शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: शनिवार, 24 सप्टेंबर 2016 (14:01 IST)

नाशिकमध्ये मराठा क्रांती मोर्चा सुरू

मराठा क्रांती मोर्चाला नाशिकमध्ये सुरुवात झाली आहे. मुंबई आणि पुण्याच्या महामोर्चांची रंगीत तालीम म्हणून नाशिकच्या मोर्चाकडे पाहिले जात आहे. आतापर्यंत लाखोच्या संख्येने मराठाबांधव जमले आहेत. तसेच अनेक नेते मंडळीही मोर्चात सामील झाले आहेत. मोर्चात खासदार उदयनराजे भोसलेही सामील झाले आहेत. तसेच महापौर अशोक मुर्तडक, राज्यमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे, भाजप आमदार डॉ. अपूर्व हिरे, शिवसेना आमदार अनिल कदम, योगेश घोलप आणि सीमा हिरे आदी नेते उपस्थित आहेत. तपोवनातून मोर्चा सुरु झाला आहे.