शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2017
Written By

मुलांकानुसार 2017 चे भविष्यफल

आपण जाणू इच्छित आहात का की 2017 हे वर्ष आपल्यासाठी कसे राहील? आपल्याला आपली रास माहीत नसेल तरी याचे समाधान अंक ज्योतिष्याने शक्य आहे. जाणून घ्या अंक काय सांगतात ते.
मूलांक 1
या वर्षी आपल्यावर चंद्र ग्रहाचा प्रभाव राहील. नकारात्मक विचार दूर राहतील आणि आपण स्वत:मध्ये एक नवीन ऊर्जा अनुभवाल. नोकरी आणि व्यवसायात आपल्याला अपार यश मिळणार आहे. अंक ज्योतिष 2017 प्रमाणे या दरम्यान आपली उन्नती संभव आहे. जी व्यक्ती मार्केटिंग क्षेत्रातील नोकरीत आहे त्यांना अधिक फायदा होईल. व्यवसायात यश हाती लागेल. जर आपण पाणी, मिल्क-प्रॉडक्ट्स, कपडे किंवा औषधांचा व्यवसाय करत असाल तर चांगला नफा होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना आपली मेहनत दुप्पट करण्याची गरज आहे कारण विश्वविक्रमी यश आपली वाट बघत आहे. कॉम्पिटिशन एग्जाम किंवा गवर्मेंट सर्व्हिसच्या तयारीत असणार्‍यांना आश्चर्यात टाकणारे परिणाम मिळू शकतात. या दरम्यान आपण आपल्या कुटुंबासह खूप चांगला वेळ घालवणार आहे. आपल्या मुलांचे यश आपली खुशी दुप्पट करेल. चंद्रमाच्या प्रभावाने लाईफ पार्टनरसह मेमोरेबल ट्रीपवर जाण्याचे योग आहे. ही यात्रा आपल्यासाठी सर्वोत्तम ठरेल. आपल्या साथीदारासोबत रोमँटिक टूरवर जाण्याचे योग आहे. जर आपल्याकडे पार्टनर नाहीये तर काळजीची गरज नाही, आपल्याला पार्टनर मिळण्याचे उत्तम योग आहे. लग्न न होत असणार्‍यांची या वर्षी ही इच्छा पूर्ण होईल. आरोग्य दृष्ट्या हे वर्ष चांगले आहे. फिटनेसकडे लक्ष द्यावे. 
 
सर्वोत्तम वेळ: 13 एप्रिल ते 12 मे, 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर
शुभ रंग: गोल्डन रेड, लाल आणि नारंगी
शुभ वार: रविवार, सोमवार आणि गुरुवार
शुभ तारखा: 1, 10, 19, 28
या तारखांमध्ये रविवार आल्यास अत्यंत शुभ व अनुकूल. 
 
महादेव आणि सूर्याची उपासना करणे फलदायक
सकाळी सूर्याला तांब्याच्या पात्राने जल अर्ध्य करावे
खिशात लाल किंवा नारंगी रंगाचा रुमाल असू द्यावा
रविवारी व्रत करणे उत्तम
4, 6, 7, 8 अंक असलेल्या व्यक्तींपासून दूर राहा.

मूलांक 2
 
या वर्षी आपल्यावर देव-गुरू बृहस्पतीची कृपा आहे. म्हणून आपले पाची बोट तुपात असणार. अधिक ताण घेण्याची गरज नाही कारण मागल्या वेळेस ध्वस्त झालेल्या अपेक्षा या वर्षी यशस्वीपणे पूर्ण होणार आहे. नोकरीत बॉसचा पूर्ण साथ मिळेल. अडकलेलं प्रमोशन या वर्षी नक्की होईल. आपण पत्रकारिता, पब्लिशिंग, कमिशन एजंट, अध्यापन, एक्स्पोर्ट-इंपोर्ट याहून जुळलेला व्यवसाय किंवा नोकरी करत असाल तर यश मिळणे निश्चित आहे, असे समजा. विद्यार्थ्यांना अभ्यासात आश्चर्यजनक परिणाम बघायला मिळतील. जे लोकं उच्च शिक्षेसाठी परदेशात जाऊ इच्छित आहे त्यांनी आपले पासपोर्ट लगेच तयार करायला हवे. कुटुंबात सुखाचा पाऊस पडणार आहे. या वर्षी निःसंतान दंपतींना अपत्य सुख मिळण्याचे पूर्ण योग आहे. कुटुंबातील एखाद्या विशेष व्यक्तीचा आपल्याला पूर्णपणे समर्थन मिळेल. पार्टनरसह रोमांचक क्षणाचा आनंद घ्याल. प्रेमी जोडप्यांना या वर्षी डेटिंगच्या अनेक संध्या मिळतील. लग्न होत नसल्यामुळे त्रस्त लोकांचे या वर्षी हात नक्कीच पिवळे होतील. आरोग्य दृष्ट्या वर्ष उत्तम आहे तरी वजनाकडे लक्ष असू द्या. जंक फूड, स्ट्रीट फूडचा आनंद घेताना आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. 
सर्वोत्तम वेळ- 14 मार्च ते 12 एप्रिल
शुभ रंग: पांढरा, हिरवा, शेंदुरी आणि क्रीम
शुभ वार: रविवार, सोमवार आणि बुधवार
शुभ तारखा: 2, 11, 20, 29
या तारखांना सोमवार आल्यास अती उत्तम दिन.
 
खिशात पांढरा रुमाल ठेवावा
महादेवाची पूजा केल्याने शांती मिळेल
सोमवारी उपास करणे उत्तम
4 आणि 7 अंक असलेल्या लोकांपासून दूर राहा

मूलांक 3
हे वर्ष आपल्यासाठी सामान्य राहील आणि आपण युरेनस ग्रहाच्या शरणात राहाल. आपल्याबरोबर काही अनाकलनीय आणि अपघाती घटना घडू शकतात. जीवनात अचानक चढ- उतार येण्याची शक्यता आहे. व्यपार्‍यांनी मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी विचार करावा. आपल्या बॉस किंवा उच्च अधिकार्‍यांशी वैर करणे आपल्यासाठी नुकसानदायक सिद्ध होऊ शकतं. आपले गुपित कुणाला सांगू नका, कुणी घरातीलच आपल्याला धोक्यात टाकू शकतो. वर्क प्लेसवर सामंजस्याने वागा. जर आपण नोकरी बदलू इच्छित असाल तर 15 डिसेंबर ते 13 जानेवारीपर्यंतचा काळ उत्तम राहील. व्यवसायात सामान्य लाभ मिळत राहील. अभ्यासाऐवजी मजा करण्यात अधिक लक्ष राहील. परंतू जे लोकं अभ्यासासाठी परदेशात जाण्याची संधी शोधत आहे त्यांना वर्षअखेर यश मिळू शकतं. पार्टनरशी उगाच तर्क वितर्क करणे टाळा. प्रेमी जोडप्यांना लपून छपून प्रेम करण्याची संधी मिळत राहील. आपल्या पार्टनरकडून चांगले गिफ्ट मिळेल. या वर्षी आरोग्य चांगले राहील तरी उटपटांग पदार्थ सेवन करून पोटासंबंधी आजारांना निमंत्रण देऊ नका. सकाळी ब्रिस्क वॉक आणि अॅरोबिक्स आपल्याला फिट ठेवण्यात मदत करेल. 
 
सर्वोत्तम वेळ- 14 मार्च ते 12 एप्रिल
शुभ रंग: पिवळा, पांढरा, आणि लाल
शुभ वार: सोमवार, मंगळवार आणि गुरुवार
शुभ तारखा: 3, 12, 21, 30
या तारखांना गुरुवार आल्यास अती उत्तम दिन.
 
खिशात पिवळा रुमाल ठेवा
गुरुवारी उपास करा
5 आणि 6 अंक असलेल्या लोकांपासून दूरा राहा

मूलांक 4 
 
या काळात आपल्यावर बुध ग्रहाची कृपा राहील. आपल्याला नवीन-नवीन आयडिया येतील, ज्याने आपण काही वेगळं करून दाखवाल. या वर्षी आपल्या सर्जनशीलतेने आपण यश प्राप्त कराल. नोकरी आणि व्यवसायात आपण काही वेगळं करणार आहात, ज्यामुळे आपल्या विरोधकांनाही त्रास होऊ शकतो. आपल्यावर आपल्या बॉसची कृपा राहील. अंक विज्ञान 2017 प्रमाणे आपण आपल्या जादुई गोष्टींनी आपल्या सहकर्मींना इम्प्रेस कराल ज्याने लोकं आपले फॅन होऊन जातील. जर आपण सेल्स, अकाउंट्स, ऑडिट व कम्युनिकेशनने जुळलेला व्यवसाय किंवा नोकरी करत असाल तर दोन्ही हातात लाडू असतील हे निश्चित आहे. आपण नवीन व्यवसायही शुरू करू शकता ज्यात आपलं यश नक्की मिळेल.

या वर्षी अभ्यासात मन रमेल. आवडीचे विषय निवडता येतील. मास कम्युनिकेशन आणि जर्नालिझमशी जुळलेले विद्यार्थ्यांच्या हाती यश लागेल. आपले कौटुंबिक जीवन मजेदार राहील. आपण आपल्या कुटुंबाला भरपूर वेळ द्याल आणि त्याच्यासोबत सुखाचे दिवस घालवाल. आपले अपत्य या वर्षी रिकॉर्ड-तोड यश मिळवू शकतो. जर आपण एकटे असाल आणि लोनली लाईफने बोर झाला असाल तर काळजी करू नका, लवकरच आपल्या जीवनात प्रेमाचे रंग भरले जाणार नाही. जीवन रंगीन वाटायला लागेल. या वर्षी आपल्या मित्रांची संख्याही वाढेल आणि आपण त्याच्यासोबत खूप हँगआउट ही कराल. या दरम्यान आपण आरोग्याप्रती सावध राहाल आणि फिटनेसकडे लक्ष द्याल. सायकलिंग आणि मेडिटेशन करणे आपल्या आरोग्यासाठी उत्तम ठरेल. 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर पर्यंतचा काळ आपल्या जीवनात सुख आणू शकतं.
 
 
सर्वोत्तम वेळ- 17 ऑगस्ट ते 16 सप्टेंबर
शुभ रंग: ब्राउन, खाकी, काळा आणि निळा
शुभ वार: बुधवार, शनिवार
शुभ तारखा: 4, 13, 22 व 31
या तारखांना बुधवार किंवा शनिवार आल्यास अती उत्तम दिन.
 
खिशात ब्राउन, काळा किंवा निळा रुमाल असू द्या.
रोज पक्ष्यांना दाणा टाका आणि देवी दुर्गांची पूजा करा.
1, 2, 7 व 9 अंक असलेल्या व्यक्तींपासून दूर राहा.

मूलांक 5
अंक शास्त्राप्रमाणे 2017 मध्ये आपल्यावर शुक्र ग्रहाचा राज असेल. आपण लक्झरी आणि सुंदरतेकडे अधिक आकर्षित व्हाल. आपण नवीन गॅझेट्स आणि कपडे खरेदी करण्यात खूप पैसे खर्च कराल. नोकरी आणि व्यवसायात आपल्याला यश मिळण्याची शक्यता आहे. ऑफिसमध्ये एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडू शकता. जर आपण ऑटोमोबाइल, आर्ट्स, रेस्टॉरन्ट, हॉटेल, म्युझिक व डांस, रेडीमेड गारमेंट्स, मॉडलिंग, पेंटिंग, ऍक्टींग या क्षेत्रात काम करत असाल तर यश मिळणे निश्चित आहे. फाईन आर्टसंबंधी अभ्यास करत असाल तर खूप उन्नती पाहायला मिळेल. फॅमिली लाईफमध्ये प्रेमाचा वर्षाव होईल. जीवनसाथीसह एखाद्या रोमँटिक ट्रीपवर जाऊ शकता किंवा मुलांसोबत ऍम्युझमेंट पार्क फिरायला जाऊ शकता. मित्रांसोबत मस्त वेळ घालवाल. मित्रांसोबत पब किंवा क्लबमध्ये मौज कराल. आपला ब्रेक-अप झाला असला तरी दुःखी होण्याची गरज नाही, कारण 15 जून ते 15 जुलै दरम्यान प्रेमाचे भूत चढणार आहे. आरोग्या चांगले राहील परंतू लव-लाईफमध्ये जरा टेन्शन असू शकतं. फिटनेससाठी स्विमिंग आणि योगा करणे योग्य ठरेल. नशा करणे टाळा नाही तर या भानगडीत औषध खाणे भाग पडेल.
 
सर्वोत्तम वेळ- 17 सप्टेंबर ते 16 ऑक्टोबर
शुभ रंग: हिरवा, ब्राउन, आणि ग्रे
शुभ वार: बुधवार
शुभ तारखा: 5, 14, 23 
या तारखांना बुधवार आल्यास अती उत्तम दिन.
 
खिशात हिरव्या रंगाचा रुमाल असू द्या.
दररोज देवी सरस्वती आणि विष्णूंची पूजा करावी.
2 अंक असलेल्या व्यक्तींपासून दूर राहा.

मूलांक 6
 
या वर्षी आपल्यावर नेप्च्यून ग्रहाचे वर्चस्व राहील. 2017 ही वेळ आपल्यासाठी उत्तम आहे. आपण नोकरी किंवा व्यवसायात व्यस्त राहाल. नवीन व्यवसाय सुरू करत असला तर त्यात यश मिळण्याची पूर्णपणे शक्यता आहे. एखादा मोठा प्रोजेक्ट वेळेत पार पाडल्यावर बॉसकडून कौतुक होईल. नोकरीत आपले अनुशासन बघून आपले विरोधींनाही आपली स्तुती करणे भाग पडेल. आपल्या बॉससोबत मोठमोठ्या बिझनेस मीटिंग्समध्ये जाण्याची संधी मिळेल. अभ्यासात आपण गंभीर राहाल आणि मित्रांसोबत खूप आउटिंग कराल. मागल्या वर्षी जर आपल्या आवडत्या कॉलेजमध्ये अॅडमिशन होता होता राहिली असल्यास या वर्षी आपले स्वप्न पूर्ण होईल. आपल्या पार्टनरसोबत रोमँटिक यात्रा कराल. मुलांसोबत ट्रीप करून मानसिक सुख आणि शांती अनुभवाल. प्रेमाच्या शोधात सोशल साईटवर खास मित्र बनवले असतील तर आता त्याची प्रेमात पडण्याची पाळी आली आहे. आता ते स्वत: आपल्याला प्रपोज करतील आणि प्रेमाची गाडी सरपट पळत सुटेल. या वर्षी आरोग्य छान राहील. आपल्या धावपळीतून वेळ काढून वर्क-आऊट करा ज्याने चरबी कमी होऊन आकर्षण बनलेलं राहील. 
सर्वोत्तम वेळ- 13 मे ते 14 जून
शुभ रंग: पांढरा, निळा
शुभ वार: बुधवार, शुक्रवार, शनिवार
शुभ तारखा: 6, 15, 24 
या तारखांना बुधवार, शुक्रवार किंवा शनिवार आल्यास अती उत्तम दिन.
 
खिशात पांढर्‍या रंगाचा रुमाल असू द्या.
शुक्रवारचा उपास करणे फायदेशीर ठरेल.
1 आणि 2 अंक असलेल्या व्यक्तींपासून दूर राहा.

मूलांक 7
 
अंक ज्योतिष्याप्रमाणे या वर्षी आपल्यावर शनी देव शासन करतील. नोकरी आणि व्यवसायात आपण सचेत राहाल. आपली प्लानिंग करून कामाला दिशा देणे अचानक उन्नतीचे संकेत आहे. जोश आणि उत्साहाने परिपूर्ण राहाल. नोकरीत आपल्या हुशारीमुळे आपण विरोधकांना तोंडघशी पाडू शकता. स्टील, लोखंड, मशीनरी, लेदर, प्रॉपर्टी, ऑयल आणि फुटवेअर संबंधी व्यवसाय करत असाल तर यश मिळण्याची शक्यता आहे. व्यवसायात प्रामाणिकपणे वागा आणि कुणाचीही फसवणूक करू नका. जर आपण रिसर्च, साइंस, जियोग्राफी या विषयांचे विद्यार्थी असाल तर मोठ्या प्रमाणावर यश मिळण्याची शक्यता आहे. आर्कियोलॉजी ने जुळलेल्या लोकांनाही इच्छित परिणाम मिळू शकतो. या वर्षी आपली आध्यात्मिक क्रियाशीलता वाढेल. यासंबंधित ट्रीपही घडू शकते. पार्टनर आणि मुलांसोबत इंजाय करण्याची संधी मिळत राहील. मुलांसोबत ऐतिहासिक संग्रहालयांची यात्राही घडू शकते. लव लाईफ डेड पडली असेल तर अचानक आपल्या प्रेमीचा सामना होईल. इतर प्रेमींनी पेश्याची सोय करून ठेवायला हवी कारण प्रेयसीची शॉपिंग भारी पडू शकते. आरोग्याकडे लक्ष द्या. बाहेर खाण्यापिण्याचा सवयींवर ताबा ठेवा. जिम जाण्यासाठी वेळ काढू शकत नसला तरी योगाची मदत घेऊन आरोग्याकडे जरा लक्ष देण्याची गरज आहे.
सर्वोत्तम वेळ- 16 जुलै ते 16 ऑगस्ट
शुभ रंग: निळा, क्रीम, पिवळा, हलका ब्राउन, गुलाबी
शुभ वार: गुरुवार आणि शनिवार
शुभ तारखा: 7, 16, 25
 
या तारखांना गुरुवार आणि शनिवार आल्यास अती उत्तम.
खिशात निळा, पिवळा किंवा क्रीम रंगाचा रुमाल ठेवावा.
दर रोज शनी देवाची पूजा करावी.
 1, 2, 4 आणि 9 अंक असलेल्या व्यक्तींपासून दूर राहा.

मूलांक 8
 
या वर्षी आपल्यावर मंगळ ग्रहाचे स्वामित्व राहील. आपण ऊर्जा आणि उत्साहाने भरलेले असाल. नोकरी आणि व्यवसायात आपण खूप मेहनत घेणार आहात, परंतू परिणाम उमेदीपेक्षा कमी मिळण्याची शक्यता आहे. या दरम्यान कोणतेही नवीन व्यवसाय सुरू करू नये, कोणत्याही बिझनेसमध्ये निवेश करण्यापूर्वी विचार करावा. प्रॉपर्टी, मशीनरी, लोखंडी बिझनेसशी जुळलेल्यांना लोकांना सतर्क राहण्याची गरज आहे.

अभ्यासात मन लागण्याची शक्यता कमी आहे. अध्ययनासाठी परदेशात जाण्याचा विचार असेल तर अडथळे येऊ शकतात. कौटुंबिक जीवन सुरळीत चालेल. परंतू पार्टनर आणि मुलांना अधिक वेळ न देऊ शकण्याची खंत राहील आणि यामुळे हलके वादही होऊ शकतात. व्यवसायासह कुटुंबाला वेळ देण्याचा प्रयत्न करा. आपल्या प्रिय/प्रेयसी सह वाद टाळा नाही तर प्रकरण खूप लांबेल. रिलेशनशिपमध्ये सामंजस्य बनवून ठेवा. कोणती गोष्ट ताणण्याने ब्रेक-अप होण्याची शक्यता आहे. आरोग्य जपा. दररोज अती चहाचे सेवन टाळा. 2017 मध्ये आपले वजन वाढण्याची शक्यता आहे म्हणून रोज व्यायाम करा. 
 
सर्वोत्तम वेळ: 14 जानेवारी ते 13 फेब्रुवारी पर्यंत
शुभ रंग: काळा, ब्राउन, निळा, हिरावा, निळा, जांभळा
शुभ वार: बुधवार आणि शनिवार
शुभ तारखा: 8, 17, 26
 
या तारखांना बुधवार किंवा शनिवार आल्यास अती उत्तम.
खिशात काळ्या रंगाचा रुमाल ठेवावा.
शनिवारी उपास करा आणि गरिबाला भोजन करवा.
1, 2, आणि 9 अंक असलेल्या व्यक्तींपासून दूर राहा.

मूलांक 9
या वर्षी आपल्यावर सूर्य नारायणाची कृपा राहील. आपल्या मेहनत आणि हिमतीवर आपण प्रत्येक क्षेत्रात उन्नती कराल. नोकरी आणि व्यवसायात आपण सूर्याप्रमाणे चमक पसरवणार. व्यवसायात मोठा नफा आपल्या वाटेस येणार आहे. या दरम्यान प्रमोशन मिळण्याची पूर्णपणे शक्यता आहे. पोलिस डिपार्टमेंट, बिल्डिंग-मटेरियल-सिमेंट, प्रॉपर्टी, डॉक्टरी, केमिस्ट याहून जुळलेल्या क्षेत्रात काम करत असाल तर यश मिळणे निश्चित आहे. मागल्या वर्षी जी मेडिकल एंट्रेंस आपण क्लियर करू शकला नाही त्यात या वर्षी नक्कीच यश मिळेल. लाईफ पार्टनरसह संबंध अजून रोमँटिक होतील. आपल्या मुलांसाठी या वर्षी एखादी मोठी पार्टी आयोजित करू शकता. तसेही आपण काही जीवनातील गोल्डन-मूमेंट्स जगू इच्छिता. प्रेमी जोडप्यात वाद निर्माण झाले असतील तर संबंध पुन्हा जुळून येतील. नवीन पार्टनर शोधत असाल तर तुमचा तपास संपला समजा. आरोग्याची काळजी घेण्याची गरज नाही कारण आपण सक्रिय आहात. तसेच जरा शरीराकडे अधिक लक्ष दिले तर आपली पर्सनालिटी अजून उठून दिसेल. मेडिटेशनद्वारे आपण मानसिक रूपाने अधिक स्ट्राँग बनू शकता. 
 
सर्वोत्तम वेळ: 13 एप्रिल ते 12 मे
शुभ रंग: लाल, शेंदुरी
शुभ वार: मंगळवार, रविवार आणि सोमवार
शुभ तारखा: 9, 18, 27
 
या तारखांना मंगळवार, रविवार किंवा सोमवार आल्यास अती उत्तम.
दररोज हनुमानाची पूजा करावी आणि मंगळवारी उपास करावा.
4, 5, आणि 7 अंक असलेल्या व्यक्तींपासून दूर राहा.