गुरूवार, 28 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

मुरूम फोडला, डागापासून वाचण्यासाठी हे करा..

चेहर्‍यावरील मुरूम आपल्याला सहन होत नाही आणि त्याचे दुष्परिणाम माहीत असून सुद्धा कित्येकदा आपण त्याला फोडून देता. आधीतर पिंपल फोडून नाही, तरी असे होऊन गेले असेल तर हे करावे:
 
सर्वात आधी लालसरपणा आणि सूज कमी करण्यासाठी त्या जागेवर काही गार अर्थात बर्फ लावा. ज्याने रक्त थांबेल आणि सूजही कमी होईल. आईस बॅग त्या जागेवर 20 मिनिटाहून अधिक वेळेपर्यंत ठेवणे योग्य नाही.
आता बेंजोयल पेरोक्साइड लावा. मुरूम फोडल्यावर त्यातील पस आतील बाजूला शिरू शकत आणि बेंजोयल पेरोक्साइड त्या जागेवरील बॅक्टिरिया कमी करेल आणि सूजही कमी होईल ज्याने डाग पडण्याची शक्यता कमी होईल.
 
डाग पडू नये म्हणून त्या जागेवर स्पर्श करण्यापूर्वी हात स्वच्छ धुऊन टाकावे. कारण हातात असलेले बॅक्टिरिया त्या जागेवर जाऊन संक्रमण पसरवू शकतात.
 
त्या जागेवर खाज सुटत असली तरी खाजवू नका. अशाने सूज वाढेल आणि डाग पडण्याची शक्यताही.