मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. सखी
  3. सौंदर्य सल्ला
Written By

झोपेने वाढते सौंदर्य

सौंदर्यवृद्धीसाठी अनेकजण काही ना काही उपाय करीत असतात, मात्र बाह्य उपचारापेक्षा चांगली झोप, सकल खाणेपिणे, व्यायाम सारख्या गोष्टी अधिक महत्वाच्या असतात हे अनेक लोक विसरतात. आता संशोधकांनी म्हटले आहे की सौंदर्यवृद्धीसाठी चांगली झोप अत्यावश्यक आहे.
एक- दोन रात्री जरी पुरेसी झोप झाली नाही तरी चेहर्‍यावर त्याचे परिणाम लगेचच दिसू लागतात. याउलट चांगल्या झोपेमुळे चेहरा टवटवीत होतो आणि तेजस्वी दिसतो, स्वीडनची राजधानी स्टॉकहोममध्ये याबाबतचे संशोधन करण्यात आले. तिथे संशोधकांनी यासाठी काही विद्यार्थ्यांची पाहणी केली. त्यामध्ये स्त्री-पुरूष अशा दोन्हीचा समावेश होता. आधी या विद्यार्थ्यांना दोन रात्री चांगली व भरपूर झोप घेण्यास सांगितले व नंतर आठवडाभराने दोन दिवस केवळ चार तास झोपण्यास सांगितले. त्यावेळी त्यांची छायाचित्रेही टिपण्यात आली.
 
ही छायाचित्रे 122 अनोळखी लोकांना दाखवून त्यांचे मत विचारण्यात आले. चांगली झोप झाल्यावर जी छायाचित्रे काढण्यात आली त्यालाच लोकांनी पसंती दिली.