testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मराठा मोर्चा : आमदारांच्या घरासमोर ठिय्या, थाळनाद आंदोलन

maratha aarakshan
लातूर| Last Modified शनिवार, 4 ऑगस्ट 2018 (17:29 IST)
मराठा आरक्षणाचा प्रश्न चिघळत चालला आहे. आता तो हिंसकही होत आहे. या आंदोलनात टप्प्याटप्प्याने मोहिमा राबवल्या जात आहेत. आधी निवेदने दिली. नंतर वर्षभर शिस्तीतले मूक मोर्चे काढण्यात आले. आता ठोक मोर्चाची भूमिका घेण्यात आली आहे. एक ऑगस्ट ते आठ ऑगस्ट मंत्री, आमदार आणि खासदारांच्या घरासमोर निदर्शने, ठिय्या आंदोलन करण्याचा उपक्रम सुरु आहे. परवा आ. अमित देशमुख यांच्या बाभळगावच्या घरासमोर ठिय्या आणि निदर्शने करण्यात आली. दरम्यान आ. अमित देशमुख गोव्याच्या दौर्‍यावर आहेत. ठिय्या आंदोलनावेळी आपण सर्वांशी बोललो असतो, मार्ग काढण्याचा प्रयत्न केला असता असं आ. अमित देशमुख आजलातूरशी बोलताना म्हणाले.
नाशिक : मराठा आरक्षण मुद्द्यावर आज सुरु असलेल्या ठोक
मोर्चाने आमदार देवयानी फरांदे यांच्या
निवासस्थानासमोर थाळीनाद आंदोलन
केले आहे. सोबतच सरकारचा निषेध करत मोर्चात फुट पाडणाऱ्या सरकारने पुरावे सादर करावे की कोणी लाभाची मागणी केली आहे. सरकारने निलेश राणे यांच्या मागून कोणतीही खेळी करू नये असे सुद्धा आज मराठा ठोक मोर्चाने स्पष्ट केले आहे.

समाजाच्या भावना लोकप्रतिनिधींनी सरकारपर्यंत पोहचविण्याची मागणी नाशिक जिल्हा सकल मराठा समाजाने शनिवारी (दि.४)आमदार देवयानी फरांदे यांच्या निवासस्थानासमोर थाळीनाद आंदोलन केले.आरक्षणांसह इतर महत्वाच्या मागण्यांसाठी
राज्यभरात मराठा समाज आक्रमक झाले आहेत. जिल्ह्यात आमदारांच्या निवासस्थानासमोर बोंबाबोब, थाळीनादासोहत ठिय्या आंदोलनाची मालिका सुरू केली आहे.

आज शनिवारी आमदार देवयानी फरांदे यांच्या निवासस्थानासमोर सुनिल बागूल यांच्या नेतृत्वात थाळीनाद आंदोलन करण्यात आले आहे.सरकार मराठा समाजाता गैरसमज निर्माण करून फुट पाडण्याच्या हेतूने लुडबुड्यांचा वापर करीत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तसेच मराठा आरक्षणाच्या प्रक्रीयेला गती देण्यासह, बिनव्याजी कर्ज पुरवठा, छत्रपती शाहु महाराज शिष्यवृत्ती, सारथी यासारख्या निर्णयांची अंमलबजावणी तत्काळ करावी आदि मागण्या करतानाच मराठा समाजाच्या आरक्षणासाठी पाठपुरावा करण्याची मागणी यावेळी करण्यात आल्या.आजच्या आंदोलनात करण गायकर, राजू देसले, तुषार जगताप, माधवी पाटील,पुजा धुमाळ, मनोरमा पाटील,चेतन शेलार, अ‍ॅड. शरद कोकाटे, शरद तुंगार आदी उपस्थित होते.


यावर अधिक वाचा :

Jio चा नवीन रेकॉर्ड, अडीच वर्षात ग्राहकांची संख्या 300 ...

national news
रिलायंस जिओने अडीच वर्षात 300 मिलियन ग्राहकांना जोडण्याचा आकडा पार केला आहे. रिलायंस ...

भारतीय निवडणुकीत बीबीसीचा नवीन पुढाकार, यूजर्सला मिळेल असा ...

national news
बीबीसी न्यूज भारतात 2019 च्या सामान्य निवडणुकीच्या आपल्या कव्हरेजमध्ये नावीन्य आणण्याचे ...

देवेंद्र फ़डणवीस महाराष्ट्राचंच नेतृत्व करतीलः नरेंद्र ...

national news
देवेंद्र फडणवीस चांगलं काम करत आहेत. महाराष्ट्रात उत्तम विकास होत आहे. भविष्यातही ...

पर्रिकर यांच्यासोबत निगडीत राफेल खरेदी प्रकरणावरुन शरद ...

national news
राज्यात मुख्यमंत्री देवेद्न फडणवीस भाजपची प्रचार यंत्रणा जोरदार पद्धतीने सांभाळत आहेत. ते ...

सुशीलकुमार शिंदेनी घेतली आंबेडकरांची भेट

national news
सोलापूर लोकसभा मतदारसंघात एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेले काँग्रेस नेते सुशीलकुमार ...

डिझेल प्यायल्याने बालकाचा मृत्यू

national news
पुण्याजवळील देहू येथे पाण्याऐवजी डिझेल प्यायल्याने बालकाचा मृत्यू झाला आहे. या मुलाला ...

बोट पाण्यात उलटली, तिघे बुडाले

national news
पुण्यातील जुन्नर तालुक्यातील माणिकडोह धरण परिसरात मासेमारी करत असताना अचानक बोट पाण्यात ...

पुणे पोलिसांकडेआली 'विचित्र' तक्रार

national news
पुणे पोलिसांकडे चक्क कोंबडा पहाटेच आरवतो असा तक्रार अर्ज एकाने दाखल केला आहे. हा विचित्र ...

मी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या बातम्या खोट्या

national news
मी काँग्रेसमध्ये जाणार असल्याच्या बातम्या खोट्या आहेत. माझ्याशी कुणीही संपर्क साधलेला ...

वंचित आघाडीमुळेच काँग्रेसचे नुकसान

national news
लोकसभा निवडणुकीच्या निकालात काँग्रेस-राष्ट्रवादीला मोठाफटका बसला आहे. मात्र अनेक ठिकाणी ...