शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2017
Written By

2017 वर्ष राशी फलादेश

मेष : चु, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, अ

मेष राशीचे अश्विनी, भरणी आणि कृत्तिका नक्षत्राच्या प्रथम चरणाच्या संयोगाने निर्माण झाले आहे.

मेष राशीच्या जातकांसाठी हे वर्ष शनीच्या ढैयाचे राहील ज्याने मनात भीती राहील आणि न्यूरोलॉजिकल रोग, अशांती, दुर्घटना, जखम, राजकारणात विरोधी हावी राहतील. 17 फेब्रुवारी 2017 पासून शनीचा ढैया समाप्त होत असल्यामुळे आपल्याला यश मिळणे प्रारंभ होईल. मातेला शारीरिक कष्ट होऊ शकतं. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष उत्तम राहील. व्यापारी वर्गासाठी मध्यम व शेतकरी वर्गासाठी त्रासदायक राहील. स्त्रियांसाठी हे वर्ष उत्तम राहील.
 
एप्रिल, जून, सप्टेंबर उत्तम राहतील.
या वर्षी शिव-शक्ती आराधना लाभप्रद राहील.
वृषभ : ई, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो
 
वृषभ राशीचे निर्माण कृत्तिका नक्षत्राचे 3 चरण, रोहिणी आणि मृगशिरा नक्षत्राच्या प्रथम आणि द्वितीय चरणामुळे झाले.
 
वृषभ राशी असलेल्या जातकांसाठी हे वर्ष शुभ असेल. चलित वस्तूंमुळे काळजी राहील. व्यापारी आणि अधिकारी सर्व्हिस असलेल्यांसाठी हे वर्ष मध्यम राहील. नोकरी आणि व्यवसायामुळे स्थान परिवर्तन होऊ शकतं. व्यापारी वर्गासाठी हे वर्ष यश देणारं ठरेल. कृषी व्यवसाय मध्यम राहील. पार्टनरशिप व्यापारात असंतोष राहील. जमिनीचे सौदे नुकसानदायक ठरू शकतात. आईला कष्ट होऊ शकतं.
 
मार्च, मे, सप्टेंबर, डिसेंबर उत्तम राहतील.
या वर्षी शनीची आराधना लाभदायक राहील.

मिथुन : का, की, कु, घ, ड, छ, के, को, हा
 
मृगशिरा नक्षत्राचे तृतीय आणि चतुर्थ चरण, आर्द्रा नक्षत्र आणि पुनर्वसूच्या 3 चरणांच्या संयोगाने मिथुन राशीचे निर्माण झाले.
 
मिथुन राशी असलेल्या जातकांसाठी हे वर्ष अनुकूल, आणि यश देणारे आहे. भाग्य व धन-संपत्तीचे उत्तम योग आहे. व्यवसायात वृद्धी होईल. शारीरिक कष्ट होऊ शकतं. कुटुंबात मतभेद राहतील. विद्यार्थ्यांना यश मिळेल. कृषीत लाभ होईल. संतान सुख प्राप्त होईल. घरात धार्मिक अनुष्ठानाचे योग. राजकारणात प्रतिष्ठा वाढेल. स्त्रियांना सुख मिळेल.
 
जानेवारी, जून, जुलै, ऑगस्ट उत्तम राहतील.
या वर्षी हनुमानाची आराधना लाभदायक राहील.
 
कर्क : ही, हू, हे, हो, डा, डी, डू, डे, ओ
 
कर्क राशी पुनर्वसू नक्षत्राचे चतुर्थ चरण, पुष्य आणि आश्लेषा नक्षत्रांच्या मदतीने बनली आहे.
 
कर्क राशी असलेल्या जातकांसाठी हे वर्ष यश देणारे ठरेल, परंतू संघर्षमय राहील. घेण-देण सावधपणे करा. मुलांकडून असंतोष राहील आणि त्याची काळजी वाटेल. राजकारणात ताण व मतभेद वाढतील. विद्यार्थ्यांना यश मिळेल. व्यापार आणि नोकरी करणार्‍यांसाठी हे वर्ष मध्यम राहील. धार्मिक अनुष्ठानाचे योग. सामाजिक प्रतिष्ठेत वृद्धी होईल. कृषी वर्गासाठी वर्ष उत्तम राहील.
 
मार्च, मे, नोव्हेंबर, डिसेंबर उत्तम राहील.
या वर्षी शिव-शक्ती आराधना लाभप्रद राहील.

सिंह : मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे
 
सिंह राशी मघा, पूर्वा फाल्गुनी आणि उत्तरा फाल्गुनी नक्षत्राच्या प्रथम चरणाच्या संयोगाने बनली आहे.
 
सिंह राशी असलेले जातकांसाठी या वर्षी शनीचा ढैया सुरू आहे. मनात भीती आणि दुविधा राहील. आरोग्यात स्मृती कमजोर, पोटातील रोग आणि चालण्या- फिरण्यात त्रास होऊ शकतं. स्थायी संपत्तीमध्ये व्यय होईल. स्वजनांशी संघर्ष, अशांती व असंतोष राहील. धार्मिक कामात प्रतिष्ठा, पद व सन्मानाचे योग आहे. कौटुंबिक ताण राहील. विद्यार्थ्यांना यश मिळेल.
 
फेब्रुवारी, ऑगस्ट, ऑक्टोबर आणि डिसेंबर उत्तम राहतील.
या वर्षी राहू आराधना लाभप्रद राहील.
 
कन्या : टो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो
 
कन्या राशी उत्तरा फाल्गुनीचे 3 चरण, हस्त आणि चित्रा नक्षत्राचे 2 चरणांनी बनली आहे.
 
कन्या राशी असलेल्या जातकांसाठी हे वर्ष यश देणारे राहील. भावंडाशी मतभेद राहील. नोकरीत उन्नती होईल. व्यवसायात वृद्धी होईल. समाजात मान-सन्मान वाढेल. हे वर्ष कुटुंबासह शांतीने पार पडेल. आई-वडिलांच्या आरोग्याची काळजी वाटेल. विद्यार्थ्यांना यश मिळेल. स्थायी प्रॉपर्टी आणि वाहन खरेदीचे योग बनतील.
 
मार्च, एप्रिल, जुलै, डिसेंबर उत्तम राहील.
या वर्षी प्रभू रामाची आराधना करणे लाभदायक ठरेल.

तूळ : रा, रि, रु, रे, रो, ता, ती, तु, ते
 
तूळ रास चित्रा नक्षत्राचे 2 चरण स्वाती आणि विशाखा नक्षत्राचे 3 चरणांनी बनली आहे.
 
तूळ राशी असलेल्या जातकांसाठी हे वर्ष साडे सातीचे अंतिम चरण असणार, परंतु तूळ राशीवर शनी कारक असल्यामुळे शनीच्या ढैयाचा प्रभाव कमी असेल. 17 फेब्रुवारी 2017 ते साडे सातीची ढैया समाप्त होईल. राजकारणात उच्च पदाचे योग आहे. व्यापारी वर्ग खूश राहील. कृषी क्षेत्रात उन्नती होईल आणि नोकरीत अधिकारी परेशान राहतील. आईला कष्ट होऊ शकतं, परंतू एखाद्या मित्रांची मदत मिळेल. घरात मांगलिक कार्याचे योग. सामाजिक प्रतिष्ठेत वृद्धी होईल, परंतु कुटुंबात अशांती राहील. आर्थिक खर्च वाढतील. 
या वर्षी आपल्याला गुरु व कृष्णाची आराधना करायला हवी. 
 
मार्च, मे, सप्टेंबर आणि डिसेंबर उत्तम.
या वर्षी गायत्री मंत्र व शनी आराधना लाभप्रद राहील.
 
 
वृश्चिक : तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू
 
वृश्चिक रास विशाखा नक्षत्राचे 1 चरण आणि अनुराधा आणि ज्येष्ठा नक्षत्राने बनली आहे.
 
वृश्चिक राशी असलेले जातकांसाठी वर्षाचे दुसरे चरण साडे सातीचे आहे. हे वर्ष आपल्यासाठी संघर्ष आणि ताण देणारे ठरेल. आपली राशी शनीची शत्रू राशी आहे. आपल्याला संकट, तंगी आणि धोक्याचा सामना करावा लागू शकतो. आई- वडील, पत्नी आणि स्वत:च्या आरोग्याची काळजी घ्या. दुर्घटनेपासून वाचावे. फेब्रुवारी 2017 पासून राहत मिळणे सुरू होईल. कृषी क्षेत्रात नुकसान होईल. व्यवसाय मध्यम राहील. नोकरी बदलण्याची भावना मनात असली तरी परिवर्तनामुळे स्थिती बिघडू शकते आणि संकट वाढू शकतं. नोकरी न बदलण्याचा निर्णय योग्य ठरेल.
 
मार्च, मे, ऑक्टोबर, नोव्हेंबर उत्तम.
या वर्षी शनी आणि राहूची आराधना लाभप्रद ठरेल.

धनू : ये, यो, भा, भी, भू, धा, फा, ढा, भे
 
धनू रास मूल, पूर्वाषाढा आणि उत्तराषाढाच्या प्रथम चरणाने बनली आहे.
 
धनू राशी असलेल्या जातकांसाठी या वर्षी साडे सातीचा प्रथम चरण चालू आहे. व्यवसायात अडथळे निर्माण होतील. धोक्याचे काम टाळा. चुकीचे व्यवसाय करणार्‍यापासून दूर राहा. स्व कुटुंब, आत्मीय आणि स्वजनांपासून असंतोष राहील. कोणी जवळचा माणूस धोका देऊ शकतो.‍ स्त्रियांचा सहयोग आणि आत्मबळ वाढेल. कृषी नुकसान करेल. व्यवसायात संकट वाढेल. आई- वडिलांच्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. विद्यार्थी आणि नोकरीपेशा लोकांसाठी हे वर्ष मध्यम राहील.
 
जानेवारी, मार्च, जून, ऑक्टोबर उत्तम
या वर्षी गुरु आराधना लाभप्रद राहील.
 
मकर : भो, जा, जी, खू, खे, खो, गा, गी
 
मकर रास उत्तराषाढा नक्षत्राच्या 3 चरण, श्रवण आणि धनिष्ठा नक्षत्राचे 2 चरणांनी बनली आहे.
 
मकर राशी असलेल्या जातकांसाठी हे वर्ष भूमी-भवनाचे लाभ देणारे असेल. राजकारणात असलेल्यांना लाभ मिळेल. नोकरीत अधिकार्‍यांकडून मदत मिळेल. 17 फेब्रुवारी 2017 पासून शनीची साडे साती प्रारंभ होईल. राशी स्वामी शनी असल्यामुळे याचा प्रभाव कमी राहील परंतू शारीरिक कष्ट सहन करावा लागेल विशेषतः: स्नावयिक विकार रोग होण्याची शक्यता आहे. घरात ताण आणि अशांतीचे वातावरण राहील. श्रमिक वर्गासाठी हे वर्ष यश देणारे ठरेल. शेतकरी वर्गासाठी मध्यम राहील. विद्यार्थ्यांसाठी काळ मध्यम राहील.
 
फेब्रुवारी, एप्रिल, जून, डिसेंबर शुभ राहील.
पूर्ण वर्ष शनी आणि राहूची आराधना लाभदायक राहील.

कुंभ : गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा
 
कुंभ रास धनिष्ठाचे 2 चरण, शतभिषा आणि पूर्वाभाद्रपद नक्षत्रांच्या 3 चरणांनी बनली आहे.
 
कुंभ राशी असलेल्या जातकांसाठी हे वर्ष मिश्रित फळ देणारे राहील. पद-प्रतिष्ठा प्राप्त करण्यात अडथळे येतील. स्वत:ला व पत्नीला शारीरिक कष्ट भोगावा लागू शकतो. संतती संबंधी काळजी राहील. राजकीय वर्ग परेशान राहील. व्यापारी वर्गाला संघर्षाला सामोरं जावं लागेल. कृषी वर्गासाठी वर्ष उत्तम आहे. सप्टेंबर महिन्यात सर्व जातकांना राहत मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष मध्यम राहील. आर्थिक खर्चा वृद्धी होऊ शकते. गुरु आपल्या कुटुंबाच्या एखाद्या सदस्याच्या आरोग्यामुळे खर्च वाढेल.
 
मार्च, एप्रिल, मे, ऑगस्ट उत्तम.
या वर्षी महादेव आणि हनुमानाची आराधना करणे लाभदायक राहील.
 
मीन : दी, दू, थ, झ, य, दे, दो, चा, ची
 
मीन रास पूर्वाभाद्रपद नक्षत्राचे चतुर्थ चरण, उत्तराभाद्रपद आणि रेवती नक्षत्राने बनली आहे.
 
मीन राशी असलेल्या जातकांसाठी हे वर्ष क्रमशः: सुधारण्याची वेळ आहे. संघर्ष आणि संकटांपासून मुक्ती मिळेल. मान-प्रतिष्ठेत अडथळे येतील आणि उन्नतीची गती कमी असल्यामुळे मन विचलित राहील. चढ- उतार चालत राहील. मन अशांत राहील. भावंडाच्या आरोग्याची काळजी राहील. विद्यार्थ्यांना यश मिळेल. नोकरीत उन्नती होईल. कृषी वर्गात लाभ मिळेल. व्यवसायी आणि अधिकार्‍यांसाठी संघर्षाची वेळ आहे. डिसेंबर ते मार्च पर्यंतच्या काळात व्यय आणि संघर्ष अधिक व ताण राहील.
 
जानेवारी, जून, सप्टेंबर, डिसेंबर उत्तम.
या वर्षी देवी आणि राहूची आराधना लाभदायक राहील.