शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. »
  3. ग्रहमान
  4. »
  5. ज्योतिष 2011
Written By वेबदुनिया|

देशाचा सर्वांगीण विकास होईल!

भारत वर्ष- भारत वर्षाचा कायदेशीर जन्म 15 ऑगस्ट, 1947 रोजी रात्री 12 वाजता झाला होता. भारताच्या कुंडलीत वृषभ लग्न 6 वर्ष सूर्याच्या महादशेत 11 सप्टेंबर, 2009 ते 11 सप्टेंबर 2015 पर्यंत राहणार आहे.

भारताच्या कुंडलीत तृतीय भावात - सूर्य, चंद्र, शनी, बुध आणि शुक्र पंचग्रही योग असून राजयोग बनत आहे आणि सूर्याच्या महादशेत मंगळ-राहूचे अंतर 2011 पर्यंत राहणार आहे. ज्याने देशाचा विकास होईल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर महाशक्तीच्या रूपात उभारून येईल.

गोचरामध्ये शनीच्या काळ्या सावलीमुळे -महागाईत वाढ होईल. त्यामुळे देशातील दक्षिण-पूर्वी क्षेत्रात उग्रवाद व माओवादी नक्षलवाद सारखे आंतकी हल्ले वाढतील. भारताला दोन देशांकडून धोका राहण्याची दाट शक्यता आहे. सीमा विवाद वाढेल आणि शनीमुळे रेल्वे, वायुयान, अग्निकांड, राष्ट्रव्यापी बंद, आंदोलनामुळे जनहानी होण्याची भीती आहे.

या वर्षाच्या मध्यात समुद्री तुफान, पूर, भूकंप सारख्या स्थिती बघायला मिळतील. राजकारणातील उच्च पदावर असणाऱ्या एका राजनेतेची मृत्यू वायुयान दुर्घटनेत होण्याचे योग आहे. सूर्याच्या महादशेत भारताचा आर्थिक बॅरोमीटर शेयर बाजार संवेदी सूचकांक 22,000 हजाराचा उच्चांक गाठेल.

आंतरराष्ट्रीय बाजारात तेजीमुळे किमती धातू सोनं-चांदी व क्रूड ऑयलमध्ये भारी वाढ होईल. चांदीचे भाव 40,000 रु. प्रती किलो, सोन्याचे भाव 22,000 प्रती दहा ग्रॅम, चांदी कलदार 50,000 हजार शेकडा इतपत होण्याची शक्यता नाकारता येत नाही. डीझल व पेट्रोलचे भाव वाढतील.

पुढील ऑलिंपिक खेळांमध्ये भारताला तीन सुवर्ण पदक मिळतील. खेळ, बॉलीवूड, राजनिती आणि इतर दुसऱ्या क्षेत्रात महिलांचा सर्वोच्च राहील. देशाची आर्थिक प्रगती होईल आणि आंतरराष्ट्रीय लष्करी डावपेचांत भारताचे वर्चस्व वाढेल. विदेशी गुंतवणूकदारांच्या नजरेत भारत सर्वोपरी राहील.