गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. मकरसंक्रांत
Written By वेबदुनिया|

तीळ-मेव्याची चिक्की

- स्मिता

MHNEWS
साहित्य : 200 ग्रॅम भाजून वाटलेली तीळ, 100 ग्रॅम बदाम, पिस्ते काप केलेले, मनुका, चारोळी, अखरोड बारीक केलेले, 50 ग्रॅम खोबरं, 300 ग्रॅम साखर, 100 ग्रॅम गूळ, चिमुटभर लिंबू सत्व

कृती : एका भांड्यात साखर, गूळ घालून एवढे पाणी टाकावे की गूळ व साखर त्यात बुडावे, नंतर त्याची दीड तारी पाक करून त्यात चिमुडभर लिंबू सत्व टाकून गॅस बंद करावा. या पाकात वरील दिलेले सर्व प्रकारचे सुका मेवा व तीळ त्यात टाकावे आणि चांगल्याप्रकारे एकजीव करावे. त्यानंतर एक प्लास्टिकचा कागद घेऊन त्यावर हे मिश्रण टाकावे व वरून एक शीट टाकून त्याला लाटावे व आणि वरील शीट काढून त्याचे चौकोनी काप करावे.