मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: बुधवार, 25 जुलै 2018 (09:07 IST)

मराठा क्रांती मोर्चातर्फे आज बुधवारी मुंबई बंदची हाक, काय आहे बंद नी सुरु

राज्याची राजधानी असलेल्या मुंबईला मराठा क्रांती मोर्चाने बंदाची हाक दिली आहे. आज १०० टक्के मुंबई बंद करण्याचा मानस आहे. मोर्चाच्‍या समन्‍वयकांच्‍या बैठकीत हा निर्णय घेण्‍यात आला आहे. बंदतून अत्यावश्यक सेवांना वगळण्यात आले आहे. यामध्ये शाळा आणि महाविद्यालयांचा समावेश आहे. तसेच शाळांच्या बसेसही सुरु ठेवण्यात येणार आहेत. अत्‍यावश्‍यक सेवांना या बंदमधून सूट देण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला. दहावी व बारावीची फेर परीक्षा असल्याने शाळा व महाविद्यालयांना बंदमधून वगळण्यात आले आहे. कोणत्‍याही खासगी वाहनाला रस्‍त्‍यावर फिरू दिले जाणार नाही, असे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. आज बुधवारचा बंद उत्‍सफूर्त असणार असून, मराठा क्रांती मोर्चाच्‍या मागण्‍यासंदर्भात सहानुभूती आहे, त्‍यांनी बंदला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन समन्‍वयकांतर्फे  केले आहे.
 
या सेवा सुरू : शाळा, महाविद्यालये, रक्तपेढ्या, रुग्णालये, रुग्णवाहिका, अग्निशमन दल, दूध टँकर, स्कूल बस, रेल्वे, मोनो, मेट्रो
 
या सेवा बंद : बेस्ट, एसटी, टॅक्सी, रिक्षा, खासगी वाहने, दुकाने, बाजारपेठा, उद्योग 
 
बंद दरम्यान कसे वागावे : 
 
कुठेही तोडफोड, जाळपोळ करू नये. प्रक्षोभक व्हिडीओ व्हायरल करू नये. सामाजिक तेढ निर्माण होणार नाही, याची काळजी घ्यावी. आंदोलन सरकारविरोधी असून त्यास जातीय रंग देऊ नये, असे आवाहन मराठा क्रांती मोर्चाकडून केले आहे.