testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

एप्रिल (2017) महिन्यातील भविष्यफल

मेष : महत्त्वाकांक्षी व धाडसी तरुण मंडळींनी आपले बस्तान नीट बसवून घ्यावे. त्यांना व्यवसायाची नवीन दालने खुली होतील. त्याचा त्यांनी फायदा करून घ्यावा. बदली आणि बढतीची शक्यता मार्चपर्यंत आहे. कौटुंबिक सौख्याचा दृष्टीने वर्ष आव्हानाचे आहे. जोडीदाराशी चर्चा आणि विचारविनिमय करून कोणतेही निर्णय घेणे योग्य ठरले. वास्तूची कल्पना साकार व्हावी. विवाहेच्छू, होतकरू तरुण मंडळींचे शुभमंगल ठरावे. वि‍द्यार्थ्यांची अभ्यासातील प्रगती मात्र साधारण राहील. शुभरंभ तांबडा, शुभरत्न पोवळे व आराध्य दैवत गणपती आहे.
वृषभ : नोकरदार व्यक्तींना एप्रिलपर्यंत एखादी चांगली संधी उपलब्ध होईल. त्यांच्या कौशल्याला मागणी राहील, पण मोबदल्याविषयी खात्री नसल्यामुळे कामात फारसे लक्ष नसेल. त्यानंतर मात्र एखादी मोठी जबाबदारी किंवा प्रकल्प हाताळण्याची संधी मिळेल. त्याचा चांगला उपयोग होईल. त्यानिमित्ताने विशेष सवलती मिळतील. आर्थिकदृष्टया जरी महिना साधारण गेला तरी तुमच्या अधिकारात वाढ होईल. इंजिनियर, शास्त्रीय शाखेत काम करणार्‍या मंडळींना एप्रिलमध्ये एखादी सुंदर कल्पना सुचून ते आपले नैपुण्य सिद्ध करतील. प्रकृतीकडे लक्ष ठेवणे आवश्यक आहे.

मिथुन : कारखानदारांना नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी पैसे किंवा गुंतवणूक करावी लागेल. जादा पैशाच्या मोहाने अयोग्य व्यक्तींशी संगत करून नका आणि बेकायदेशीर कामांपासून लांब रहा. नोकरीत अपेक्षित कामे होतील. पगारवाढ, बढतीची शक्यता आहे. जुनी आर्थिक येणी वसूल होतील. कौटुंबिक सौख्याच्या दृष्टीने महिना संमिश्र आहे. एप्रिलमध्ये तुमच्याच कामाच्या व्यवधानामुळे तुम्ही सांसारिक जीवनाला म्हणावा तसा न्याय देऊ शकणार नाही. या दरम्यान घरात नवीन बालकाचे आगमन होण्याची शक्यता आहे. प्रकृतीची कुरबूर राहील. मुलांकडून सुर्वाता कळेल. एकंदरीत सकारात्मक दृष्टिकोन राहील. आर्थिक चिंता मिटेल.


यावर अधिक वाचा :