गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2017
Written By

'मे' 2017 महिन्याचे मासिक भविष्यफल

मेष (चू, चे, चो, ला, ली, लू, ले, लो, अ) 
मे - या महिन्यातही स्थिती चांगली नसेल. नियोजीत कार्यक्रमानुसारच कामे करा. कौटुबिक प्रश्न भेडसावू शकतात, खासकरून स्त्रियांना. आपल्या धर्मस्थळात जाऊन प्रार्थना करा. महिन्याचा शेवट येता-येता चांगल्या परिस्थितीची सुरुवात होईल. 
 
वृषभ (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो) 
मे - हा महिना आपल्याला अधिकतर ठीकठाक ठरेल. व्यापारात नव्या युक्त्यांचा फायदा होईल. भावुक होणे चांगले आहे, पण अती भावनिकता टाळा. सुख आणि धन प्राप्तीचे संकेत आहेत. सांध्यांचे दुखणे किंवा शल्य चिकित्सा होऊ शकेल. नोकरी व्यवसायात परिवर्तनामुळे घरापासून दूर राहावे लागेल. 
 
मिथुन (का, कि, कु, घ, ड., छ, खे, खो, हा) 
मे - जर तुम्ही परिश्रम केलेत तर प्रगतीचे नवे दरवाजे खुलतील. बदलत्या वातावरणामुळे स्वास्थ्य बिघडू शकते. आई-वडिलांशी बाचाबाची होण्याची शक्यता आहे. फ़िरायला जाण्याआधी घराच्या सुरक्षेची नीट तजवीज करून जा. मनोरंजनावर अधिक खर्च केल्यामुळे महिनाअखेरीस तुम्हाला आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागेल.
 
कर्क ( ही, ह, हे, हो, डा, डी, डू, डे, डो)
मे -पाहुण्यांच्या स्वागतासाठी तयार राहा. विद्यार्थी वर्गाला यश मिळेल. मालमत्तेत गुंतवणूक करा. बॉससोबत उगीच वाद् घालणे टाळा. गुंतवणुकीच्या नव्या योजना आखा. छोट्या-मोठ्या आजारांकडे दुर्लक्ष केलेत तर आरोग्य चांगले राहील. आर्थिक बाजूही सामान्य राहील. प्रेम-प्रसंगात निरर्थक वाद टाळा. 
 
सिंह (मा, मी, मू, मो, टा, टी, टू, टे) 
मे - साधारण महिना आहे. काम करण्यात मन रमणार नाही आणि शारीरिक दुखणे राहील. कोर्ट-खटलेबाजीचे निकाल आशेच्या विपरीत येऊ शकतील. कुठुनतरी शुभाशुभ बातमी येऊ शकेल. कामाबाबतीत सकारात्मक मनस्थिती ठेवा. मानसिक स्थिती साधारण ठेवा.
 
कन्या (टो, पा, पी, पू, ष, ण, ठ, पे, पो) 
मे - प्रॉपर्टीत गुंतवणुक करण्याची ही योग्य वेळ आहे. यशाचा मार्ग मोकळा होत आहे. नव्या संबंधांचा फायदा होईल. ऑफिसमध्ये सह-कर्मचारींचे वागणे सहाय्यभूत ठरेल. कुठे तरी बाहेर जाण्याचा कार्यक्रम ठरू शकतो. जोडीदारासोबत खास क्षण घालवू शकाल.
 
तूळ (रा, री, रु, रे, रो, ता, ती, तू, ते) 
मे - मिल किंवा फॅक्टरी मालकांना बंद किंवा इतर कुठल्यातरी कारणामुळे त्रास सहन करावा लागू शकतो. नोकरदार लोकांसाठी महिना सामान्य असला तरी पगार आणि खर्चामध्ये जुळवणी करणे अवघड होईल. नवे काहीतरी करण्याची प्रेरणा मिळेल.
 
वृश्चिक (ना, नी, नू, ने, नो, या, यी, यू)
मे - जीवनात संघर्षाचा काळ सुरू होत आहे. तुमचा आत्मविश्वासच तुम्हाला या कठीण काळातून बाहेर काढील. प्रॉपर्टी वगैरेत गुंतवणूक करण्यासाठी वेळ अनुकूल नाही. तब्येतीची काळजी घ्या, बाहेर खाणे टाळा. जोडीदार आणि अपत्यांकडून त्रास होण्याची शक्यता आहे. 
 
धनु (ये, यो, भ, भी, भू, धा, फा, ढा, भे) 
मे - महिना साधारण आहे. सर्व काही ठीक राहील. जोडीदारासोबत कुठेही बाहेर फिरायला जाऊ शकता. आर्थिक बाजू साधारण राहील. मुलांच्या बाजूने काही चिंता होण्याची शक्यता आहे. निरर्थक वादांमध्ये पडू नका. शत्रू वरीष्ठ अधिकाऱ्यांना तुमच्याविरुद्ध भडकवू शकतात. ऑफिस पॉलिटिक्सपासून दूर राहण्यातच फायदा आहे. जोडीदाराचे आरोग्य चिंतीत करू शकते. 
 
मकर (भो, जा, जी, खी, खू, खे, गो, गा, गी) 
मे - महिन्याची सुरुवात चांगली नसेल. ताण वाढेल. सहकर्मयाऱ्यांशी मतभेद होऊ शकतात. महिन्याचा दुसरा पंधरवडा लाभदायक असेल. भौतिक सामान खरेदी केल्याने वैभवात वाढ होईल. शत्रूंना वाटूनसुद्धा तुमचे नुकसान करता येणार नाही. अडकलेले पैसे परत मिळतील. विद्यार्थी वर्गाला फायदा होईल. शत्रू तुमच्यावर हावी होण्याच्या प्रयत्नात आहेत, सावधान राहा.
 
कुंभ (गू, गे, गो, सा, सि, सु, से, सो, द) 
मे - वेळ अनुकूल आहे, याचा लाभ घ्या. यशासाठी नव्या विचारांची गरज आहे. मुलांकडून त्रास होऊ शकतो. जोडीदारासोबत खाजगी वादावरून तणाव राहील. अधिकारींशी संबंधांचा फायदा होईल. नोकरदार लोकांसाठी सामान्य वेळ आहे. आरोग्याची काळजी घ्या. 
 
मीन (दी, दू, थ, झ, य, दे, दो, ची) 
मे - करिअरच्या दृष्टीने ही मार्मिक वेळ आहे. तुम्ही प्रगतीशिखर चढू शकता. नव्या जबाबदाया मिळू शकतात. पदोन्नती मिळण्याची शक्यता आहे. मिळकतीचे स्त्रोत वाढतील. धनप्राप्तीचे योग आहेत. सामाजिक कार्यात तुम्ही सतत तत्पर राहाल. कोणतेही नवे काम करण्याआधी त्याच्या प्रत्येक पैलूचा बारकाईने विचार करा. हवेत प्रेम आहे. त्याचा फायदा घ्या.