तमिळनाडूतील पोंगल

Widgets Magazine















तमिळनाडूत मकरसंक्रांत या उत्सवाच्या रूपात साजरी केली जाते. सौर पंचांगानुसार पोंगल महिन्याच्या पहिल्या तारखेला येतो. हा शेतकऱ्यांचा उत्सव मानला जातो. तो तीन दिवस असतो. पहिल्या दिवशी घरातील सगळा कचरा एकत्र करून जाळला जातो. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लक्ष्मीची पूजा केली जाते. तिसऱ्या दिवशी घरातील पशूधनाची पूजा केली जाते.

पोंगलच्या दिवशी स्नान करून अंगणात मातीच्या नव्या भांड्यात खीर बनवली जाते. त्याला पोंगल असे म्हणतात. त्यानंर सूर्याला नैवैद्य दाखविला जातो. मग ही खीर प्रसाद म्हणून लोक भक्षण करतात. या दिवशी मुलगी व जावयाला घरी बोलावून त्याचे आदरातिथ्य केले जाते. तिसऱ्या दिवशी घरातील जनावरांना सजविले जाते. त्यांची मिरवणूक काढली जाते. पोंगल या उत्सवात मुलींचे खूप महत्त्व आहे.

लोहडी
मकरसंक्रांत पंजाबामध्ये लोहडी म्हणून साजरी केली जाते. शीखांच्या दृष्टिकोनातून हा महत्त्वाचा उत्सव आहे. मकरसंक्रांतीच्या एक दिवस अगोदर लोहडी साजरी केली जाते. घरात नुकतीच सून आली असल्यास किंवा पहिला मुलगा झाला असल्यास या लोहडीचे महत्त्व काही वेगळेच असते.

मुलांसाठी लोहडी आनंदाचा सण असतो. दिवसभर मुले या लोहडीच्या तयारीत व्यस्त असतात. रात्री एका ठिकाणी होळी पेटवली जाते. तेथे सगळे कुटुंब जमा होते. मग या अग्नीची पूजा केली जाते. त्याभोवती प्रदक्षिणा घातली जाते. त्यानंतर प्रसाद वाटला जातो. प्रसादामध्ये तीळ, गजक, गुळ, शेंगदाणे व मक्याच्या लाह्या यांचा समावेश असतो.

अग्नी प्रज्ज्वलित केल्यानंतर त्याच्या सभोवताली तांदूळ, रेवडी आणि साखरफुटाणे यांची उधळण केली जाते. उपस्थित लोक ते उचलतात. या अग्नीतून मक्याच्या लाह्या वा शेंगदाणे जो कोणी उचलतो त्याची इच्छा पूर्ण होते, अशी समजूत आहे.

यानंतर नाच-गाण्याचा कार्यक्रम होतो. महिला एकत्र येऊन पारंपरिक गाणी म्हणतात. नाचतात. रात्रीच्या भोजनात मक्याची रोटी, सरसों का साग असते.

संपूर्ण कुटुंब एकत्र येऊन हा सण अतिशय आनंद साजरा करते.



Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

सण-उत्सव

news

'गज'वर स्वार होऊन येत आहे मकर संक्रांती

सूर्याने एका राशीतून दुसर्‍या राशीत जाणे म्हणजे 'संक्रमण करणे'. पौष महिन्यात सूर्य मकर ...

news

संक्रांतीवर सूर्याचा हा मंत्र आपल्यासाठी शुभ

मकर संक्रांतीवर सूर्याची आराधनासह आपल्या इष्ट देवाची आराधना करणेही शुभ ठरतं. जाणून घ्या ...

news

दत्ताचे 24 गुरु

ज्याप्रकारे सूर्य एकच असून वेगवेगळ्या माध्यमातून वेगवेगळ्या रूपात दिसतो, तसीच आत्माही एकच ...

news

दत्त जयंतीला नक्की जपा हे 2 मंत्र

पितृ दोषाने पीडित व्यक्तीचे जीवन अत्यंत कष्टाचं असतं. म्हणून ज्या मनुष्यांना पितृदोष ...