गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. मकरसंक्रांत
Written By वेबदुनिया|

तीळ समोसा

ND
साहित्य : 2 कप मैदा, अर्धा कप पांढर्‍या तीळाचे कूट, अर्ध नारळ खवलेले, 2 मोठे चमचे बेसन, 2 मोठे चमचे पांढरी तीळ, 3-4 बारीक चिरलेल्या मिरच्या, 1 लहान चमचा धने पावडर, बारीक कापलेली कोथिंबीर, लाल तिखट, चिमुटभर अमचूर पावडर, चाट मसाला, चवीप्रमाणे मीठ, बेकिंग पावडर, तळण्यासाठी तेल.

कृती : बेसनाला थोडेसे भाजून त्यात तीळ पावडर, कापलेल्या मिरच्या, कोथिंबीर, नारळ, चाट मसाला, धने, अमचूर पावडर, तिखट आणि मीठ टाकून एकजीव करावे. मैद्यात पांढरे तीळ व बेकिंग पावडर, मीठ व मोहन टाकून कोंबट पाण्याने भिजून घ्यावे. मळून ठेवलेल्या गोळ्याची लहान लहान पुरी लाटावी व मधून त्याला कापावे त्यात तयार केलेला मसाला भरून समोसेचे कोपरे पाण्याने चांगल्या प्रकारे बंद करावे. नंतर त्याला तेलात तळून घ्यावे. लाल-हिरवी चटणी सोबत सर्व्ह करावे.