testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

कन्या राशीच्या जातकांचे 2018 मधील वार्षिक राशिभविष्यफल

Virgo
धंदा, व्यवसाय व नोकरी....
या वर्षात तुम्ही अनेक ध्येय गाठणार आहात. विविध प्रकारच्या संधींच्या माध्यमातून तुम्हाला चांगले आर्थिक परिणाम पाहायला मिळतील. तुमचे सामाजिक वर्तुळ अत्यंत सक्रिय असेल आणि तुमचे समाजातील स्थानही उंचावेल. तुम्हाला व्यावसायिक आयुष्यात समाधान लाभेल. तुमच्या उपक्रमांना यश लाभेल. फार काळापासून असलेली इच्छा पूर्ण होईल. वर्षभर उत्पन्नाची आवक चांगली राहील. जानेवारी महिन्यात अनपेक्षित लाभ संभवतो. ऑक्टोबर महिन्यानंतर या वृद्धीमध्ये अजून भर पडेल. नोकरदार व्यक्तींना थोडेसे गैरसोयीचे वर्ष आहे. जास्त काम करून जास्त पैसे मिळविण्याची तुमची नेहमीच अभिलाषा असते. ती पूर्ण करण्याची तुमची जबरदस्त इच्छा या वर्षात जागृत होईल. पण त्याच्याकरता कदाचित तुम्हाला कौटुंबिक सुखात कमतरता सहन करावी लागेल.
पुढे पहा गृहसौख्य व आरोग्यमान....


यावर अधिक वाचा :