शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2016
Written By
Last Updated : मंगळवार, 29 डिसेंबर 2015 (16:46 IST)

कर्क राशीच्या जातकांचे 2016 मधील संपूर्ण वार्षिक राशिभविष्यफल

कर्क राशीच्या लोकांना गुरुची व इतर महत्त्वाच्या ग्रहांची साथ असल्यामुळे दृष्टीकोण आशावादी बनेल. तुमच्या उत्साही स्वभावाला भरपूर वाव मिळेल. घरगुती जबाबदाऱ्या, करियरमधील महत्त्वाचे आणि मोठे उद्दिष्ट गाठण्याची इच्छा बऱ्याच प्रमाणामध्ये सफल होईल.

पुढे वाचा गृहसौख्य व आरोग्यमान...
गृहसौख्य व आरोग्यमान... :  कर्क राशीच्या व्यक्तिंना वैयक्तिक जीवनात हे एक अद्भुत आनंदाचं वर्ष राहील. परंतु, कुटुंबातील सदस्यांसोबत तुमची घनिष्टता तितकीशी चांगली राहणार नाही. या राशीचे काहीजण अन्य जातीच्या जोडीदाराच्या प्रेमात पडतील. परंतु, हा जोड भक्कम दिसतो. यावर्षी तुमच्या लैंगिक आकांक्षांना आवर घाला. तुमचं लैंगिक जीवन समरस ठेवण्यासाठी, हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. तुमच्या तब्येतीबद्दल तुम्ही काळजी घेतली पाहिजे, अन्यथा कोणताही मोठा आजार तुम्हाला उद्भवू शकतो. घरामधला एखादा सदस्य आणि त्याच्या 
समस्या यामुळे जुल ते सप्टेंबर या दरम्यान एक प्रकारची चिंता राहील. त्यानंतर हळूहळू वातावरण निवळू लागेल. येत्या वर्षांत महत्त्वाचे निर्णय शक्यतो जानेवारीपर्यंत घ्या.
 
गृहसौख्याच्या दृष्टीने नवीन वर्ष थोडेसे खडतर आहे. प्रत्येक बाबतीत इतरांच्या तुमच्याकडून बऱ्याच अपेक्षा असतील. त्याचे श्रेय देताना मात्र त्यांच्याकडून आढेवेढे घेतले जातील. पूर्वी ठरलेले घरगुती कार्य जानेवारीपर्यंत पार पडेल. त्यानंतर एप्रिलपर्यंत तुम्ही घरगुती जबाबदारीमध्ये जखडून जाल. त्याच वेळी प्रकृतीकडे लक्ष देणे भाग पडेल. एप्रिलनंतर हळूहळू एखाद्या वेगळ्या समस्येची जाणीव व्हायला सुरुवात होईल. मुलांच्या प्रश्नांकडे लक्ष देणे भाग पडेल.
पुढे वाचा धंदा, व्यवसाय व नोकरी....
धंदा, व्यवसाय व नोकरी.... : व्यापार उद्योगात वर्षांची सुरुवात आनंदात होईल. एखादे फायदा मिळवून देणारे काम तुमच्या नजरेच्या टप्प्यात असल्यामुळे तुम्ही अविश्रांत मेहनत घ्याल. जानेवारी ते मार्च या कालावधीत एखादी पूर्वीची जबाबदारी हाताळावी लागेल. या कालावधीमध्ये जरी पसे मिळाले तरी खर्च वाढण्याचे संकेत मिळतील. जुल ते सप्टेंबर हा कालावधी डोकेदुखीचा ठरेल. मनामध्येच एक प्रकारची धास्ती असेल की, की पशाचे आणि इतर गणित जमून येईल की नाही. सप्टेंबरनंतर त्यावर तुम्ही चांगला तोडगा शोधून काढाल. 
 
येत्या वर्षांत जुनी कोर्टप्रकरणे शांततेने हाताळा. तुमच्या आर्थिक व्यवहारांबाबत काळजी घ्या. कोणावरही अंध विश्वास ठेवल्यास आर्थिक तोटा होऊ शकतो. तुमचे डोळे आणि कान उघडे ठेवणं उत्तम, कारण कोणी तुमच्याविरुद्ध कट करु शकतो. वर्ष नोकरीतील बदलासाठी सर्वोत्कृष्ट आहे; म्हणून, हा बदल करण्याच्या तुमच्या नियोजनाचे प्रयत्न वाढवा. काही जणांवरील कामाचा भार वाढेल, त्यामुळं त्यांचा पगार देखील वाढेल. 
 
नोकरदार व्यक्तींना येत्या वर्षांत नवीन आव्हाने स्वीकारण्याचा आनंद मिळेल. डिसेंबरपूर्वी महत्त्वाची जबाबदारी हातावेगळी केल्याचे समाधान लागेल. जे काम इतरांना अवघड वाटत होते ते काम वरिष्ठ जानेवारीच्या सुमारास तुमच्यावर सोपवतील. तुम्हीही त्यांच्या विश्वासाला पुरून उराल. मात्र शारीरिक श्रम आणि तणाव वाढेल. हे काम एप्रिलपर्यंत पूर्ण होईल. त्यानंतर ऑगस्टपर्यंत वरिष्ठ आवळा देऊन कोहळा काढण्याचा प्रयत्न करतील. हा कालावधी मानसिकदृष्टय़ा तणावाचा जाईल. सप्टेंबरपासून पुढे पुन्हा एकदा तुम्ही नवीन रामरगाडय़ामध्ये 
स्वत:ला हरवून बसाल. एकंदरीत नवीन वर्षांत पसे मिळतील, परंतु विश्रांती अशी मिळणार नाही. प्रमोशन नजरेच्या टप्प्यात येईल, पण त्याची कसर वरिष्ठ इतर सवलतींच्या रूपाने भरून काढतील.
 
तरुण मंडळींनी कठोर परिश्रमाला पर्याय नाही हे लक्षात ठेवावे. जे पसे त्यांना मिळतील त्याच्या बदल्यात मोठी जबाबदारी स्वीकारावी लागेल. कलाकार आणि खेळाडूंनी कोणत्याही वादविवादात न पडता आपले काम करीत राहावे. त्यांना त्यांचे कौशल्य वाढवावे लागेल. विद्यार्थ्यांना येते वर्ष एकंदरीत साधारण यश देणारे आहे.