Widgets Magazine

काळजी ऑईली स्कीनची

वेबदुनिया 

Widgets Magazine

beauty
ऑईली स्किन असणार्‍या महिलांना उन्हाळा विशेष जाचतो. या दिवसात तैलग्रंथींद्वारे त्वचेवर अतिरिक्त तेल पसरत असतं. घामाची समस्याही असतेच. या थरावर वातावरणातील धूळ, माती आदी घटक जमा होतात आणि त्वचेसंबंधीचे विकार वाढीस लागतात. त्यामुळे या त्वचेची उन्हाळ्यात विशेष काळजी घ्यावी.

* ऑईल फ्री फेसवॉश नियमित वापरल्यास त्वचा ऑईल फ्री राहते. ग्लिसरीनयुक्त साबणाचा वापर करू नका.

* त्वचा ऑईली असल्यास क्लिन्झींगला पर्याय नाही. क्लिन्झींगमुळे त्वचेवर साठलेली घाण, मेकअप, मृत त्वचा नाहीसे होऊन रंध्रे मोकळी होतात. या उपायाने ब्लॅकहेड्सची समस्या दूर होते. आठवडय़ातून एकदा लाईट स्क्रब केल्याने फायदा होतो.

* तांदळाच्या पिठीमध्ये पुदीन्याचा अर्क किंवा गुलाबजल मिसळून चेहर्‍यावर दहा मिनिटे हा पॅक ठेवावा. दहा मिनिटांनंतर हलक्या हाताने चोळून पॅक काढून टाकावा.

* पर्समध्ये नेहमी गुलाब अथवा लॅव्हेंडर बेस असलेलं स्किन टॉनिक ठेवा. त्याबरोबर वेट टिश्युजही हवेत. दर दोन तासांनी यानं चेहरा स्वच्छ केल्यास त्वचा टवटवीत राहते.

* ऑईली स्किनवर अँकनेचा त्रास होत असेल तर टी ट्री अँटी पिंपल जेल अथवा जेल मॉईश्चरायझर वापरणं चांगलं.

* त्वचेचं सीबम ऑईल नियंत्रणात ठेवण्यासाठी तेलकट आणि मसालेदार पदार्थ वज्र्य केलेले चांगले. तैलीय ग्रंथीमध्ये संतुलन राखण्यासाठी फायबरयुक्त भोजन उपयुक्त आहे. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात एकेक डिश सॅलड असणं अतिआवश्यक आहे.



Widgets Magazine
Widgets Magazine
यावर अधिक वाचा :  

Widgets Magazine

सखी

news

घरातून पळवा पाल, 7 सोपे उपाय

घरात पाल फिरताना दिसली की किळस वाटते, मनात शंका येते की एखाद्या खाद्य पदार्थात न पडे. ...

news

बियरचा वापर केल्याने केस होतात सिल्की & शाईनं

सुंदर केस एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वात अधिक भार टाकतात. मग तो पुरुष असो की महिला. ...

news

या 5 चुकींमुळे तुम्ही दिसताय वयस्कर!

फॅशनच्या काही चुकींमुळे तुम्ही वयस्कर तर दिसतं नाहीये ना. तुम्हाला फॅशनचा जास्त नाद नसला ...

news

उन्हाळ्यात सौंदर्य जपेल कूल काकडी

उन्हाळा सुरू झाला की आपण कूल- कूल वस्तूंकडे वळतो. त्यातीलच एक कूल फूड म्हणजे काकडी ...

Widgets Magazine