मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2017
Written By

कन्या राशीच्या जातकांचे 2017 मधील वार्षिक राशिभविष्यफल

कन्या राशीच्या जातकांची बुधाची रास आहे त्यामुळे येत्या वर्षात बुद्धीच्या जोरावर अनेक काम यशस्वी करू शकाल. या वर्षांत राशीतील गुरू आणि तृतीय स्थानातील शनी या दोन ग्रहांनी तुमच्यावर कृपादृष्टी ठेवली. नवीन वर्षांत गुरू तुम्हाला चांगली साथ देणार आहे. पण चतुर्थ स्थानाकडे येणारा शनी विशेष अनुकूल नाही. व्यावसायिक प्रगतीला वर्ष चांगले आहे. पण घरातील वातावरण बदलल्यामुळे तुम्हाला सतर्क राहावे लागेल. याचा समन्वय साधताना तुमची तारेवरची कसरत होईल. या वर्षी तुमच्यातील खूप पैसे मिळवण्याची इच्छाही फलद्रुप होईल, पण या सर्वांचा आनंद घेण्यासाठी प्रकृतीकडे तितकेच लक्ष देणे गरजेचे होईल. हे विसरू नका. व्यवसायात कामात मोठी मजल मारण्याचे तुमचे स्वप्न तुम्हाला स्वस्थ बसू देणार नाही. स्वत:ची प्रतिष्ठा उत्पन्न वाढविण्याच्या उद्देशाने अविश्रांत मेहनत कराल.  
धंदा, व्यवसाय व नोकरी.... 
धंदा, व्यवसाय व नोकरी....  नोकरीच्या दृष्टीने राशीतील गुरुचे भ्रमण प्रगतिकारक ठरेल. जे चांगले काम तुम्ही पूर्वी केले आहे, त्याची पावती तुम्हाला बढती आणि पगारवाढ या स्वरूपात मिळेल. या दृष्टीने एप्रिल ते जून हा कालावधी चांगला आहे. काहींना परदेशात जाण्याची संधी मिळेल. व्यापार-उद्योगात एखादे बराच काळचे स्वप्न साकार करण्याचा तुमचा इरादा असेल. त्याची पूर्वतयारी तुम्ही या आधीच केली असेल. नवीन प्रोजेक्ट फेब्रुवारीनंतर कार्यान्वित होतील. नोव्हेंबर-डिसेंबरामध्ये पैशाची तंगी जाणवेल. पण त्याची कसर एप्रिलनंतर भरून निघेल. नोकरीमध्ये आतुरतेने वाट पाहत असलेली एखादी चांगली संधी मिळाल्याने तुम्ही खूश असाल. जून-जुलैपूर्वी नोकरीमध्ये बदल करण्याचे स्वप्नही साकार होईल.  
गृहसौख्य व आरोग्यमान... 
गृहसौख्य व आरोग्यमान... कन्या राशीच्या जातकांसाठी गृहसौख्याच्या दृष्टीने जूनपूर्वीचा कालावधी विशेष अनुकूल आहे. महत्त्वाच्या जबाबदार्‍या, समारंभ पार पडतील. चतुर्थ स्थानातील शनीचे भ्रमण गृहसौख्याच्या दृष्टीने विशेष चांगले नाही. ज्या जबाबदाऱ्यांची तुम्हाला पूर्वी सूचना मिळाली होती त्या प्रत्यक्षात मार्गी लावायला लागतील. लहान मोठ्या व्यक्तींची प्रगती आणि स्वास्थ्य याकडे लक्ष द्यावे लागेल. वडिलोपार्जित इस्टेटीवर वादविवाद होण्याची शक्यता आहे. प्रकृतीकडे मात्र लक्ष द्या. वृद्ध व्यक्तींनी पथ्यपाण्याकडे वर्षभर लक्ष द्यावे. तरुणांना प्रगतीच्या नवीन संधी मिळतील. महिलांना कंटाळवाणे वर्ष आहे. त्यांना आवडीनिवडीवर मुरड घालावी लागेल. विद्यार्थ्यांना नशिबाची साथ मिळेल. आपली भावनिकता ईश्वरभक्तीत असेल, पण नात्याच्या गुंत्यात आपण मनाचा संयम फार खुबीने पाळाल. कारण हळवेपणा जपण्यात पुरे आयुष्य निघून जाते, हे आपण जाणता.