बुधवार, 24 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. हिंदू
  4. »
  5. आरती संग्रह
Written By वेबदुनिया|

श्रीकृष्णाची आरती

ऐकोनी कृष्णकीर्ती मन तेथें वेधलें।
सगुणरुप माये माझ्या जीवीं बैसलें।
तें मज आवडतें अनुमान न बोले।
पाहावया रूप याचें उतावीळ हो झालें।।1।।

यालागीं आरती हो कृष्णा पाही हो सखी।
आणिक नावडे हो दुजे तिहीं हो लोकीं ।।धृ।।

पाऊल कृष्णजीचें माझ्या जीवीं बैसलें।
सनकादिक पाहा महा आसक्त झाले।
मुक्त जो शुकमुनी तेणें मनीं धरिलें।
तें मी केवीं सोडूं मज बहू रुचलें।।2।।

निर्गुण गोष्टी माये मज नावडे साचें।
सगुण बोल कांही केव्हां आठवी वाचें।
पाया लागेन तुझ्या हेंचि आर्त मनींचें।
तेणें घडेल दास्य रमावल्लभाचें।।3।।