या वर्षी तुम्ही तुमच्या इच्छित जोडीदाराशी लग्नगाठ बांधू शकाल. या वर्षाच्या शेवटच्या तिमाहीमध्ये प्रमाणापेक्षा अधिक खर्च होईल. आरोग्याच्या कुरबुरी सुरू राहतील आणि हवेवाटे होणारे रोग, सांधेदुखी इत्यादीची लागण तुम्हाला होऊ शकेल. आंबट पदार्थ वर्ज्य करा. कौटुंबिक स्वास्थ्यात येत्या वर्षात बरेच चढउतार असतील. मार्चपूर्वीचा काळ शांततेत जाईल. एप्रिल ते ऑगस्टदरम्यान खर्च वाढतील. पण ते चांगल्या कारणाकरता असतील. जुलैनंतर नवीन जागेत प्रवेश होईल. तरुणांनाही स्थिरता लाभल्याने वैवाहिक जीवनात नवीन जागेत प्रवेश होईल. या वर्षात मुलांची प्रगती उत्तम होईल. पण त्याचा तुम्हाला प्रत्यक्ष उपयोग होणार नाही. येत्या वर्षात नातेवाईक आणि मित्रमंडळी यांच्याशी शक्यतो पैशाचे व्यवहार करू नका. अनपेक्षित कारणांकरिता मे हिन्यानंतर पैसे खर्च करावे लागतील. वृद्ध व्यक्तींनी स्वत:ची प्रकृती सांभाळली तरच त्यांना सर्व गोष्टींचा आनंद मिळू शकेल. कलाकार, खेळाडू, सामाजिक कार्यकर्ते यांना येत्या वर्षात प्रगती झाली तरी एक प्रकारचा दबाव राहील.