शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2017
Written By

वृषभ राशीच्या जातकांचे 2017 मधील वार्षिक राशिभविष्यफल

संपूर्ण वर्षभर गुरू आणि इतर ग्रहांची अनुकूलता तुमच्या राशीला लाभत असल्याने नवीन वर्षात तुमची सर्वांगीण प्रगती होईल. या वर्षांमध्ये खूप काम करायचे असे तुम्ही ठरवाल. पण ग्रहमान असे दाखवत आहे की काहीही अनपेक्षित प्रश्नांमुळे तुम्हाला थोडेसे मागे खेचल्यासारखे वाटेल. मना बरोबर बुद्धीचाही उपयोग जरूर करावा. कन्या राशीतील गुरू या खेळातील नायक ठरेल नि इतर ग्रहांचेही सहकार्य उत्तम लाभेल. पंचमस्थानामधला गुरू उत्तम मनोधैर्य देईल. त्या जोरावर प्रगती करता येईल. ‘बचेंगे तो और भी लढेंगे’ असा पवित्रा ठेवा.
पुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकरी....  
धंदा, व्यवसाय व नोकरी.... या वर्षी व्यापार व उद्योगामध्ये जुन्या कर्जातून मुक्तता होईल. कामाचा व्याप आणि फायद्याचे प्रमाण वाढू शकेल. व्यापार-उद्योगामध्ये कोणतीच गोष्ट अशक्य नाही असे तुम्हाला वाटेल. त्यामुळे फेब्रुवारीपर्यंत तुम्ही मोठ्या जोषात काम कराल. त्यानंतर मात्र सभोवतालचे वातावरण अचानक बदलणार आहे. बाजारातील परिस्थिती, सरकारी धोरणे स्पर्धक यामुळे काही पेचप्रसंग उद्भवण्याची शक्यता आहे. त्याला तोंड देण्यासाठी तुमचे धोरण सावध ठेवा. पैशाची आवक गरजेनुसार राहील, पण पैसे शिल्लक पडणार नाहीत. नोकरदार व्यक्तींना फेब्रुवारी-मार्चपूर्वी एखादी चांगली संधी मिळेल. काही जणांना थोड्या अवधीकरिता परदेशात जाता येईल. एकंदरीत सुख-दु:खाचा वाटा समसमान असेल. नोकरीमध्ये कामानिमित्ताने बाहेर जाण्याची संधी मिळेल. बढतीचे योग 2017च्या सुरवातीला किंवा ऑक्टोबरच्या सुमारास चालून येतील. जुलैनंतर कामाचा ताण वाढेल. तुम्हाला नको असलेल्या टेबलावर किंवा जागेवर थोड्या वेळाकरता बदली स्वीकारावी लागणार आहे. विद्यार्थ्यांना चांगले ग्रहमान आहे. अभ्यासाच्या प्रमाणात मार्क मिळतील. कलाकार आणि खेळाडूंनी स्पर्धकांना कमी लेखू नये. त्यांनी त्यांची तयारी वाढवावी.
पुढे पहा गृहसौख्य व आरोग्यमान... 
गृहसौख्य व आरोग्यमान... या वर्षी महिला आपल्या प्रेमळ वागण्यातून घरातील वातावरण आनंदी ठेवू शकतील आणि त्यांचे हे वागणे सांसारिक जीवनात खूप मदतीचे ठरेल. गृहसौख्याच्या दृष्टीने पंचमस्थानातील गुरुचे भ्रमण चांगले आहे. जानेवारीपर्यंत एखादे लांबलेले कार्य निश्चित होईल. त्यामुळे दिलासा वाटेल. तरुणांनी धरसोड करू नये. म्हणजे स्थिरता लाभेल. शक्यतो नवीन प्रॉपर्टी खरेदी न करता जी आपल्याकडे आहे त्यावर समाधान मानावे. अतिपैशाचा आणि अधिकाराचा मोह टाळावा. फेब्रुवारी ते ऑक्टोबर यादरम्यान एखादी नैतिक जबाबदारी पार पाडावी लागेल. महिलांनी कर्तव्य आणि मौजमजा यामध्ये कर्तव्याला महत्त्व द्यावे. अनपेक्षित कारणांमुळे खर्च वाढतील. वृद्ध व्यक्तींचे आजारपण किंवा मुलांच्या शिक्षणाकरता पैसे उभे करावे लागतील.