testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

सिंह राशीच्या जातकांचे 2018 मधील वार्षिक राशिभविष्यफल

singh 600
धंदा, व्यवसाय व नोकरी....
तुमच्या कष्टांमुळे तुम्ही प्रगतिपथावर जाऊ लागाल. पण, तुम्ही आळशीपणा टाळला पाहिजे. तुम्ही आयुष्यात पुढे पुढे जात आहात आणि तुम्हाला अनुकूल घटना घडत आहेत आणि तुमची आर्थिक प्रगती होणार आहे, याची तुम्हाला प्रचिती येईल. गेल्या सहा आठ महिन्यात तुम्ही काही प्रकल्प हाती घेतला असेल तर त्यामध्ये आता गिर्‍हाईकांकडून चांगला प्रतिसाद मिळेल. व्यवसाय धंद्याच्या दृष्टीने तुम्ही प्रगतीतला एक महत्त्वाचा टप्पा गाठल्याचे समाधान लाभेल. सध्या चालू असलेल्या कामांना वेग येईल. परदेशप्रवासाची खूप शक्यता आहे. गरोदर महिलांनी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यांत विशेष काळजी घ्यावी. ऑक्टोबर महिन्याच्या मध्यानंतर कौटुंबिक आणि व्यावसायिक आयुष्यात सकारात्मक बदल झालेले दिसून येतील. तुम्हाला जनमानसातही स्थान लाभेल. नवीन नोकरीच्या दृष्टीने फेब्रुवारी, मार्च आणि ऑगस्ट, सप्टेंबर ते डिसेंबर या दरम्यान संधी लाभेल. पुढे पहा गृहसौख्य व आरोग्यमान....


यावर अधिक वाचा :