शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2017
Written By

चायनीज राशिफल 2017

सादर आहे चायनीज राशिफल  2017, जे प्राचीन चिनी सिद्धान्तांच्या आधारावर आहे.  

रैट (Rat) साठी कसे राहील चायनीज राशिफल  2017 ? 
जन्म वर्ष: 1900, 1912, 1924, 1936, 1948, 1960, 1972, 1984, 1996, 2008 
रैट चाइनीज राशिफल 2017 : या वर्षी तुमचे जीवन सामान्य गतीने चालेल ज्यामुळे तुमच्यात बेचैनी राहणार आहे. आपल्या प्रयत्नांमुळे तुम्हाला चांगली संधी मिळेल. म्हणून कार्यस्थळावर कुठल्याही प्रकाराची संधी गमावू नये. सीनियर्स आणि सहकर्मी तुमच्या परिश्रमाची तारीफ करतील. जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुम्हाला चांगले विकल्प मिळतील. जीवनाशी निगडित सुख-सुविधांवर होणारा खर्च बंद होऊन जाईल. आर्थिक प्रबंधनावर लक्ष द्यावे लागणार आहे. कुटुंबीयांसोबत प्रवास कराल. तुम्ही प्रियजनासोबत प्रत्येक परिस्थितीत उभे राहाल जेव्हा त्यांना तुमची गरज भासेल. तुमची दिनचर्या वर्षभर व्यस्त राहणार आहे पण उत्तम प्लानिंग आणि टाइम मॅनेजमेंटमुळे तुम्ही आपल्या लोकांसाठी वेळ काढू शकता. आपल्या राशीच्या स्वभावाप्रमाणे तुम्ही सामाजिक व्यक्ती आहात आणि या वर्षी सामाजिक कार्यांमध्ये सामील होण्याची संधी तुम्हाला मिळणार आहे. एखाद्या खास व्यक्तीची भेट होऊ शकते. पण या सर्वांमध्ये तुम्हाला वेळ काढण्याची गरज पडणार आहे. आपले शौक बघून काही योजना बनवाल. यात एडवेंचर एक्टिविटी सामील होऊ शकते. आरोग्य आणि खाण्यापिण्यावर लक्ष द्यावे लागणार आहे. एक चांगल्या जीवनशैलीचे अनुकरण कराल तर तुम्ही स्वस्थ राहाल. ऐकून हे वर्ष तुमच्यासाठी फारच महत्त्वपूर्ण आहे. कारण या दरम्यान कामाशी निगडित बरीच संधी, कुटुंबीयांसोबत चांगले क्षण, नवीन मैत्री आणि रोमाँटिक लाईफमध्ये बरेच चांगले अनुभव बघायला मिळतील.  
ऑक्स (Ox) साठी कसे राहणार आहे चाइनीज राशिफल 2017 ?
जन्म वर्ष: 1901, 1913, 1925, 1937, 1949, 1961, 1973, 1985, 1997, 2009
ऑक्स चाइनीज़ राशिफल 2017 हे वर्ष तुमच्या जीवनात बदल घेऊन येणार आहे पण यासाठी उत्तम प्रबंधनची गरज राहणार आहे. वर्ष भर तुम्हाला असे जाणवेल की जसे तुम्हाला हवे होते तसेच घडत आहे. कार्य स्थळावर तुम्ही सर्व काम दक्षतेने पूर्ण कराल. सॅलरीत वाढ होईल तसेच नवीन जबाबदारी मिळाल्याने थोडा त्रास संभवतो पण या वेळेस जे तुम्हाला हवे आहे तेच मिळेल. ऑफिसमध्ये योग्य काम कराल, नवीन संधीकडे बिलकुल दुर्लक्ष करू नका. कार्य कुशलतेत सुधारणा होईल. वित्तीय बाबींमध्ये थोडी सावधगिरी बाळगावी लागणार आहे. जर गुंतवणूक करण्याची गरज पडत असेल किंवा मजबूरी असेल तर फारच विचार करून निर्णय घ्या आणि संभावित परिणामांसाठी तयार राहा. घरगुती बांधणीवर प्रेम आणि सहकार्य मिळण्याची उमेद आहे. तुम्ही तुमच्या प्रियजनांची मदत कराल आणि ते तुम्हाला साथ देतील. घरात तुम्ही एक जबाबदार व्यक्तीची भूमिका निभवत असल्याने प्रत्येकाला तुमच्या सल्लाची गरज पडेल. घरात काही विवाद देखील होऊ शकतात पण या गोष्टींना जास्त गंभीरतेने घेऊ नका. सामाजिक कार्यांमध्ये येणे जाणे सुरू राहील, नवीन मैत्री होईल. जोडीदारासोबत संबंध घट्ट होतील तसेच अविवाहित लोकांची भेट एखाद्या खास व्यक्तीशी होऊ शकते. हे वर्ष तुमच्या जीवनात सकारात्मकता घेऊन येईल. पण वित्तीय बाबींमध्ये थोडे लक्ष द्यावे लागणार आहे.  
पुढे पहा टायगर (Tiger)चे राशिफल 
टाइगर (Tiger) साठी कसे जाणार आहे चाइनीज राशिफल 2017 ?
जन्म वर्ष:  1902, 1914, 1926, 1938, 1950, 1962, 1974, 1986, 1998, 2010
टाइगर चाइनीज राशिफल 2017 हे वर्ष तुमच्यासाठी बर्‍याच बाबतीत महत्त्वपूर्ण राहणार आहे. या वर्षी तुम्हाला बरीच संधी मिळेल ज्याने तुम्ही जीवनातील प्रत्येक क्षेत्रात प्रगती कराल. पण संयम ठेवणे गरजेचे आहे आणि बगैर विचार करून कुठल्याही निर्णयावर पोहोचू नका. ऑफिसमध्ये कामाच्या दरम्यान आपल्या स्ट्रेंथवर फोकस करा, तुम्ही फारच कार्य कुशल आहात पण परिस्थितीनुसार स्वत:ला बदलून घ्यायला पाहिजे. जर तुम्हाला चांगली संधी मिळाली तर याला हातातून जाऊ देऊ नका, तसेच जर नवीन पद मिळत असेल तर नवीन शिकायचा प्रयत्न करा. आर्थिक स्थिती फारच छान राहणार आहे, कमाईचे नवीन साधन मिळू शकतात पण पैसेचा वापर योग्य प्रकारे करावा लागणार आहे. परिवारासोबत होणार्‍या यात्रेवर खर्च होऊ शकतो. त्याशिवाय घरातील साज सज्जेवरपण खर्च करू शकता. दुसर्‍यांना बोलायचा मोका द्या आणि त्यांना ऐकण्याचा प्रयत्न करा याने तुमचे अर्धे त्रास तर तसेच दूर होतील. नवीन लोकांच्या भेटीगाठीमुळे तुमच्या जीवनात काही बदल येण्याची शक्यता आहे. स्वत:ची तुलना दुसर्‍यांशी करू नका. कारण आम्हाला हे माहीत नसत की कुठल्या गोष्टीचे कोणाला वाईट वाटू शकते म्हणून सावधगिरी बाळगा. गर्मीच्या सुरुवातीत आणि मध्यामध्ये सामाजिक कार्यांमध्ये सकारात्मक वातावरण मिळत आहे. ऐकून हे वर्ष तुमच्यासाठी चांगले जाणार आहे पण यश मिळवण्यासाठी चतुराईने काम करावे लागतील.  
पुढे पहा रैबिट (Rabbit)चे राशिफल
रैबिट (Rabbit) साठी कसे जाणार आहे चाइनीज राशिफल 2017 ?
जन्म वर्ष:  1903, 1915, 1927, 1939, 1951, 1963, 1975, 1987, 1999, 2011 
रैबिट चाइनीज राशिफल 2017 मध्ये तुम्हाला मिश्रित परिणाम मिळण्याची शक्यता आहे. तुमच्या प्रत्येक कार्यांमध्ये अडचणी येणार आहे पण शेवटी सर्वकाही चांगले होईल. मागच्या वर्षाप्रमाणे हे वर्ष एवढे उत्तम जाणार नाही पण जर तुम्ही मेहनत केली तर थोडे यश मिळण्याची शक्यता आहे. स्वतंत्र होऊन काम कराल आणि दुसर्‍यांना याचे श्रेय देणार नाही पण हे तुमच्यासाठी नुकसानदायक ठरू शकत म्हणून टीम भावनेने काम करा आणि दुसर्‍यांचा आदार करा. जर तुम्ही नोकरीत बदल करण्याचे इच्छुक असाल तर गर्मीत उत्तम योग आहे. या वर्षी खर्च फार राहतील खास करून तुम्ही प्रवासात जास्त खर्च कराल. जर या वर्षी गुंतवणूक करायची इच्छा असेल तर त्यावर आधी रिसर्च करून घ्या आणि सल्ला घेऊन पुढे जा. कला प्रेमी असल्यामुळे घरातील इंटीरियर डेकोरेशनवर मोठे खर्च करू शकता. प्रत्येक बाबतीत कुटुंबीयांचा साथ मिळेल. जर तणाव असेल तर आपल्या 
जोडीदारासोबत शेअर कर पण आपला राग कोणावर काढू नका. तुमचे सामाजिक जीवन फारच चांगले जाणार आहे. गर्मीची सुरुवात आणि हिवाळ्यातील वेळ चांगला जाईल. ऐकून हे वर्ष तुमच्यासाठी आव्हानात्मक ठरेल. जर ऑफिसमध्ये बॉससोबत डील करत असाल तर भविष्यात त्याचे निर्णय तुमच्या बाजू राहणार आहे.  
 
पुढे पहा ड्रॅगन (Dragon)चे राशिफल
ड्रॅगन (Dragon) साठी कसे जाणार आहे चाइनीज राशिफल 2017 ?
जन्म वर्ष: 1904, 1916, 1928, 1940, 1952, 1964, 1976, 1988, 2000, 2012 
ड्रॅगन चाइनीज़ राशिफल 2017 मध्ये तुम्हाला बरीच चांगली संधी मिळणार आहे. करियरच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण सुधार संभावित आहे तसेच तुमच्या कार्यकौशलमध्ये निखार येईल. नवीन संधी मिळेल आणि त्याचे परिणाम देखील सकारात्मक येतील. कुटुंबीयांच्या मदतीने तुमच्या करियरमध्ये तुम्हाला मदत मिळेल. नवीन संपर्क बनवण्याचे प्रयत्न करा, याने तुम्हाला फायदा मिळेल. करियरच्या क्षेत्रात होणार्‍या प्रगतीमुळे तुम्हाला आर्थिक मजबुती मिळेल. पण या पैशांचा वापर चांगल्या पद्धतीने केला पाहिजे. महागड्या वस्तूंवर खर्च करण्याची योजनेसाठी पैसे सांभाळून ठेवा. काही पैसा यात्रेवर खर्च करू शकता. सामाजिक स्तरावर मोठी संधी मिळेल. बर्‍याच बाबतीत कुटुंबीयांचा साथ मिळेल. हे वर्ष चांगल्या प्रकारे जाणार आहे पण बिना कुठल्याही योजना आणि तयारीचे एकही प्रोजेक्ट हातात घेऊ नका. ऐकून हे वर्ष तुमच्यासाठी बरेच काही घेऊन येणार आहे.  

स्नेक (Snake) साठी कसे जाणार आहे चाइनीज राशिफल 2017 ?
जन्म वर्ष: 1905, 1917, 1929, 1941, 1953, 1965, 1977, 1989, 2001, 2013 स्नेक चाइनीज राशिफल 2017 हे वर्ष तुमच्यासाठी फारच महत्त्वपूर्ण ठरणार आहे. कारण तुमच्यातील जे गुण आहे त्याचा वापर तुम्ही फारच उत्तम प्रकार करणार आहे. तुमची पर्सनल लाईफ छान राहणार आहे. कार्यस्थळावर तुमचे पूर्ण लक्ष नोकरीमध्ये प्रगती आणि नवीन संधी शोधण्यात जाणार आहे. ओळखीच्या लोकांची मदत मिळेल. काही असे प्रस्ताव मिळू शकतात जे करियरमध्ये तुम्हाला पुढे घेऊन जातील. जर वर्तमान नोकरीत तुम्ही संतुष्ट नसाल तर नवीनबद्दल विचार करू शकता. म्हणून कुठलीही संधी हातातून जाऊ देऊ नका. बसंत ऋतू आणि गरमीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये चांगले योग येण्याची शक्यता दिसत आहे. स्वतंत्ररीत्या काम केल्याने तुमची अमदानी वाढू शकते पण तसेच खर्च देखील वाढतील म्हणून बजेटकडे लक्ष द्या. मोठ्या कार्यांमध्ये योजनाबद्ध पद्धतीने खर्च करणे लाभदायक ठरणार आहे. जोखीम असलेल्या कामांमध्ये गुंतवणून करण्यापासून स्वत:चा 
बचाव करा. आपले शौक पूर्ण करण्यासाठी वेळ काढा. पारिवारिक जीवन सुखमय असेल, परिजनांसाठी उत्तम वेळ घालवाल. घरात एखादा महत्त्वपूर्ण समारंभ असू शकतो. कुठल्याही प्रकारचा गैरसमज दूर करण्यासाठी तुम्ही स्वत:हून पुढाकार घ्या. सामाजिक जीवनावर थोडे लक्ष देणे गरजेचे आहे अन्यथा तुम्ही एकटे पडाल. सामाजिक जीवनात राहण्यासाठी बरेच मार्ग मोकळे होतील. ऐकून हे वर्ष तुमच्यासाठी उत्तम आहे. या वर्षी एकही संधी हातातून जाऊ देऊ नका, याचा भरपूर फायदा घ्या. 
पुढे पहा हॉर्स (Horse )चे राशिफल
हॉर्स (Horse ) साठी कसे जाणार आहे चाइनीज राशिफल 2017 ?
जन्म वर्ष: 1906, 1918, 1930, 1942, 1954, 1966, 1978, 1990, 2002, 2014 
या वर्षी चांगल्या संधी मिळतील. यश प्राप्त करण्यासाठी मेहनत आणि प्रयत्न करावे लागतील. स्वतंत्रपणे काम करणे योग्य ठरेल तरी पार्टनरशिपमध्ये केलेले कामही चांगले परिणाम देतील. करिअरमध्ये आपले सर्व लक्ष गुण आणि कौशल्य निखारण्यात राहील. अशात संधी मिळाल्यास त्यावर विचार करा. प्रत्येक गोष्टीत अनुभव आणि दीर्घकालिक लाभ मिळेल. उन्हाळा आणि हिवाळ्याची सुरुवात आपल्यासाठी उत्तम सिद्ध होईल. या दरम्यान चांगल्या संधी हाती लागतील. काही शिकण्याची संधी मिळाल्यास सोडू नका त्यांचा फायदा नक्की मिळेल. पैसे वाचवा आणि योजनेप्रमाणे खर्च करा. निवेश करण्यापूर्वी विचार करा. थरारक प्रवासाचे योग जुळत आहे. या प्रवासाचा आनंद घ्या. कुटुंबासह फुरसतीचा वेळ घालवा. या वर्षी कुटुंबाची भूमिका महत्त्वाची असून सर्वांचा सहयोग प्राप्त होईल. योग्य सल्ल्याकडे दुर्लक्ष करता कामा नये. सामाजिक उपक्रमांचा आपल्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पडेल. मागील वाईट अनुभवांमुळे पाऊल मागे घेत असाल तर पुन्हा प्रयत्न करा. आनंदी राहण्यासाठी मित्रांबरोबर वेळ घालवा. वसंत आणि पावसाळा आपल्यासाठी उत्तम मोसम ठरेल. हे वर्ष उत्तम जाईल कारण मेहनतीचं फळ वाया जाणार नाही. 
शीप (Goat) साठी कसे जाणार आहे चाइनीज राशिफल 2017 ?
जन्म वर्ष: (1907, 1919, 1931, 1943, 1955, 1967, 1979, 1991, 2003, 2015)
हे वर्ष मिश्रित प्रभाव देणारे असेल, काही वेळ चांगला जाईल आणि काही काळ समस्या राहतील. परंतू वेळ चांगला जावा अशी इच्छा असल्यास कठीण परिश्रम करा आणि कोणतीही संधी गमावू नका. करिअर क्षेत्रात उन्नतीसाठी नवीन नोकरीबद्दल विचार करू शकता. नवीन संधी मिळाल्यास अजिबात सोडता कामा नये. उष्णता आणि पावसाळ्यातील वेळ उत्तम राहील. काही नवीन शिकायला मिळाले तर शिकावे आणि समजून घ्यावे. याने आपल्या गुण आणि कौशल्या वृद्धीत होईल. भविष्यात कामास येईल. याव्यतिरिक्त प्रवासाची संधी मिळाल्यास नक्की त्याचा लाभ घ्या. या दरम्यान आपल्या आर्थिक बाबतीत लक्ष घालण्याचीही गरज आहे कारण खर्च वाढू शकतात. आर्थिक बाब हलक्यात न घेता कारवाई शिस्तबद्ध पार पाडा. आपल्या सामाजिक प्रवृत्तीने नात्यांमध्ये मजबुती येईल. कौटुंबिक जीवनात व्यस्त राहाल तरी वेळ चांगला जाईल. या दरम्यान अनेक काम मिळतील परंतू प्राथमिकतेप्रमाणे काम करा. वैयक्तिक जीवनात काही वाद घडू शकतात म्हणून संयम बाळगा आणि संवाद साधून प्रकरण सोडवण्याचा प्रयत्न करा. सामाजिक कार्यक्रमांमध्ये सक्रिय राहा. पावसाळा आणि उन्हाळा उत्तम जाईल, मित्रांसोबत ट्रीपला जाऊ शकता. एकूण हे वर्ष आपल्यासाठी उत्तम राहील.
पुढे पहा मन्की (Monkey)चे राशिफल
मन्की (Monkey) साठी कसे जाणार आहे चाइनीज राशिफल 2017 ?
जन्म वर्ष:  1908, 1920, 1932, 1944, 1956, 1968, 1980, 1992, 2004, 2016 
या वर्षी अनेक संधी मिळणार. परिणाम चांगले हवे असल्या प्रयत्न करायलाच हवे. केवळ कठोर परिश्रम नव्हे तर चातुर्याने काम घ्यावे लागेल. आपल्या क्षेत्रात काहीही करू इच्छित असाल तर संधी मिळेल. कार्यस्थळी मन रमेल. नोकरी बदलण्याची योजना असेल तर चांगले प्रस्ताव मिळतील. उन्हाळा आणि पावसाळ्याचा शेवटला टप्पा चांगला जाईल. आर्थिक प्रकरणात लक्ष घाला. खर्च अधिक होण्याची शक्यता आहे. धोका वाटत असेल अश्या ठिकाणी निवेश करणे टाळा. कौटुंबिक जीवन सुखकारी राहील. तसेच विचार जुळत नसल्यामुळे कुटुंबात वाद निर्माण होऊ शकतो. अशात समजूतदारपणा दाखवा आणि संवाद साधून वाद निराकरणाचे प्रयत्न करा. पार्टनरसोबत प्रवास घडू शकतो. लोकांना भेटण्यासाठी उष्णता आणि हिवाळ्या मोसम उत्तम आहे. प्रेमात असाल तर ही वेळ उत्तम आहे अर्थात आपल्या लाईफ पार्टनरचा शोध संपेल. चांगल्या आरोग्यासाठी व्यायाम करा. हे वर्ष  आपल्यासाठी खूप काही देणार आहे, केवळ ते व्यवस्थित स्वीकारण्याची गरज आहे.
पुढे पहा रूस्टर (Rooster)चे राशिफल
 
रूस्टर (Rooster) साठी कसे जाणार आहे चाइनीज राशिफल 2017 ?
जन्म वर्ष: रूस्टर (1909, 1921, 1933, 1945, 1957, 1969, 1981, 1993, 2005, 2017)
हे वर्ष अनेक मार्गात आपल्यासाठी महत्त्वाचे ठरेल. जीवनात अनेक मोठे बदल घडतील आणि परिस्थिती नियंत्रणात राहील. जुन्या आठवणी सोडून जीवनाच्या पुर्ननिर्माणासाठी पुढे व्हा. करिअरसाठी हे वर्ष उत्तम राहील. वसंत, हिवाळा आणि उन्हाळा कामासाठी उत्तम राहील. आय प्राप्तीसाठी हे वर्ष उत्तम राहील. नोकरी व्यतिरिक्त इतर साधनाने आय प्राप्त होईल. तसेच खर्चांवर नियंत्रण ठेवा. आपल्या आवडीसाठी वेळ काढा. कौटुंबिक जीवन मनोरंजक राहील. कुटुंबात आपणच असे असाल जे सर्व मुद्द्यांवर लोकांना एकमत होण्यासाठी बाध्य कराल. मदतीची गरज असल्या कुटुंबातील लोकांशी मदत मागण्यास मागेपुढे बघू नका. आपले सामाजिक जीवन पूर्णपणे आपल्यावर निर्भर राहील. चांगल्या सामाजिक जीवनासाठी लोकाशी भेटी-गाठी करा. नवीन मित्र किंवा आपल्या जीवलग मित्राशी भेट होण्याची शक्यता आहे. लाईफ पार्टनर भेटणार. हे वर्ष उत्तम स्थिती दर्शवत आहे केवळ स्वत:ला योग्य सिद्ध करण्याचा प्रयत्न सोडू नका.
पुढे पहा डॉग (Dog)चे राशिफल
डॉग (Dog) साठी कसे जाणार आहे चाइनीज राशिफल 2017 ?
जन्म वर्ष: 1910, 1922, 1934, 1946, 1958, 1970, 1982, 1994, 2006, 2018
या वर्षी आपल्याला खूप चढ- उतार बघायला मिळतील. परंतू निराश होण्याची गरज नाही कारण वाईटानंतर चांगला काळ येतो. लोकांशी व्यवहार साधताना आणि देणं- घेणं करताना सावध राहा. कामाच्या दबावाखाली ताण घेणे योग्य नाही. संयम आणि गंभीरतेने काम करा. अशात कामातच हात टाका ज्याचं यश मिळण्याची शक्यता अधिक असेल. करिअरमध्ये मोठे बदल घडण्याची शक्यता आहे. तसेच आव्हान वाढतील परंतू या दरम्यान केलेल्या कर्मांचे फळ भविष्यात नक्की मिळतील. वसंत, उन्हाळा आणि पावसाळा चांगला व्यतीत होईल. आपल्या रुचीप्रमाणे योग्य वेळ आहे. संगीतात रुची असणार्‍याचा वेळ खूप छान जाईल. आर्थिक प्रकरणात सावध राहा, योग्य व्यवस्थापन आवश्यक आहे. आपण स्पष्ट वक्ता असल्यामुळे नातेवाइकांशी संबंध चांगले राहतील. कुटुंबात व्यस्त राहाल परंतू चांगला अनुभव मिळेल. सामाजिक स्तरावर मान-सन्मानात वृद्धी होईल. परंतू भेटी-गाठी करताना आपल्या भाषेवर नियंत्रण ठेवा नाही तर वाद निर्माण होईल. शरद ऋतू आणि मान्सूनची सुरुवात आपल्यासाठी उत्तम आहे. एकूण हे वर्ष उत्तम राहील.
पुढे पहा पिग (Pig)चे राशिफल
पिग (Pig) साठी कसे जाणार आहे चाइनीज राशिफल 2017 ?
जन्म वर्ष: 1911, 1923, 1935, 1947, 1959, 1971, 1983, 1995, 2007, 2019
2017 हे वर्ष आपल्याला सकारात्मक ऊर्जा प्रदान करेल. विशेषतः प्रेम आणि रोमँसचा मोसम राहील. पार्टनरचा शोध संपेल. उन्हाळा आणि पावसाळा आपल्या लव लाईफसाठी उत्तम राहील. विवाह झालेल्यांसाठी हे वर्ष एकमेकाला समजणे व एकत्र मिळून काही चांगलं करण्यासाठी उत्तम आहे. घरात एखादे मोठे आयोजन होण्याची शक्यता आहे. घर- गृहस्थी याहून जुळलेल्या समस्या दूर होतील.सामाजिक जीवनात उन्नती कराल आणि नवीन लोकांशी परिचय होईल. कार्य स्थळी आपण प्रगती कराल. प्रमोशन आणि नवीन जवाबदार्‍या मिळण्याची शक्यता आहे. आपले संपर्क आणि आपली उत्तम इमेज असल्याने करिअर क्षेत्रात उन्नती होईल. आपण नोकरीच्या शोधात असाल तर व्यक्तित्व विकासावर लक्ष द्या याने चांगले परिणाम प्राप्त होतील. या दरम्यान आय वाढेल आणि आर्थिक स्थिती मजबूत होईल, परंतू खर्च वाढेल. वित्तीय कामात योजना आखून कार्य करा. एकूण हे वर्ष आपल्या पक्षात राहील. केवळ आपल्याला आपली योग्यता आणि गुणाने ही संधी साधण्याची गरज आहे. पार्टनरच्या मदतीने यश मिळेल. एकूण हे वर्ष आपल्याला खूश होण्याची संधी आहे, ही संधी गमावू नका.
पुढे पहा स्नेक (Snake)चे राशिफल