testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

वृषभ राशीच्या जातकांचे 2018 मधील वार्षिक राशिभविष्यफल

धंदा, व्यवसाय व नोकरी....
जानेवारी महिन्यानंतर तुमच्या आर्थिक संचयात वृद्धी होईल. वृषभ राशीच्या लोकांना काही छोट्या प्रवासांमुळे चांगले परिणाम पाहायला मिळतील. एप्रिल महिन्यात कोणताही धोका पत्करू नका. मे ऑगस्ट या कालावधीमध्ये उत्पन्नाचे एखादे नवीन साधन मिळेल. या वर्षात शक्यतो कोणालाही उधारउसनवारी करू नका. नोकरदार व्यक्तींना गेल्या वर्षात हुकलेले प्रमोशनही मिळू शकेल. नेहमीपेक्षा जास्त पगारवाढ होण्यास किंवा विशेष सुविधा मिळण्यास उत्तम काळ आहे. जानेवारी ते मार्च या दरम्यान तुमचे कौशल्य तुम्हाला दाखविता येईल. येत्या वर्षात आपल्या कामात कुठेही चूक होणार नाही याची दक्षता घ्या. ज्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणेसाठी परदेशात जायचे आहे त्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत संघर्षाची आणि उत्कंठेची तयारी ठेवणे चांगले. कलाकार, खेळाडू आणि सामूहिक क्षेत्रातील व्यक्तींना मार्च ते ऑगस्ट दरम्यान नेहमीपेक्षा जास्त प्रसिद्धी व पैसे मिळतील. पुढे पहा गृहसौख्य व आरोग्यमान....


यावर अधिक वाचा :