गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

सुंदर नखांसाठी काही सोपे उपाय

सण असो वा लग्न समारंभ, भरजरी साड्या किंवा फॅशनेबल पंजाबी सूट घालून मुली व बायका मिरवतं असतात. दागदागिने, मेकअप हे सर्व तर आलंच पण याव्यतिरिक्त एक लहानशी गोष्ट अजून आहे ज्याकडे अधिकश्या महिला दुर्लक्ष करतात आणि ते म्हणजे नखांची काळजी.
 
पूर्वी वैद्य नखांवरून व्याधी ओळखायचे असं म्हणतात. आपण याचा विचार करून नखांचं आरोग्य जपण्याचा विशेष प्रयास घ्यायला हवा. नखांना सुंदर बनविण्यासाठी बघू काही सोपे टिप्स:
 
खोबरेल तेलात मध आणि मेंदीचं तेल मिसळून गरम करावं. तेल कोमट झाल्यावर त्यात नख बुडवून ठेवावी. 10 मिनिटे तरी नख तेलात असू द्यावी. आठवड्यातून एकदा हा उपाय केल्याने परिणाम समोर येतील.
 
रात्री झोपण्यापूर्वी कोमट ऑलिव्ह ऑइल नखांवर चोळावं. हलक्या हाताने मसाज करून हातमोजे घालावे. याने नखांचे सौंदर्य वाढेल.
 
दररोजच्या कामात नख रसायन, अपायकार घटकांच्या संपर्कात येत असतात. म्हणून त्यांना ओलावा हवा. नख शुष्क नको. शुष्क नख झाल्यावर त्यांना कोमट पाण्यात बुडवून ठेवावी आणि नंतर मॉईश्चरायझर लावावं.
 
लिंबाच्या रसात ऑलिव्ह ऑइलचे काही थेंब मिसळून मिश्रण तयार करा. याने नखांवर मसाज केल्याने नखांचं सौंदर्य वाढतं.