कन्या राशीच्या जातकांचे 2017 मधील वार्षिक राशिभविष्यफल

कन्या राशीच्या जातकांची बुधाची रास आहे त्यामुळे येत्या वर्षात बुद्धीच्या जोरावर अनेक काम यशस्वी करू शकाल. या वर्षांत राशीतील
गुरू आणि तृतीय स्थानातील शनी या दोन ग्रहांनी तुमच्यावर कृपादृष्टी ठेवली. नवीन वर्षांत गुरू तुम्हाला चांगली साथ देणार आहे. पण
चतुर्थ स्थानाकडे येणारा शनी विशेष अनुकूल नाही. व्यावसायिक प्रगतीला वर्ष चांगले आहे. पण घरातील वातावरण बदलल्यामुळे तुम्हाला
सतर्क राहावे लागेल. याचा समन्वय साधताना तुमची तारेवरची कसरत होईल. या वर्षी तुमच्यातील खूप पैसे मिळवण्याची इच्छाही फलद्रुपहोईल, पण या सर्वांचा आनंद घेण्यासाठी प्रकृतीकडे तितकेच लक्ष देणे गरजेचे होईल. हे विसरू नका. व्यवसायात कामात मोठी मजल
मारण्याचे तुमचे स्वप्न तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. स्वत:ची प्रतिष्ठा उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने अविश्रांत मेहनत कराल.
धंदा, व्यवसाय व नोकरी....


यावर अधिक वाचा :