बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By

मराठा मोर्च्याचा लीडर आहे सोशल मीडिया

- जुबैर अहमद (पुणे) 
 
ऑगस्ट महिन्यापासून सुरू असलेल्या मराठा आंदोलनाबाबत दावा करण्यात येत आहे की याचे नेतृत्व कुणाच्याही हातात नाही, हा एक मूक मोर्चा आहे. आतापर्यंत हे सत्य आहे. परंतू याचा एक लीडर आहे, सोशल मीडिया. दोन हजार मराठा वालंटियर्स (स्वयंसेवी) मोर्च्यासंबंधी संदेश पोहचण्याचे काम तर करतातच आणि मराठा समुदायाला यात सामील होण्यासाठी प्रेरितही करतात.
 
व्हॉट्स अॅप, फेसबुक, ट्विटर आणि इंस्टाग्राम सारख्या माध्यमाने मराठा आंदोलनाला जबरदस्त फायदा झाला आहे.
15 ऑक्टोबरला कोल्हापूर येथे मराठा रॅलीदरम्यान वाजलेली पारंपारिक तुतारीचा निनाद सर्वींकडे दुमदुमला. जे मोर्च्यात सामील होऊ शकले नाही त्यांनीही याची ध्वनी ऐकायला मिळाली आणि ती पण मोबाइलवर. हे काम आंदोलनाचा सोशल मीडिया सेल करत आहे. आतापर्यंत 25 हून अधिक मोर्चे निघून चुकले आहेत.
 
या मोर्च्यांचा कवरेज रियल टाइम अर्थात वास्तविकतेत सोशल मीडिया सेल करते. हे काम महाराष्ट्राच्या अनेक शहरांमध्ये लहान-लहान खोलीत केलं जातं. ज्याला हे वॉर रूम असे म्हणतात. आंदोलनाचा सोशल मीडिया सेल सुरू करण्यामागे एक कहाणी आहे.
 
भैय्या पाटिल एक सक्रिय वालंटियर आहे. ते सांगतात की मराठा आंदोलनाला सोशल मीडियाचा आधार का घ्यावा लागला. त्यांच्याप्रमाणे, "पारंपरिक मीडियाने सुरुवातीचे काही मोर्च्यांकडे दुर्लक्ष केले. मीडिया हे कवर करत नसल्यामुळे आम्ही सोशल मीडियाद्वारे आंदोलनाला पुढे वाढवायला सुरुवात केली."  
आज सोशल मीडिया सेल खूप सक्रिय आहे. याची एक वेगळी वेबसाइट आहे. ट्विटर, फेसबुक आणि इंस्टाग्रामाचे वेगळे पान आहे. एक- एक ट्विट हजारो वेळा रिट्वीट होत आहे.
 
प्रत्येक मोर्चा काढण्यापूर्वी लोकांना सोशल मीडियाद्वारे सूचित केलं जातं. ही टीम रॅली दरम्यान ड्रोनद्वारे काढलेले फोटो आणि रिकॉडेड गाणी रियल टाइममध्ये सोशल मीडियावर अपलोड करते. सोशल मीडियाचे हे माध्यम मराठा क्रांती मोर्चा नावाने चालवण्यात येत आहे.
 
पुण्यात तीन लोकांची एक लहान टीम आहे परंतू यांचे काम मोठे आहे. येथील लहान खोलीतून ते एकाप्रकारे पूर्ण मोर्चा कंट्रोल करतात.
जुलैमध्ये एक मराठा मुलीबरोबर बलात्कार आणि हत्येनंतर सुरू करण्यात आलेल्या या आंदोलनात सामील मराठा समुदायाच्या अनेक मागण्या आहेत. ज्यात कोपर्डी प्रकरणातील दोषी आरोपींना फाशी व्हावी, मराठांना शिक्षण आणि नोकरीत आरक्षण मिळावे हे विशेष आहे. आतापर्यंत निघालेल्या मोर्च्यांमध्ये लाखो लोकं सहभागी झाले.
 
भैय्या पाटिल म्हणतात की यामागे सोशल मीडियाचा मोठा हात आहे. अनिल माने कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी आहे तरी सोशल मीडिया सेलला खूप वेळ देतात. " आपल्या मराठा समाजासाठी काही केले पाहिजे असे माझ्यात मनात आले म्हणून मी सोशल मीडियाच्या माध्यमाने आपल्या समाजाला संदेश पाठविण्याचे ठरविले आणि यात सामील झालो. ''  
 
म्हणतात हे आंदोलन लीडरलेस आहे अर्थात याचा कोणीही नेता नाही. याची सूत्रे काही मराठा संस्थानांच्या हातात आहे ज्यांना सोशल मीडियाच्या महत्त्वाचा चांगलाच अंदाज आहे.
 
हृषीकेश हा एक तरुण आहे सोशल मीडियाला स्वखुशीने आपला वेळ देतो. तो कोणत्याही क्रांतीमध्ये संचार माध्यमाचा महत्त्व ओळखून आहे. लोकांपर्यंत पोहचण्यासाठी सोशल मीडिया सर्वात जलद मार्ग आहे. "देशाच्या पहिल्या स्वातंत्र्याच्या लढाईत (सन 1857) मध्ये पोळ्या आणि पक्ष्यांच्या पायावर संदेश पाठवले जात होते. संदेश पोहचायला काही दिवस लागायचे परंतू आता काही सेकंदात पूर्ण दुनियेत पोहचतात.
 
या वालंटियर्सप्रमाणे सोशल मीडियाचे यश बघितल्यानंतर जे मीडिया हाउस आतापर्यंत मोर्च्यांकडे दुर्लक्ष करत होते ते ही मोर्चे कवर करत आहे. पण सोशल मीडिया असताना आता पारंपरिक मीडियाची गरज नाही.