बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. मकरसंक्रांत
Written By वेबदुनिया|

तीळ-चेरी फ्लॅक्स

ND
साहित्य: 200 ग्रॅम. तीळ, 200 ग्रॅम. मावा, 50 ग्रॅम. बदाम, 1 लीटर दूध, 150 ग्रॅम. लोणी, 1 कप पाणी, 2 चमचे गोल्डन सिरप, 12-13 लाल चेरी, 1/2 चमचा व्हेनिला इसेंस.

कृती: सर्वप्रथम तीळ भाजून घ्यावे. चेरी स्वच्छ धुऊन पुसून घ्याव्यात. नंतर त्यांना चार भागत कापून घ्यावे. बदामाला पाण्यात भिजवून त्याचे साल काढून बारीक बारीक काप करावे. दुधात मावा घालून चांगले उकळून घ्यावे. त्यानंतर त्यात साखर घालून परत 5-10 मिनिट उकळी आणावी. हे मिश्रण खाली उतरवून त्यात तीळ आणि व्हेनिला इसेंस घालून चांगले एकजीव करावे. ताटाला लोणीचा हात लावून मिश्रण ओतावे. गार झाल्यावर सुरीने चौकोनी मध्यम आकाराच्या वड्या पाडाव्या.