शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2016
Written By
Last Modified: बुधवार, 23 डिसेंबर 2015 (16:52 IST)

जाणून घ्या, काय म्हणतात वर्ष 2016चे सितारे

नववर्षाचे नाव 'सौम्य संवत्सर' राहील. या वर्षाची कुंडली म्हणते- 
*  इंडोनेशियात अशांती राहील. दहशतवादी हल्ले होण्याची शक्यता असेल. इतर देशांसह संबंध सुधारतील. 
 
*  अमेरिकेची आर्थिक परिस्थिती नाजूक असेल. मोठे संकट निर्माण होईल. अमेरिकेचे चीनसोबत संबंध चांगले नसणार.
 
*  राहू ग्रहामुळे युके मध्ये आर्थिक परिस्थिती कमकुवत राहील. राजकारणात फेरबदल होण्याची शक्यता आहे.
 
*  दुबईची विज्ञान आणि संशोधनात प्रगती होईल, ज्याने आर्थिक स्थिती सुधारेल. इतर देशांसह परस्पर समन्वय वाढण्याची शक्यता आहे.
 
*  पाकिस्तानात अंतर्गत हल्ले आणि दहशतवादी हल्ले वाढतील, ज्याने इतर देशांसह जवळीक आणि परस्पर समन्वय कायम राहणे कठिण होईल.
 
*  दक्षिण आफ्रिकेत अंतर्गत अशांतता आणि बंड होण्याची शक्यता आहे.
 
*  जागतिक पातळीवर भारताच्या आर्थिक परिस्थिती सुधारणा होईल. स्त्रियांना सन्मान मिळेल. महिलांना संधी मिळेल. रोजगार मध्ये महिलांच्या प्रमाणात वाढ होईल. विज्ञानात महिलांची रुची वाढेल.
 
*  भारतात गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी पाऊस चांगला होईल. देशात नवीन तंत्रज्ञान वापरून त्यात यश मिळवण्याचा प्रयत्न होईल. देशात भ्रष्टाचार कमी होण्याची शक्यता असेल. देशात राजकीय पक्षांमध्ये मतभेद  वाढण्याची शक्यता आहे. 
 
*  विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष यश आणि प्रगती देणारं ठरेल. भविष्यासाठी नवीन मार्ग खुलतील, तसेच विज्ञानाच्या क्षेत्रात प्रगती होईल.
 
*  महिलांच्या तुलनेत पुरूष प्रगतीच्या बाबतीत कमकुवत राहतील. राहूचा जप आणि हनुमानाची उपासना केल्याने यश प्राप्त होऊ शकतं.
 
जगातील व्यावसायिक परिस्थिती सुधारणा होईल. ग्रहांप्रमाणे दहशतवादावर शिकंजा वाढेल. मुस्लिम देशांमध्ये आपसात संबंध बिगडतील. नेपाळ देश जागतिक पातळीवर शिखर गाठेल. भारताची परिस्थितीही चांगली राहील.