गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By वेबदुनिया|

'आय' मेकअप उन्हाळ्यासाठी!

चेहर्‍याचा सर्वांत महत्त्वपूर्ण भाग म्हणजे डोळे. उन्हाळ्यात वाटरप्रूफ कॉस्मेटिक्सचा वापर करावा आणि डोळ्यांचा मेकअप करताना काही गोष्टींकडे लक्ष देणे द्यायला पाहिजे :

आय शेडो : ब्राउन कलरच्या आय शेडोने डोळ्यांना डीप सेट करावे आणि तुमच्या ड्रेसच्या मॅचिंग शेड पापण्यांवर लावावे. आयब्रोजच्या खाली ब्राइड क्रिमी, गोल्डन किंवा सिल्वर कलरने हाइलाइट करू शकता.

आय लायनर : उन्हाळ्यात आय लाइनर वाटरप्रूफ असायला पाहिजे. तुम्ही वाटल्यास डोळ्यांच्या खाली पेंसिल किंवा लाइनरचा वापर करू शकता. आय लाइनर आपल्या स्कीन टोन आणि ड्रेसच्या अनुरूप ब्राउन किंवा निळ्या रंगाचे असू शकतात. हे रंग उठून दिसतात आणि ड्राय लुक पण देतात.

आयब्रोज : आपल्या आयब्रोजला सुंदर शेप देण्यासाठी आणि त्या ठिकाणी कट किंवा रिकामी जागा भरण्यासाठी ब्राउन आणि ब्लॅक पेन्सिलचा वापर करावा.

मसकारा : उन्हाळ्यात मसकारासुद्धा वाटरप्रूफ असायला पाहिजे. आपल्या आवडीनुसार ब्राउन किंवा निळ्या रंगाचा मसकारा लावू शकता. तुम्ही पापण्यांवर ट्रांसपरेंट मसकारा लावून आवडीनुसार शेप देऊ शकता.