अन् त्या त्या ऋतुत येणार्‍या फळांना चाखण्याची सवय ही बाळांना लावणाचा हा अनोखा प्रयत्न म्हणावा लागेल. शीतळ शिमगा, बोरन्हाण ही त्याचीच प्रतीक आहेत.

बाळावर असाच सगळ्यांच्या प्रेमाचा वर्षाव होऊ दे. तो सुबत्तेत न्हाउ दे. कायम बाळगोपाळांनी घेरलेला म्हणजेच सर्वांचा लाडका होउ दे. ह्या भावनेने केलेला हा एक संस्कारच होय.


यावर अधिक वाचा :

स्त्रिया का नाही फोडत नारळ?

national news
हिंदू धर्मात पूजेसाठी श्रीफळाचे विशेष महत्त्व आहे. कोणत्‍याही देव-देवतांची पूजा नारळाविना ...

हे कामं करून लोकं देतात मृत्यूला निमंत्रण

national news
शास्त्रांप्रमाणे व्यक्तीची आयू 100 वर्ष निर्धारित केली गेली आहे. अलीकडे कोणी विरळच या ...

नाथ षष्ठी........

national news
नाथ षष्ठी........

एकनाथ षष्ठी : त्यानिमित्त ...

national news
संत या दोन अक्षरी मंत्राने सर्व पापे पळून जातात, षडरिपूंचा नाश होतो, संत सेवेचा महिमा ...

Kala Jadu: काला जादूबद्दल 5 गोष्टी

national news
भारतात अतीत कालापासून जादू, टोना, भूत प्रेत इत्यादी गोष्टी नेहमी होत राहतात. येथे तंत्र ...

राशिभविष्य