testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

जानेवारी 2017तील भविष्यफल

Last Updated: शनिवार, 31 डिसेंबर 2016 (12:08 IST)
मेष : वर्षातील नवीन महिन्यात तुम्हाला अपेक्षेप्रमाणे लाभ होतील. घरापासून दूर जावे लागणार आहे. या महिन्याच्या पूर्वार्धात कुंभ राशीत मंगळ-शुक्र एकत्र आलेत. आपल्याकडे असलेल्या दूरदृष्टीचा उपयोग करा. संसार-उद्योगातील वाद वाढवू नका. भूतकाळातील हेवेदावे, शत्रुत्व सूडाची भावना विसरून जा. क्षमाशीलता हा मोठा सद्गुण आहे.
नवीनं कामे, नवीन स्पर्धा तूर्त नको. उत्तरार्धात वरिष्ठांची मर्जी होईल. उधळी प्रवृत्ती बनेल. कायदेशीर बाबी सांभाळा. विसरभोळेपणा जाणवेल. अभ्यासात गाफीलपणा नको. महिन्याच्या उत्तरार्ध शुभदायक आहे.
वृषभ : या महिन्यात शारीरिक व्याधी जाणवेल. दशमात मंगळ, शुक्र एकंदरीत ग्रहांचा वृषभ राशीत उत्तम मेळ बसत आहे. जी कामे हाती घ्याल ती पूर्णपणे यशस्वी कराल.
आरोग्याविषयीच्या तक्रारी दूर होतील. थोरामोठ्याच्या भेटीगाठी
होतील.
उत्तरार्धात आर्थिक कोंडी सुटेल. सर्व प्रकारचे लाभ होतील मित्रांच्यामुळे अडचणीत याल.विवाह जुळतील प्रवास घडेल. धंद्यात समाधान नसेल. घसा दुखेल. व्यवसायात महत्त्वाचे निर्णय घ्याल.सर्व प्रकारचे लाभ होतील.


यावर अधिक वाचा :