मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. मकरसंक्रांत
Written By वेबदुनिया|

तीळ ड्रायफ्रूट पॅटीज

ND
साहित्य : 300 ग्रॅम. तीळ, 500 ग्रॅम. मावा, 1 वाटी नारळाचा किस, 18-20 बदाम, 1 चमचा इलायची पूड, 18-20 पिस्ते व मनुका, 300 ग्रॅम. पिठी साखर, 2 मोठे चमचे रवा.

कृती: सर्वप्रथम तीळ चांगले भाजून घ्यावे. तसेच मावा व रव्यालासुद्धा भाजून घ्यावे. नंतर तिळाचा कूट करून त्यात मावा, रवा व थोडी साखर आणि इलायची पूड घालावी.

सारण तयार करण्यासाठी बदाम, पिस्ता आणि थोडी इलायची पूड घ्यावी. एका पॉलिथीनचे तुकडे करून त्यावर थोडासा तुपाचा हात लावून तीळ, माव्याची पुरी लाटावी. त्यात मधोमध तयार केलेले सारण भरून चारीकडून पॅटीजचा आकार देऊन त्यावर बदाम-पिस्ता लावून सर्व्ह करावे.