शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. सखी
  4. »
  5. सौंदर्य सल्ला
Written By वेबदुनिया|

मधाचे फेसपॅक

ND
मध हे आपल्या आरोग्यासाठी औषधी आहे. मध हे आपल्या त्वचेवरही गुणकारी असल्याचे सिध्द झाले आहे. बाजारात आलेले केमिकलयुक्त फेसपॅकमुळे आपल्या त्वचेवर विपरित परिणाम होत असतो. मधाचा फेसपॅक घरच्या घरी तयार करून आपली त्वचेचा सतेजपणा कायम ठेवता येऊ शकतो.

1. मुलतानी मातीचे पावडर, गुलाबजल, मध (शहद) व संत्र्याचा रस प्रत्येक एक- एक चमचा घेऊन त्याची पेस्ट तयार करून रात्री झोपण्याआधी चेहर्‍यावर लावावी. 10 ते 15 मिनिटांनी चेहरा स्वच्छ करावा.

2. एक चमचा मधात एका अंड्याच्या बलक घालून चेहर्‍यावर लावावा. 10 मिनिटानी चेहरा स्वच्छ करावा.

3. पिकलेल्या केळीचा गर, कणीक व एक मोठा चमचा मध यांची पेस्ट चेहर्‍यावर लावावी. 10 मिनिटानंतर चेहरा थंड पाण्याने स्वच्छ करावा.