गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2016
Written By
Last Updated : मंगळवार, 29 डिसेंबर 2015 (16:24 IST)

वृषभ राशीच्या जातकांचे 2016 मधील वार्षिक राशिभविष्यफल

वृषभ राशीच्या मंडळींचे नूतन वर्षांच्या सुरुवातीला गुरूसारखा शुभ ग्रह सुखस्थानात आहे. पण त्यामानाने इतर ग्रहांची फारशी साथ नसल्यामुळे थोडीशी कष्ट करण्याची तयारी ठेवा. जानेवारी-मार्च हा कालावधी महत्त्वाच्या कामांना गती देण्यासाठी चांगला आहे. त्यानंतर पुढचा कालावधी बराच खळबळजनक जाईल. अशा वेळी तुमचे चित्त स्थिर ठेवणे आवश्यक आहे. सुप्त कलागुणांना वाव मिळेल. जुलैपर्यंतचा काळ नियोजनबद्ध आणि संथ प्रगतीला चांगला आहे. 
पुढे वाचा गृहसौख्य व आरोग्यमान...
गृहसौख्य व आरोग्यमान... : वृषभ राशीच्या मंडळींना या वर्षभरात बहार राहील. जोडीदारासोबत नातं शुद्ध आणि प्रेमळ राहिलं तर सर्वकाही सुरळीत राहील. यंदाचं वर्ष आपलं वैवाहिक जीवन सौख्यपूर्ण राहील आणि आपल्या जोडीदारासोबत तुम्ही आनंदाचे क्षण जपून ठेवाल. प्रेम जीवन बहरेल, त्यातून तुम्हाला सर्व प्रकारचा आनंद मिळेल. आतून सुखद भावना असेपर्यंत कोणतीही गोष्ट सहजप्राप्य राहील. परंतु, तुमच्या लैंगिक आकांक्षांमुळं आपलं लक्ष विचलित होऊ शकतं. यातून बेकायदेशीर प्रकरणं उद्भवू शकतात. अशा गोष्टींचे परिणाम काय होतात हे कळण्याइतके आपण हुशार आहातच; म्हणून, त्यांच्यापासून दूर राहा. गुरुसारखा शुभ ग्रह चतुर्थात असल्यामुळे आरोग्याची साथ वर्षभर लाभेल. येत्या वर्षांत वैवाहिक जीवनात पदार्पण होईल.
 
कौटुंबिक जीवनामध्ये बऱ्याच घडामोडी घडल्यामुळे वर्ष सुरू कसे झाले आणि संपले कुठे याचा तुम्हाला पत्ता लागणार नाही. एकत्र कुटुंबपद्धती न ठेवता घरामधल्या काही जणांना स्वतंत्र बिऱ्हाड करावेसे वाटेल. घटस्फोटाच्या मार्गावर असणाऱ्यांना ‘एक घाव दोन तुकडे’ करून प्रश्न सोडवावासा वाटेल. जानेवारी २०१५ ते फेब्रुवारी २०१६ आणि सप्टेंबर २०१६ ते नोव्हेंबर २०१६ हा कालावधी त्यातल्या त्यात शांततेत जाईल.

पुढे वाचा धंदा, व्यवसाय व नोकरी....
धंदा, व्यवसाय व नोकरी.... : नोकरवर्गाला कदाचित काही समस्या भेडसावतील. व्यवसायिकांना नफा होईल, तत्काळ नाही परंतु हळूहळू. शेवटी, यावर्षी आर्थिक स्थिती उत्तम राहील. तुम्ही भरपूर पैसे कमवाल. 2016 मध्ये तुम्हाला आर्थिक दृष्टिने बरेच लाभ मिळणार आहेत. व्यापार आणि उद्योगाच्या दृष्टीने वर्षांची सुरुवात थोडीशी शांत आणि सुस्त वाटेल. जानेवारीपासून एखाद्या नवीन उपक्रमाला सुरुवात करावीशी वाटेल. व्यापारामध्ये बाजारातील स्पर्धकांना मागे टाकण्यासाठी मार्चपूर्वी तुम्ही एखादे धाडस कराल. त्याचा परिणाम ऑगस्टच्या सुमारास कळेल. भागीदारी किंवा मत्री कराराच्या संबंधात काही महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुमच्या कार्यपद्धतीमध्ये बराच फरक पडेल. बराच काळ चालू असलेले एखादे काम संपल्यामुळे सप्टेंबरनंतर नवीन प्रोजेक्टला सुरुवात होईल. उत्पन्नात वाढ झाल्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल.
 
नोकरदार व्यक्तींना जानेवारीपर्यंत स्वास्थ्यकारक कालावधी आहे. जानेवारीनंतर हळूहळू कामाचा वेग आणि व्याप दोन्ही वाढणार आहे. मार्चनंतर वरिष्ठ अचानक तुमच्या कार्यपद्धतीत बदल करतील. काही जणांची लांबच्या ठिकाणी बदली होईल. 
 
तरुणांना करियरमधल्या प्रगतीकरिता घरापासून लांब राहावे लागेल. जानेवारी ते मार्च किंवा सप्टेंबर २०१६ नंतर त्यांना बढतीचे योग संभवतात. 
 
कलाकार आणि खेळाडूंना चांगले काम करता येईल. पण त्यांना त्यासाठी तीव्र स्पर्धाना तोंड द्यावे लागेल. काही विचित्र अनुभव येण्याची शक्यता आहे.