गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2017
Written By

2017 वार्षिक टॅरो भविष्यफल

मेष टॅरो कार्ड राशिभविष्य 2017
 
टॅरो कार्ड रीडिंगप्रमाणे या वर्षी मेष जातकांना जे हवं असेल ते मिळेल. अनओळखी महिलांशी दूर राहण्याचा प्रयत्न करा कारण यातून एखादं व्यक्ती आपल्यासाठी अडथळा निर्माण करू शकते. आपण एका योद्धाप्रमाणे सर्व समस्यांवर विजय प्राप्त कराल. अशक्य या शब्द या वर्षी आपल्या डिक्शनरीतच नाही. पूर्वी हाती लागलेले अपयश अडथळे घालतील तरी आपण त्यांवर मात कराल. नकारात्मकता आपल्यावर हावी होणार नाही. आपले प्रयत्न आपल्याला योग्य पायरीवर नेऊन सोडतील. अनेक गोष्टींमध्ये अनिच्छा जाहीर करण्यामुळे अडथळा निर्माण होऊ शकतो म्हणून हाती आलेल्या संधीबद्दल अधिक विचार करू नका. आता वेळ निघाली तर रिकाम्या हाती राहावे लागेल. आपल्याला लव लाईफमध्ये निराशा हाती लागू शकते परंतू घरात उत्साहाचे वातावरण राहील. बाह्य व्यक्ती आपल्या हेतूसाठी आपल्या भावनांशी खेळ करेल. येणार्‍या दिवसांमध्ये खूप काही प्राप्त होईल पण भीतीमुळे आपण ते गमावून बसेल जे आपलं आहे. आशा- निराशा आणि संवेदनशील असूनही हे वर्ष आपल्यासाठी सुखकारक राहील. 


वृषभ टॅरो कार्ड राशिभविष्य 2017 
टॅरो कार्ड राशिफलप्रमाणे वृषभ राशीच्या जातकांची जीवनशैली खूप सक्रिय राहील आणि ते सर्व कामांना प्रखरतेने प्रखरतेने परिणामापर्यंत पोहचवतील. कामामुळे यात्रा होऊ शकतात. परंतू हे प्रवास आपल्या व्यक्तिगत योजनांवर प्रतिकूल प्रभाव टाकतील. भाग्य आणि व्यक्तित्व आपल्या पक्षात राहील. करियरबद्दल विचार करत असाल तर मीडिया आणि कम्युनिकेशन उत्तम पर्याय साबीत होतील. जीवनात बदल म्हणून नवीन स्रोत प्राप्त होतील. पूर्वीप्रमाणे या वर्षीही प्रेयसीसह संस्मरणीय वेळ घालवाल. आपले प्रयत्न भविष्यात आपल्याला मजबूत आणि कार्य कुशल बनवतील परंतू जिंकण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागेल. आपल्याला खूप पुढे निघायचे आहे म्हणून गुंतून राहू नका आणि विचारपूर्वक कार्य करा. बेहतर नेतृत्व क्षमता आपल्या स्वभावात आहे जी आपल्याला इतरांपेक्षा अधिक जबाबदार आणि समजदार बनवते. वर्षाच्या शेवटी एकटे असल्यामुळे निराश व्हाल. भावनिक होऊन आतून तुटून जाण्याचीही शक्यता आहे. प्रेमात असाल तर दुरी निर्माण होऊ शकते. परंतू याचा अर्थ असा नव्हे की सर्वच आपल्याहून दूर होऊन जातील. कारण असे खूप लोकं आहे ज्यांचा आपल्यावर जीव आहे आणि ते आपल्याला खूश बघू इच्छिता.

मिथुन टॅरो कार्ड राशिभविष्य 2017 
टॅरो कार्ड राशिफलप्रमाणे मिथुन राशीच्या जातकांसाठी 2017 आशेने भरलेला असेल परंतू विवेकाने काम घ्यावे लागेल. आपण समाज आणि लोकांसाठी खूप काही कराल. दरम्यान आपल्याला त्रास जाणवत असला तरी हा काळ आपल्यासाठी उत्तम आहे असे समजावे. कठीण परिश्रम आणि नरम दृष्टिकोन यामुळे यश मिळणे सुनिश्चित आहे. येणारा काळ संधी देईल पण ती ओळखणे आपले काम आहे. वैज्ञानिक दृष्टिकोण आपल्याला योग्य मार्गावर आणेल. अनेक काळापासून सुरू असलेले दुःख-वेदना तश्याच राहतील. कळत-नकळत अश्या चुका करू शकता ज्यामुळे नंतर पश्चाताप होईल. चुकीच्या मार्गी लागून भटकून जाऊ नका. योग्य जागी लक्ष केंद्रित करा. कुटुंबाकडे झुकाव राहील. करिअरमध्ये उन्नतीसाठी खूप मेहनत घ्या. तसे आपण नोकरीपेक्षा व्यवसाय करणे अधिक पसंत कराल. आपली इमेज खराब होत असल्यास नंतर या गोष्टीचा पश्चाताप होईल हे विसरू नका. अशात काळात हा विचार करून बाहेर पडा की हे तर घडायचेच होते. तसेच जीवनातील चढ-उतारामुळे परेशान होण्याची गरज नाही कारण अनेक चांगल्या गोष्टीही घडतील आणि आर्थिक स्थितीही उत्तम राहील.
 
कर्क टॅरो कार्ड राशिभविष्य 2017 
टॅरो कार्ड राशिफलप्रमाणे या वर्षी आपण फालतू कामांमध्ये अधिक लक्ष घालाल. आपली बुद्धिमता आपल्याला एक जबाबदार व्यक्ती बनवते. जबाबदारी पडल्यावर नवीन संधी आणि आव्हाने स्वीकारणे टाळाल. खरेपणा आणि कठीण परिश्रम आपली शक्ती आहे. एखादा कामात हात टाकल्यावर ते पूर्ण करूनच बाहेर पडाल. जीवनात यश आणि आनंदाचा भाव असेल. पूर्ण वर्ष आपण मागील सुंदर आठवणीत काढाल. लव लाईफबद्दल कार्ड म्हणतं की आपण इच्छित व्यक्तीशी लग्न करण्यात अडथळे निर्माण होतील असा विचार करत आहात. नकारात्मक विचार सोडून द्या. कारण लग्नात तडजोड करावीच लागते हे स्वीकारणे आवश्यक आहे. करिअर सुरळीत राहील आणि आपण त्याचं आनंद घ्याल. मनातील चिंता ताण निर्माण करेल. एकूण हे वर्ष आव्हाने आणि रहस्याने भरपूर असेल. म्हणून सर्व काही आपल्यालाच करायचे आहे, काहीही आधीपासून निश्चित नाही. म्हणून खूप मेहनत करा आणि आपलं चांगलं भविष्य निर्माण करा.

सिंह टॅरो कार्ड राशिभविष्य 2017 
टॅरो कार्ड राशिफलप्रमाणे या वर्षी सिंह राशीच्या जातकांचे जल यात्रेचे योग आहे. कौटुंबिक जबाबदार्‍या वाढतील तरी कार्यक्षमता आणि कौशल्यामुळे आत्मविश्वास राहील. संपर्कात असलेल्या लोकांशी मदत मिळेल म्हणून अश्या लोकांसह ईमानदारीने काम करा, प्रगती होईल. आधीच्या प्रेम प्रसंगाने जुळलेल्या आठवणी परेशान करतील. सावध राहण्याची गरज आहे कारण कोणीतरी आपल्याला संकटात गुंडाळण्याच्या प्रयत्नात आहे. या वर्षी नवीन संबंध किंवा विवाहाचे योग नाही तर हा काळा पैसा कमाविण्याचा आहे. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. जीवन आणि भविष्याप्रती आपण खूप ऊर्जावान आहात. कशालाही घाबरू नका, आपल्या हुशारीमुळे आपल्याला प्रत्येक पाउलावर यश मिळेल. या वर्षी वित्तीय संपत्ती प्राप्त होऊ शकते. पैसा गमवण्याची भीती राहील म्हणून खूश राहण्याचा प्रयत्न करा कारण असे झाले तरी त्यातून खंबीरपणे बाहेर पडू शकाल. या वर्षी आपल्याला खूप प्रसिद्धी मिळेल. व्यवसाय करत असाल तर पूर्ण जोर लावून द्या कारण आपल्या भाग्यात यश मिळणे सुनिश्चित आहे.
 
 
कन्या टॅरो कार्ड राशिभविष्य 2017 
टॅरो कार्ड रीडिंगप्रमाणे आपण असे व्यक्ती आहात जे प्रेमाने दुसर्‍यांची सेवा करता. या वर्षी कामाच्या जबाबदारीमुळे व्यस्त राहाल ज्यामुळे वैयक्तिक योजना प्रभावित होऊ शकतात. आनंदी राहणं आपल्या स्वभावात आहे याचा वापर करून यश मिळू शकतं. नवीन संसाधनांची प्राप्ती होईल. अर्थात आपल्याला धन प्राप्ती होईल. कठोर मेहनत केल्यास यश नक्की प्राप्त होईल. आपले प्ल‍ानिंग गुपित ठेवा. या वर्षी आपण आपल्या चुका कळतील आणि त्या स्वीकार करण्याची हिंमत कराल. आपले प्रयत्न सुरू ठेवा. आपण आपल्या विरोधकांचे विचारही बदलण्यात यशस्वी ठराल. लग्नाबद्दल विचार करत असाल तर शक्यता जरा कमी आहे परंतू आर्थिक स्थिती मजबूत राहील. आरोग्याकडे लक्ष द्या. अधिक काम करण्याच्या फिराकीत ताण घेऊ नका. पार्टनरच्या गोष्टींवर थेट जाऊन विचार करण्याची गरज नाही ते आपलं वाईट इच्छित नाही.

तूळ टॅरो कार्ड राशिभविष्य 2017
टॅरो कार्ड राशिफलप्रमाणे तूळ राशीचे जातक या वर्षी घाईत निर्णय घेतील त्यातून काही चुकीचेही ठरू शकतात. आपण जबाबदारी उचलू इच्छित नाही तरी आपल्यावर जबाबदारी टाकलीच तर वाद निर्माण होऊ शकतो. आपण स्वत:इच्छेने जबाबदारी घेतली तरी परिणाम उत्तम येतील. कार्यस्थळावर आपल्या प्रयत्नाकडे दुर्लक्ष केलं जाऊ शकतं पण आपण खूप मेहनत घेतली आहे यावर शंका घेण्यासारखे काही नसणार. संसाधन सीमित असल्यामुळे कुशल प्रबंधनाची गरज आहे. भूतकाळ आठवत असला तरी त्या काळातील वाईट अनुभवांबद्दल विचार करणे टाळा. अनुभवाहून धडा घेत भविष्यासाठी चांगलं करण्याचा प्रयत्न करा. वर्तमानामध्ये केलेल्या प्रयत्नांमुळे येणारा काळा सुखाचा जाईल. तसेच जीवनाबद्दल आपला दृष्टिकोन निराशाजनक राहील. आध्यात्मिक चिंतनात रुची वाढू शकते. सुखी कुटुंब आणि प्रामाणिकपणा हे या वर्षातील सर्वात मोठी संपत्ती आहे. जिवलगांना गमवण्याची भीती वाटेल पण शांत राहण्याचा प्रयत्न करा. भविष्य उज्ज्वल आहे. भविष्य सावरण्यासाठी पार्टनरची साथ मिळेल.
 
वृश्चिक टॅरो कार्ड राशिभविष्य 2017
टॅरो कार्ड राशिफलप्रमाणे या वर्षी आपण आर्थिक क्षेत्रात यश मिळवण्यासाठी आणि विरोधकांवर विजय मिळवण्यासाठी सतत काम करत राहाल. या वर्षी व्यक्तिगत संबंध प्रभावित होऊन लव पार्टनरशी दुरी निर्माण होऊ शकते. कार्यक्षेत्रात निपुणतेने प्रदर्शन कराल. आधीपासून असलेले संसाधन कामास येणार नाही, योग्य प्रयत्नामुळे सर्वकाही मिळेल. भूतकाळात केलेलं संघर्ष आपल्याला पुढे वाढण्यात मदत करेल. या वर्षी खर्च वाढेल ज्यामुळे भविष्यात आर्थिक स्थितीवर प्रभाव पडेल. म्हणून आपल्या बँक बॅलेंसवर नजर ठेवा. जीवनाप्रती आपली वृत्ती तात्त्विक आहे आणि व्यक्तिगत इमेज चांगली आहे. जीवनात आपल्या परिवर्तन पसंत आहे. या वर्षी निजी जीवनात आपण खूप खूश राहाल. तसेच काही सुख-सुविधायुक्त गमावण्याची भीती असते. एकूण हे वर्ष आपल्यासाठी सुख-समृद्धी देणारे ठरेल.

धनू टॅरो कार्ड राशिभविष्य 2017 
टॅरो कार्ड राशिफलप्रमाणे धनू राशीच्या जातकांना जीवनातील मूलभूत वस्तूंप्रती लगाव राहील. हे वर्ष आशा आणि स्वप्नांनी भरलेला असेल. कुटुंबासह वेळ घालवाल आणि खूप मजा कराल. हलका वाद- भांडण तर चालत राहतं. वर्षातील सर्वात आश्चर्यात टाकणारी घटना म्हणजे एखाद्या अनओळखी माणसाची आपली भेट होईल आणि त्यामुळे आपल्याला आर्थिक लाभ होईल. या माणसाप्रती मनात शंका किंवा भीतीही वाटू शकते. ऑफिसमध्ये आपली कार्यक्षमता सर्वांच्या दृष्टीत येईल. या दरम्यान कार्यस्थळावरील हुशार लोकं आपला साथ देतील. काही लोकं आपल्याला नुकसान करू पाहतील तरी विजयी आपणच व्हाल. अधिक निवेश केल्याने नुकसान झेलावं लागू शकतो. फालतू गोष्टींचा ताण घेणे टाळा. कार्य कौशल्य आणि निपुणता हीच आपली पुंजी आहे ज्यामुळे आपल्या जवळपासचे लोकं आपल्याला अनुभवी आणि योग्य समजतात. या वर्षी होणार्‍या चांगल्या आणि वाईट गोष्टी आपल्याला हिंमत, शक्ती आणि अनुभव देईल.
 
मकर टॅरो कार्ड राशिभविष्य 2017
टॅरो कार्ड राशिफलप्रमाणे या वर्षी आपले पूर्ण लक्ष आपल्या करिअरवर असेल. या दरम्यान आपण नवीन अनुभव घ्याल आणि आपल्या व्यक्तित्व आणि व्यवहारात नवीन शैली आणि चतुर प्रवृत्तीचा विकास कराल. आपल्याला जबाबदारी घेणे पसंत आहे परंतू या वर्षी आपली ही सवय आपल्यासाठी समस्या पैदा करू शकते. मैत्री आणि ‍नाती आपली ताकद आहे. स्नेह पूर्ण व्यवहारामुळे आपल्याला प्रत्येक जागी यश मिळतं. आपण करू इच्छित असलेल्या कामांसाठी आपल्याकडे भरपूर संसाधन आहेत. पूर्वीही आपण खूप प्रयत्न केले आहेत ज्यामुळे आज आपण जीवनात पुढे आहात. या वर्षी आपल्या बुद्धिमत्तेने आपण असे निर्णय घ्याल ज्याने आपण उच्च पदावर पोहचाल. जुन्या आठवणी मनाला प्रसन्न करून जातील. अचानक आपल्याला स्वत:मधील लपलेले प्रबुद्ध ज्ञानाची जाणीव होईल. भविष्य उज्ज्वल आहे.

कुंभ टॅरो कार्ड राशिभविष्य 2017 
टॅरो कार्ड राशिफलप्रमाणे आपण प्रामाणिक आणि प्रेमाप्रती समर्पित व्यक्ती आहात. आपल्याकडे स्वत:जवळ असलेल्या वस्तू व्यवस्थित करण्याची शक्ती आहे. एक जबाबदार व्यक्ती असल्यामुळे अनेकदा आपले पर्सनल प्लान प्रभावित होतात. आपल्या ताकदीबद्दल अशी एकही गोष्ट नाही जी आपण मिळवू शकत नाही. भूतकाळात आपण खूप काही गमावले असेल तरी भविष्य उज्ज्वल आहे म्हणून निराश होण्याची गरज नाही. या वर्षी जीवनाप्रती आपले विचार आणि व्यक्तित्व बिंदास असेल. आपल्याला खूप ऊर्जावान आणि उत्सुक वाटेल. आपल्याकडे वर्ष चांगली आय आणि इतर संसाधनाचं आनंद घ्याल तरी लोकांना वाटत राहील की आपण संकटात आहात. एकूण आपले भविष्य खूप सुखद दिसत आहे.
 
 
मीन टॅरो कार्ड राशिभविष्य 2017 
टॅरो कार्ड राशिफलप्रमाणे या वर्षी हेतुपूर्वक केलेल्या चुकांमुळे त्रास सहन करावा लागेल. आपण चुकीचं वागत आहोत हे माहीत असल्यावर आपण बेफ्रिक राहाल. म्हणून याबद्दल विचार करा नाहीतर नुकसान होईल. आपल्याकडे प्रचंड क्षमता आहे जी विनाकारण खर्च होत आहे. कोणत्याही वेळेला तोंड देण्याची तयारी असू द्या. कारण हे आपल्या जीवनासाठी महत्त्वपूर्ण आहे. हे खरे आहे की आपण पक्ष्याप्रमाणे आकाशात उन्मुक्त उडू शकत नाही परंतू उद्देश्यहीन जीवन जगण्याला काय अर्थ? आपल्याला काही समस्यांना तोंड द्यावे लागू शकतो परंतू आपण प्रयत्न केलं तर परिणाम उत्तम येतील. आपली ऊर्जा काही उपयोगी कार्यात वापरा. आधीपासून काही लक्ष्य निर्धारित करून चालत असाल तर ते कार्य या वर्षीदेखील चालू द्या. नवीन संबंध बनतील आणि प्रेम वाढेल, जे भविष्यासाठी सुखद असेल. कल्पनाशीलता हीच आपली संपत्ती आहे. कमी संसाधनांमध्येही आपण खूप काही मिळवू शकता. आपण जीवनात सर्व काही करू इच्छिता पण एक अज्ञात भीती आपल्या बेचैन करते आणि यश मिळविण्यात अडथळा निर्माण करते ज्यांचे आपण हक्कदार आहात. यात्रेचे योग आहे म्हणून यात्रेसाठी तयार राहा.