शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2017
Written By

सिंह राशीच्या जातकांचे 2017 मधील वार्षिक राशिभविष्यफल

या वर्षी सिंह राशीचे जातक आपले खरे निर्णय आपल्या अंतर्मनाने घेत असतात. येत्या वर्षांच्या सुरुवातीपासून शनी आणि मंगळ हे दोन ग्रह चतुर्थ स्थानात भ्रमण करत होते. नवीन वर्षांत गुरुची तुम्हाला चांगली साथ मिळणार आहे. शनीही राशीबद्दल करून पंचम स्थानात येणार आहे. हे बदलणारे ग्रहमान तुमच्या प्रगतीला पूरक आहे. जमिनीवर पाऊल रोवून राहिलात तर अनेक समस्या तुम्ही चार हात दूर ठेवू शकाल. पण जर तुमच्या हातून चुका झाल्यातर त्याची तुम्हाला माफी मिळणार नाही. 
पुढे पहा धंदा, व्यवसाय व नोकरी....
धंदा, व्यवसाय व नोकरी.... व्यापार आणि उद्योगाच्या क्षेत्रात सकृतदर्शनी चांगल्या संधी कदाचित यापूर्वीच निर्माण झाल्या असतील. त्या दृष्टीने महत्त्वाच्या घडामोडी नव्या वर्षापासून सुरू होतील आणि त्याचा फायदाही तुम्हाला नक्कीच मिळेल. फेब्रुवारीनंतर एखादे मोठे उद्दिष्ट मनात ठेवाल. मार्च ते जून हा कालावधी तुम्हाला लाभदायक ठरेल. जुलै ते ऑक्टोबर दरम्यान हे ग्रहमान संमिश्र आहे. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी चार वेळा विचार करा. संभाव्य धोक्यांपासून नियोजन करा. 2017 जूनपर्यंत पूर्वी केलेल्या परिश्रमाचे चांगले फळ मिळेल. त्यानंतरच्या काळात जादा धोका पत्करून फायदा वाढविण्याकडे कल राहील. ऑगस्ट-सप्टेंबरनंतर पुन्हा एकदा एखादे किचकट काम तुमच्या वाट्याला येईल. त्याचे श्रेय ऑक्टोबरपासून पुढे मिळेल. एकंदरीत वर्ष चांगले आहे. घरामधल्या एखाद्या प्रश्नामुळे तुम्ही जर गांगरून गेला असाल, तर त्यावरती २०१७ सालच्या सुरुवातीला अनुकूल घडामोडी घडतील. तुमचा आत्मविश्वास वाढेल. जुनी किंवा नवीन प्रॉपर्टी यासंबंधी काही समस्या निर्माण झाल्या असतील तर त्यावर फेब्रुवारीनंतर तोडगा निघू शकेल.
गृहसौख्य व आरोग्यमान... 
गृहसौख्य व आरोग्यमान...  कौटुंबिक वादविवाद संपल्याने जिवाला शांतता मिळेल. तरुणांची अस्थिरता कमी होईल. त्यांनी विनाकारण नोकरी व्यवसायात बदल करू नये. महिलांना घरगुती प्रश्न आटोक्यात आल्याने दिलासा लाभेल. विद्यार्थ्यांना ग्रहांची चांगली साथ मिळणार आहे. त्यांनी नशिबावर अवलंबून राहू नये. जूननंतर स्वत:च्या आणि घरातील वृद्ध व्यक्तींच्या प्रकृतीविषयी चिंता वाटेल. मुलांच्या प्रगतीविषयी एखादी समस्या जाणवेल. त्याचे निराकरण जानेवारीत होण्याची शक्यता आहे. तरुणांनी स्वप्न पाहण्यापूर्वी स्वत:ची पात्रता वाढवावी. वृद्धांनी भावनाविवशता टाळून स्वत:कडे वर्षभर लक्ष द्यावे. महिला परिश्रमातून यशस्वी होतील. त्यांनी नातेवाईक, मित्रमंडळीत बोलताना शब्द जपून वापरावेत.