शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी ज्योतिष
  2. ग्रहमान
  3. ज्योतिष 2019
Written By
Last Modified: मंगळवार, 5 मार्च 2019 (13:50 IST)

Rahu transit 2019: राहूचे राशी परिवर्तन 7 मार्चपासून, ह्या राशीच्या लोकांनी सावधगिरी बाळगा

7 मार्चला नवं ग्रहात सामील राहू केतू राशी परिवर्तन करणार आहे. राहू कर्क व केतू मकर राशी सोडून आपली उच्च राशी मिथुन व धनू राशीत प्रवेश करणार आहे.  
 
राहू-केतूचा हा परिवर्तन विभिन्न राशीच्या व्यक्तींवर वेग वेगळा प्रभाव दाखवेल. सिंह, तुला, कुंभ राशीच्या लोकांसाठी सामान्य राहणार आहे. राहू-केतूमुळे येणार्‍या काळात तुमच्या मेहनतीप्रमाणे तुम्हाला यश मिळेल. सर्व काम सावधगिरी बाळगून करा. या सर्व राशीच्या लोकांना आपल्या बचावासाठी गणपतीची पूजा रोज केली पाहिजे. माता सिंहिकाचा पुत्र राहू शुक्र प्रधान वृषभ राशीत सर्वाधिक प्रबळ आणि मंगळ प्रधान वृश्चिक राशीत कमजोर असतो. शुक्र, बुध आणि शनीशी राहूची प्रबळ मित्रता आहे. जेव्हा राहू आणि गुरू एकाच राशीत असतात, तेव्हा गुरुचंडाल योग बनतो. यामुळे पीडित राहणार्‍या लोकांनी शेषनागाची पूजा केली पाहिजे. गोमेद यांचा रत्न आहे. तर जाणून घेऊ विभिन्न राशींवर राहूचा प्रभाव:
 
वृषभ - संचित धनाची हानी होण्याची शक्यता आहे. हवा-हवाई योजनांवर धन खर्च होईल. वाणी दोषामुळे तुमची प्रतिमा खराब होईल.
 
मिथुन- अचानक आजारपणा, भितीमुळे काळजी वाटेल. व्यर्थ मेहनत करावी लागेल.
 
कर्क- अचानक विघ्न-बाधा उत्पन्न होते. प्रियकराकडून कष्टामुळे काळजी. रोजगारात कमी येईल.
 
तुला- प्रत्येक कार्यांमध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. वायफळ योजनांमध्ये धन नुकसान होण्याची शक्यता आहे.
 
वृश्चिक- जवळचे लोक धोका देण्याची शक्यता आहे. अपघाताची शक्यता राहील. विवादांमुळे तुमची प्रतिमा बिगडू शकते.
 
धनू - जोडीदारासोबत वाद विवाद. भागीदारीत संबंध बिघडू शकतात.
 
कुंभ- संतानबद्दल तणाव वाढण्याची शक्यता आहे. उच्च शिक्षणात अडचण. गुंतवणुकीत भय राहील.
 
मीन- शिक्षणात अडचण, वाहनामुळे कष्ट मिळेल. वृद्ध म्हातार्‍या लोकांच्या आरोग्याची काळजी राहणार आहे.