शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: सोमवार, 26 सप्टेंबर 2016 (10:42 IST)

पेशव्यांच्या राजधानीत मराठ्यांचा यल्गार

पेशव्यांची राजधानी आणि सध्याची  असलेली महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुण्यात मराठा क्रांती मूक मोर्चा पूर्ण झाला आहे. मोर्चात अनेक राजकीय नेथे आणि त्या सोबत अनेक नेते  सहभागी होण्यासाठी आंतराष्ट्रीय धावपटू ललिता बाबर, गायिका कार्तिकी गायकवाड यांच्यासह सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवरही उपस्थित झाले होते. 
 
या मोर्चात लाखोंच्या संख्येने मराठा बांधव सहभागी झाले होते. यावेळी हा मोर्चा  पुण्यातल्या अलका टॉकिज चौकातून या मोर्चाला सुरुवात झाली होती तर मुलींच्या ५ प्रतिनिधी मंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले आणि मोर्चाची सांगता झाले आहे. मोर्चात सर्वात आधी महिला त्यानंतर वकील, डॉक्टर शेतकरी अशी उपस्थिती होती.
 
हा मोर्चा साधारण तीन तास पेक्षा अधिक चालला होता मात्र५ अगदी शिस्तबद्ध प्रकारे. पोलिसांनी हा मोर्चा शांततेत पार पडावा यासाठी जय्यत तयारी केली. पुण्यातले अनेक मुख्य रस्ते बंद वाहतुकीसाठी बंद करण्यात आले होते. 
 
तर दुसरीकडे, या मोर्च्यात उदययन राजे,अजित पवार,हर्षवर्धन पाटील, विश्वजीत कदम, भाई जगताप शिवसेनेचे शिरूरचे खासदार शिवाजी आढाळराव पाटील मावळचे खासदार श्रीरंग बारणे, जलसंपदा राज्य मंत्री विजय बापू शिवतारे, माजी आमदार विनायक निम्हण आणि महादेव बाबर देखील सहभागी झाले होते.