testwebdunia1
testwebdunia0
testwebdunia2

मीन राशीच्या जातकांचे वर्ष 2018चे संपूर्ण वार्षिक राशीभविष्यफल

गृहसौख्य व आरोग्यमान...
नाजूक प्रकृतीच्या मीन राशीच्या व्यक्तींना वर्षभर त्यांच्या आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे, त्यानंतर ते चांगले आयुष्य जगू शकतील. कौटुंबिक सुख आणि स्वास्थ्य या दृष्टीने वर्ष आनंदाचे जाईल. जरी खर्च वाढले तरी ते चांगल्या कारणामुळे असल्याचे समाधान लाभेल. पूर्वी ठरलेला अथवा लांबलेला शुभसमारंभ एप्रिल ते जुलै या काळात घडून येईल. विवाहास उत्सुक व्यक्तींचे विवाह मार्च ते सप्टेंबर या दरम्यान ठरून सप्टेंबरनंतर पार पडतील. वृद्धांच्या जीवनात आनंद व समाधान राहील. तब्येतीच्या दृष्टीने संपूर्ण वर्ष थोडेसे खडतर आहे. पण त्याची पर्वा न करता तुम्ही काम रेटत राहाल. तरुणांनी येत्या वर्षात जास्त धाडस करू नये. त्यांचे विवाहाचे बेत थोडेफार लांबण्याची शक्यता आहेत. वैवाहिक आयुष्य सुखकर असेल आणि तुमच्या सर्व प्रयत्नांमध्ये तुमचा जोडीदार तुम्हाला सहकार्य करेल. मुले खोडकर राहतील आणि त्यांना योग्य मार्गावर आणण्यासाठी तुम्हाला कष्ट करावे लागतील. विद्यार्थी अभ्यासामध्ये शॉर्ट-कट आणण्याचा प्रयत्न करतील आणि ते काहीसे लहरी होतील. तुम्हीसुद्धा आयुष्यात शॉर्ट-कट घेण्याचा प्रयत्न कराल, ज्यामुळे तुम्हाला चांगले परिणाम पाहायला मिळतील, पण कालांतराने तुम्हाला हा मार्ग सोडावा लागेल. ऑक्टोबरनंतर तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतील. एकुणातच, या वर्षात तुम्हाला आरोग्याला अधिक प्राधान्य द्यावे लागेल आणि आयुष्याच्या सर्व आघाड्यांवर समतोल साधावा लागेल.


यावर अधिक वाचा :